बापरे! सोन्याची एक वर्षात 51 हजारांची उसळी! चांदीही 76 टक्के महाग; पुढे 'एवढे' होणार सोन्याचे दर
Gold Price From Diwali to Diwali 51K Hike in 1 Year : दिवाळीच्या या शुभमुहूर्तावर सोने आणि चांदीच्या खरेदीला पुन्हा एकदा उधाण आले आहे. गेल्या वर्षभरात या मौल्यवान धातूंनी गुंतवणूकदारांना अक्षरशः मालामाल केले आहे. एका दिवाळीपासून दुसऱ्या दिवाळीपर्यंत सोन्याने तब्बल ५१ हजार रुपयांची विक्रमी वाढ नोंदवली आहे, तर चांदी ७६ टक्क्यांहून अधिक महाग झाली आहे. सोन्याचा भाव लवकरच दीड लाख रुपयांचा टप्पा पार करेल, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला असल्याने, ही फक्त चमक नसून गुंतवणुकीची खरी 'झलक' ठरत आहे!
जागतिक अनिश्चितता, मध्यवर्ती बँकांची खरेदी आणि चलनवाढ यामुळे सोन्याच्या दरांनी एका वर्षात नवीन शिखर गाठले आहे.

यंदा आणि मागच्या वर्षी किती होते सोन्याचे भाव?
२०२४ मध्ये मागील दिवाळीला २४ कॅरेट सोन्याचा दर ७९ हजार १४३ रुपये इतका होता. तेव्हा ५१ हजार ७१७ रुपये इतका दर होता. तर आज १९ ऑक्टोबर २०२५ रोजी २४ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ३० हजार ८६० रुपये इतका प्रति तोळा झाला आहे. सोन्याने एक वर्षात दिली जवळपास ६५ टक्के वाढ दिली.
एक वर्षात किती रुपयांनी वाढली चांदी?
सोन्यापाठोपाठ चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली असून, चांदीने एका वर्षात ७६ टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. चांदी २०२४ मध्ये प्रति किलोग्रॅम ९७ हजार ४८० रुपये इतकी होती, तर यंदा १९ ऑक्टोबर २०२५ रोजी चांदीचे दर १ लाख ७२ हजार झाले आहेत, म्हणजेच जवळपास ७६.५१ टक्के वाढ चांदीच्या दरात झाली आहे.
सोन्याचा भाव लवकरच दीड लाखावर पोहोचणार?
गुड रिटर्नने दिलेल्या वृत्तानुसार आणि या वृत्तात एक्सिस सिक्युरिटीजच्या विश्लेषकांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील दिवाळीपर्यंत (२०२६) सोन्याचे दर १,४५,००० ते १,५०,००० रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत पोहोचू शकतात असा अंदाज आहे. या वाढीसाठी पाच प्रमुख घटक कारणीभूत असतील.
अति चलनवाढ (Hyper Inflation): अमेरिकेसह केंद्रीय बँकांनी कर्जे फेडण्यासाठी जास्त चलन छापल्यामुळे भविष्यात अति चलनवाढीची स्थिती निर्माण होऊ शकते. यामुळे गुंतवणूकदार आपले धन सोन्यात वळवतील.
डी-डॉलरायझेशनचा ट्रेंड: जगभरातील अनेक मध्यवर्ती बँकांनी अमेरिकन डॉलरऐवजी सोन्याची खरेदी वाढवल्यामुळे सोन्याच्या किमतीला आधार मिळाला आहे. हा ट्रेंड पुढील वर्षीही कायम राहण्याची शक्यता आहे.
ईटीएफची वाढती मागणी: गोल्ड एक्स्चेंज ट्रेडेड फंड्स (ETFs) ची मागणी वाढत असल्याने किमती विक्रमी उच्चांकावर पोहोचत आहेत.
केंद्रीय बँकांची सातत्यपूर्ण खरेदी: गेल्या वर्षी केंद्रीय बँकांनी सुमारे १,१८० टन सोने त्यांच्या साठ्यात जमा केले होते. हा खरेदीचा कल पुढील वर्षीही कायम राहिल्यास मोठी वाढ अपेक्षित आहे.
जागतिक अनिश्चितता: जागतिक तणाव आणि व्याजदर कपातीच्या अपेक्षा यामुळे सोन्याच्या किमतीला पुढील वर्षी फायदा होईल. विश्लेषकांनी गुंतवणूकदारांना रु. १,१५,००० ते रु. १,०५,००० दरम्यान दर आल्यास सोने खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.












Click it and Unblock the Notifications