Gold price : ..का वाढत आहेत सोन्याचे दर? टेन्शन घेऊ नका, भाव होणार कमी! इतके रुपये होऊ शकतो रेट
Gold price breaks record Why are gold rate increasing : हल्ली सोन्याने चांगलाच भाव खाल्ल्याचे दिसून येत आहे. सोने ही सर्वांच्याच आवडीचा धातू. त्याचे दागिने तर महिलावर्गात मोठ्या आवडीने घातले जातात. सोन्यावरुन व्यक्तिच्या ऐश्वर्याची किंमत ठरते ते उगाचच नाही कारण सोने आणि त्याचा भावच तेवढा मौल्यवान आहे, पण आज एक लाखावर गेलेले सोने उतरणार की आणखी भाव वाढणार ही चिंता अनेकांना सतावत आहे.
अशातच एक मोठी बातमी दिलासा देणारी आली आहे. होय..तेही सोन्याचे दर कमी होऊ शकतात. आज आपण सोन्याचे भाव का वाढत आहेत आणि कितीपर्यंत ते कमी होऊ शकतात हे जाणून घेणार आहोत.

का वाढत आहेत सोन्याच्या किमती?
सोन्याच्या किमतीत वादळी वाढ झाली आहे. 10 ग्रॅमची किंमत 1 लाखांच्या पुढे गेली आहे. गुड रिटर्नसच्या वृत्तानुसार, केडिया ॲडव्हायझरीचे अजय केडिया म्हणाले की, सोन्याच्या किमतीतील ही वाढ अनेक जागतिक घडामोडींमुळे झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या वाढत्या टॅरिफ तणावामुळे महागाई वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी वाढत आहे. दरम्यान, डॉलरच्या निर्देशांकात घसरण होत होती आणि तो 98 च्या खाली घसरला होता.
सोन्याच्या दरवाढीला इतर कारणे
- रशिया आणि युक्रेन युद्धापासून मध्य पूर्व तणावापर्यंत भौगोलिक-राजकीय तणाव. या कारणांमुळे सोने सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय बनला आहे.
- केंद्रीय बँकाही सोने खरेदी करत असल्याने भाववाढीचा फटका, ईटीएफचा प्रवाह कायम आहे.
- शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार सोन्याकडे वळत आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांचे धोरणही सोन्याच्या दरवाढीला कारण
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेले शुल्क हे यासाठी सर्वात मोठे कारण आहे. गेल्या वर्षी, फेडने दर 100 बेसिस पॉइंटने कमी केले. परंतु सध्या, वाढ आणि चलनवाढीच्या चिंतेमुळे दरांमधील बदलांवर पुन्हा एकदा ब्रेक येऊ शकतो.
यंदा सोन्याच्या दरात अस्थिरता कायम
यंदा सोन्याच्या दरात अस्थिरता कायम राहणार अशी शक्यता असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दीर्घकालीन दृष्टीकोनातून, सोने 1 लाख 6 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत जाऊ शकते. दुसरीकडे, अजय केडिया म्हणाले की, सध्याच्या भक्कम मूलभूत गोष्टी असूनही, हा प्राइस झोन खूपच जास्त आहे.सोन्याच्या किमतीत चांगली सुधारणा दिसून येईल, असे ते म्हणाले.
सोन्याचे भाव घसरणार?
सोन्याच्या दरात सुरू असलेली वाढ लवकरच थांबणार आहे. किमतीतील घसरण उच्च पातळीवरून दिसून येते. प्रॉफिट बुकींगमुळे सोन्याचा भाव 91000 रुपयांपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. सोन्याच्या किमतीत विक्रमी वाढ होऊन सराफा बाजारात 1 लाख रुपयांची पातळी गाठल्यानंतर फ्युचर्स मार्केटमध्येही सोन्याचा भाव 1 लाख रुपयांपासून थोडा दूर आहे.
2025 वर्षात सोन्याचे भाव सर्वाधिक
2025 मध्ये सोन्याचा परतावा डॉलरच्या दृष्टीने पाहिल्यास, 2025 हे वर्ष आतापर्यंत सोन्यासाठी सर्वोत्तम ठरले आहे. 1980 पासून आतापर्यंतच्या आकडेवारीवर नजर टाकली तर, या वर्षात सोन्याची सर्वाधिक दरवाढ ठरली आहे, ज्यामध्ये सुमारे 33 टक्के वाढ दिसून आली आहे. 2007 मध्ये सोन्याच्या किमतीत 31 टक्क्यांनी वाढ झाली. 2010 मध्येही, सोन्याच्या किमतीने 29 टक्के आणि 2024 मध्ये 27 टक्के मजबूत परतावा दिला आहे.
-
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
IND vs NZ: बुमराह, अन् अक्षरचा फायनलमध्ये जलवा; न्युझीलंडच्या फलंदाजांना कसं केलं गारद? वाचा -
"सुप्रीम कोर्टात फक्त बंगालचीच प्रकरणे आहेत का?"; पश्चिम बंगाल SIR प्रकरणावर सरन्यायाधीशांचा संताप -
घरगुती सिलिंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय -
लाडकी बहीण होणार 'लखपती'; बिनव्याजी कर्ज आणि व्यवसायाची संधी, मुख्यमंत्र्यांनी मांडला मेगा प्लॅन! -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
Todays Horoscope marathi : आज या राशींचे नशीब चमकणार! पाहा सोमवार 9 मार्चचे तुमचे राशीभविष्य -
सोने-चांदीचे दर घसरले! सोने 8,797 रुपयांनी; चांदी चक्क 29,700 रुपयांनी स्वस्त; का घसरत आहेत दर? वाचा -
Kuldeep yadav wedding date : कुलदीप यादव बोहल्यावर चढणार! कोण आहे होणारी पत्नी वंशिका? जाणून घ्या -
पुरुषांनो, 'या' 5 सामान्य लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका; असू शकतो वाढलेल्या प्रोस्टेटचा धोका! -
वयाच्या 30व्या वर्षीच विसरभोळेपणा वाढलाय? सावधान 'ब्रेन' हा आजार असू शकते, जाणून घ्या लक्षणे -
IPL 2026 Schedule : आयपीएलचा थरार 'या' तारखेपासून! RCB विजयाचा गड राखणार का? वाचा संपूर्ण वेळापत्रक








Click it and Unblock the Notifications