Gold Price मोठी बातमी! सोन्याचे दर गडगडले! अमेरिकन 'फेड रेट कट' झाल्यानंतर प्रतितोळा 'एवढा' झाला भाव
Gold rate crash today india marathi : सोन्याच्या दराने उसळी घेत सर्व रेकाॅर्ड मोडले होते, आता झटकन हे दर ५ हजार रुपयानी खाली आले आहेत. सोन्याच्या दरातील ही घसरण कमालीचे चैतन्य आणणारी ठरली आहे. आधीच सोन्याने अनपेक्षित उसळी घेतल्यानंतर आता खरेदीदार, गुंतवणूकदारांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
आज गुरुवार १८ सप्टेंबर रोजी, भारतातील सोन्याच्या दरात अमेरिकेच्या फेडरल बँकेने (US Fed) अपेक्षेनुसार व्याजदरात 25 bps (बेसिस पॉईंट्स) कपात केल्यानंतर सोन्याचे भाव गडगडले. १८ कॅरेटपासून २४ कॅरेटपर्यंत सर्व प्रकारच्या सोन्याच्या दरात लक्षणीय घट झाली आहे.

जरी गेल्या एका महिन्यात सोन्याच्या दरात सुमारे १२% वाढ झाली असली तरी, आजच्या घसरणीमुळे गुंतवणूक करणाऱ्यांना धक्का बसला आहे तर ज्यांना गुंतवणूक करायची आहे त्यांच्यासाठी मोठा दिलासा आहे. सोने हे सदासर्वदा गुंतवणुकीचे सुरक्षित साधन मानले जाते पण आज सोन्याचा अंदाज काहीसा धक्कादायक ठरला त्याला कारण म्हणजे अमेरिकन फेडरल बँकेने कमी केलेले व्याजदर होय. त्यामुळे आगामी काळात सोन्याचे भाव पुन्हा किती होतील हे लवकरच समजेल.
सोने आणि चांदीचे आजचे दर (१८ सप्टेंबर २०२५)
आज २४ कॅरेट सोन्याचे दर :
- प्रति १० ग्रॅम: ₹१,११,१७० (कालच्या दरापेक्षा ₹५४० ने कमी)
- प्रति १०० ग्रॅम: ₹११,११,७०० (कालच्या दरापेक्षा ₹५,४०० ने कमी)
२२ कॅरेट सोन्याचे आजचे दर :
- प्रति १० ग्रॅम: ₹१,०१,९०० (कालच्या दरापेक्षा ₹५०० ने कमी)
- प्रति १०० ग्रॅम: ₹१०,१९,००० (कालच्या दरापेक्षा ₹५,००० ने कमी)
चांदीचे आजचे प्रतीग्रॅमचे दर:
प्रति ग्रॅम: ₹१३१ (कालच्या दरापेक्षा ₹१ ने कमी)
प्रति किलो: ₹१,३१,००० (कालच्या दरापेक्षा ₹१,००० ने कमी)
सोन्याचे दर अजूनही उच्चांकावर
वे-2, वेल्थ ब्रोकर्सचे रिसर्च ॲनालिस्ट अभिषेक एम. पेलु यांच्या मते, "तांत्रिकदृष्ट्या MCX सोने अजूनही विक्रमी उच्चांकाजवळ आहे. मात्र, पुढील काळात ते एका मर्यादित रेंजमध्ये राहू शकते."
सोन्याचे दर रेंजमध्ये राहतील अथवा कमी होतील
नॉर्मल बंग सिक्युरिटीज च्या रिसर्च ॲनालिस्टनी सांगितले की, "आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीचे भाव थोडे खाली आले आहेत. आम्हाला अपेक्षा आहे की, भारतीय बाजारात देखील मौल्यवान धातूंचे दर आज मर्यादित रेंजमध्ये राहतील किंवा थोडे कमी होतील." हा अंदाज आहे.
Disclaimer : येथे दिलेली मते आणि शिफारसी केवळ विश्लेषकांची आहेत. गुंतवणूक करण्यापूर्वी, योग्य आर्थिक सल्लागाराकडून माहिती घेणे आवश्यक आहे.












Click it and Unblock the Notifications