Gold mines found : 'या' ठिकाणी सापडलं सोन्याचं भांडार! अनेक साठे सापडले! आता भाव कमी होणार का?
Gold mines found : सोने हा प्रत्येकाच्या आवडीचा विषय..महिला वर्गात सोने हा तर खूपच लोकप्रिय दागिना आहे. अशातच सोन्याचं भांडार असल्याचं पुढं आलं आहे. देशात अनेक ठिकाणी सोन्याचे साठे सापडले असून आता त्याच आसपासच्या परिसरात शोध सुरु आहे. दरम्यान आता सोन्याचे वाढलेले भाव कमी होणार का याचीच चर्चा सुरु आहे.
ओडिशातील अनेक जिल्ह्यांमध्ये सोन्याचे साठे सापडले आहेत. त्यामुळे राज्यातील खाण क्षमतेबाबत मोठी शक्यता व्यक्त केली जात आहे. गुरुवारी खाण मंत्री विभूती भूषण जेना यांनी ओडिशा विधानसभेत ही माहिती दिली.

काय म्हणाले ओडीशाचे खाण मंत्री?
ओडीशाचे खाण मंत्री विभूती भूषण यांनी सांगितले की, काही ठिकाणी सोन्याचे साठे सापडले असून प्राथमिक सर्वेक्षणात मलकानगिरी, संबलपूर आणि बौद्ध जिल्ह्यातही सोन्याचा साठा असण्याची शक्यता दर्शविण्यात आली आहे.
कुठे सापडली सोन्याची खाण
ओडीसा राज्यातील सुनगढ, नबरंगपूर, अंगुल आणि कोरापुट जिल्ह्यात सोन्याचा साठा असल्याचे निष्पन्न झाले आहेत. ओडिशा सरकार या सोन्याच्या साठ्यांबाबत चोख आणि दक्षतापूर्वक शोधकाम करत आहे, ज्यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
कोणत्या जिल्ह्यांमध्ये सोन्याच्या खाणीचा शोध सुरू आहे?
मयूरभंज जिल्ह्यातील जशीपूर, सुरियागुडा, रुआंसी, इदेलकुचा, मारेडीही, सुलीपत आणि बदमपहाड भागात व्यापक शोध सुरू आहे. यापूर्वी, भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (GSI) तांब्यासाठी G-2 स्तरावर शोध घेत होते, त्यावेळी देवगड जिल्ह्यातील अदासा-रामपल्ली परिसरातही सोन्याचे साठे सापडले होते. त्यामुळे केओंजर जिल्ह्यातील गोपूर-गाझीपूर, मंकडचुआन, सालीकाना आणि दिमिरमुंडा भागातही सोन्याच्या खाणीचा शोध सुरू आहे.
सोन्याचे भाव कमी होणार का?
देशात सोन्याची मोठी आयात होते. त्यातच आता सोन्याचे भावही गगणाला भिडले आहेत. दरम्यान, ओडीशात सोन्याचे साठे सापडले आहेत. आता ओडिशा सरकार देवगड जिल्ह्यात लिलावासाठी पहिला सोन्याचा खाण ब्लॉक तयार करत आहे. राज्यातील खनिज क्षेत्रात हा ऐतिहासिक बदल ठरणार आहे. सोन्याच्या सर्वेक्षण अहवालांचे मूल्यमापन केल्यानंतर, तांत्रिक समित्या खाणकाम आणि व्यावसायिक वापरासाठी पुढील शिफारशी करतील. दरम्यान आता सोन्याचे भाव कमी होतील का हीच आशा ग्राहकांना लागून राहीली आहे.
23 मार्च 2025 रोजी काय आहेत सोन्याचे भाव?
सध्या देशातील सर्व शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव 90 हजार रुपयांच्या वर आहे. जर आपण दागिने खरेदी करणाऱ्यांबद्दल बोललो तर 22 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम 82,000 रुपयांच्या पुढे आहे. आज सोन्याचा दर देखील वाचा: सोन्या-चांदीचे भाव शिखरावर पोहोचले, तुमच्या शहरातील 22 कॅरेट सोन्याचा दर किती आहे ते पहा? बाजार तज्ज्ञांच्या मते सोन्या-चांदीच्या दरात आणखी वाढ होईल. या आठवड्यात चांदीच्या दरात नरमाई आली आहे. संपूर्ण आठवड्यात चांदी किलोमागे २ हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे. सध्या देशात एक किलो चांदीची किंमत 1,01,000 रुपये आहे.












Click it and Unblock the Notifications