अदानी ग्रुप AGM 2025 मध्ये गौतम अदानी यांची मोठी घोषणा; सामाजिक परिवर्तनाचा दृष्टिकोन मांडला
अदानी समूहाचे अध्यक्ष श्री गौतम अदानी यांनी 2025 च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) भारताच्या सशस्त्र दलांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आणि समूहाच्या विक्रमी यशाबरोबरच राष्ट्रनिर्मितीला वाहिलेल्या ध्येयधोरणांची प्रभावी मांडणी केली.

सशस्त्र दलांना सलाम, दुर्दैवी घटनांबाबत व्यक्त केला शोक
अदानी यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी श्रद्धांजलीने केली. त्यांनी "ऑपरेशन सिंदूर" दरम्यान दाखवलेल्या भारताच्या संरक्षण दलांच्या पराक्रमाला सलाम करताना सांगितले, "शांती मोफत मिळत नाही; तिची किंमत बलिदानाने चुकवावी लागते.
भारत हे जाणतो आणि आव्हान आल्यावर सामर्थ्याने उत्तर देण्याची भाषा ही देशाला ठाऊक आहे." त्यांनी एअर इंडिया फ्लाइट 171 दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहून, "कृतज्ञता आणि दु:ख" दोन्ही हृदयात साठवण्याचे आवाहन केले.
जगभरातील संकटात भारताची प्रेरणादायी घोडदौड
गौतम अदानी यांनी सांगितले की, जिथे 60 हून अधिक देश राजकीय उलथापालथीत होते आणि पुरवठा साखळी तुटल्याने जागतिक अर्थव्यवस्थांवर परिणाम झाला, तिथे भारत स्थिर धोरणांमुळे वाढीचा दीपस्तंभ ठरला. त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारांच्या दूरदर्शी आणि सुसंगत धोरणांचे याचे श्रेय दिले.
जगभरातून होत असलेल्या चौकशांवर खुलासा
अदानी ग्रीन एनर्जीबाबत यूएस डिपार्टमेंट ऑफ जस्टीस व SEC कडून चौकशी सुरू असताना, कुठलीही कारवाई झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, अदानी समूह आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शासकीय नियमांचे पूर्ण पालन करतो आणि पारदर्शकतेला प्राधान्य देतो.
वित्तीय वर्ष 2025: ऐतिहासिक कामगिरी
- एकूण उत्पन्न: ₹2,71,664 कोटी
- एडजस्टेड EBITDA: ₹89,806 कोटी
- नेट डेट-टू-EBITDA: 2.6x
गौतम अदानी म्हणाले, "आमच्या उद्योगांनी केवळ प्रमाणातच वाढ केली नाही, तर प्रभाव निर्माण केला आणि परिवर्तनाची प्रेरणा दिली."
प्रमुख क्षेत्रांतील यश
- अदानी पॉवर: 100 अब्ज युनिट्स उत्पादन पार; 2030 पर्यंत 31 GW लक्ष्य
- अदानी ग्रीन: खावडामध्ये जगातील सर्वात मोठं हरित ऊर्जा उद्यान; 2030 पर्यंत 50 GW टार्गेट
- ऊर्जा एकत्रित उत्पादन: (थर्मल, रिन्युएबल, पंप्ड हायड्रो) 2030 पर्यंत 100 GW पार
- अदानी एनर्जी सोल्यूशन्स: ₹44,000 कोटींचे ट्रान्समिशन ऑर्डर्स; ₹13,600 कोटींचे स्मार्ट मीटर प्रकल्प
- अदानी न्यू इंडस्ट्रीज: 10 GW क्षमतेचा सोलर मॉड्यूल प्लांट FY26 पर्यंत
- अदानी पोर्ट्स: विक्रमी 450 MMT माल हाताळणी; गतिशक्ती मिशनशी सुसंगत वाहतूक हब उभारणी
- नैसर्गिक संसाधने: 47 मिलियन टन कोळसा आणि लोखंड उत्पादन; FY26 पर्यंत 30% वाढीचे लक्ष्य
- अदानी सिमेंट: होल्सिम संपादनानंतर 100 MTPA क्षमता पार; डबलिंग टार्गेटच्या 72% जवळ
- अदानी एअरपोर्ट्स: 94 दशलक्ष प्रवासी; नवी मुंबई विमानतळाचे चाचणी उड्डाण पूर्ण, लवकरच सुरू
- अदानी डिफेन्स: ऑपरेशन सिंदूरमध्ये ड्रोन आणि अँटी-ड्रोन सिस्टमचा महत्त्वाचा सहभाग
- अदानी डेटा सेंटर्स: हरित ऊर्जेवर चालणारे मोठ्या प्रमाणात केंद्र उभारणी
- अदानी टोटल गॅस: 10 लाख PNG ग्राहक; 3,400 EV चार्जिंग स्टेशन 22 राज्यांमध्ये
- धारावी पुनर्विकास प्रकल्प: आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीचे मॉडेल टाउनशिपमध्ये रूपांतर, 10 लाख नागरिकांना लाभ
भविष्यातील गुंतवणूक आणि सामाजिक बांधिलकी
- पुढील 5 वर्षांत दरवर्षी $15 ते $20 अब्ज भांडवली खर्च
- अदानी हेल्थकेअर टेम्पल्स: अहमदाबाद व मुंबईत 1,000 खाटांची रुग्णालये, मेयो क्लिनिकच्या सहकार्याने
- ₹2,000 कोटींची स्किल युनिव्हर्सिटी - मुण्ड्रामध्ये, ITEES सिंगापूर आणि IGCC सह
- महाकुंभ सेवा: ISKCON च्या सहकार्याने 5,000 अदानी कर्मचाऱ्यांचे लाखो भाविकांना महाप्रसाद
गौतम अदानी यांनी आपल्या भाषणाचा शेवट राष्ट्रभक्तीपूर्ण संदेशाने केला
"अदानी समूहाची खरी ओळख ही उंच इमारतींमध्ये नाही, तर आमच्या मूल्यांमध्ये आणि राष्ट्रसेवेच्या दृढ निश्चयामध्ये आहे. देशाचे भविष्य धोरणपत्रात नव्हे, तर उद्योजकांच्या जोखमी घेण्याच्या ताकदीत लिहिले जाते."
शेवटी त्यांनी सर्व भागधारकांचे आभार मानले आणि सांगितले की, अदानी समूहाची सर्वांत प्रभावी कहाणी "आताच लिहायला सुरुवात झाली आहे".
जय हिंद! भारत माता की जय!












Click it and Unblock the Notifications