काय सांगता दिवाळीत गॅस सिलिंडरचा भडका, तब्बल एवढ्या रुपयांनी झाली वाढ!
दिवाळीच्या काळात देशभरात नागरिकांचे दिवाळे निघणार अशी धक्कादायक बातमी समोर आली आहे. कारण नागरिकांच्या खिशाला आता झळ बसणार आहे. त्याचे कारण असे की, आज 1 नोव्हेंबरपासून तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. 19 किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर आता महागले आहेत. यासह घरगुती सिलिंडरच्या किमतीत काय बदल होणार आहे, वाचा सविस्तर.
तेल कंपन्यांनी जारी केलेल्या ताज्या दरांनुसार गॅस सिलिंडर साधारण 62 रुपयांनी महागले आहे. वावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झालेली असली तर तेल कंपन्यांनी 14 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ केलेली नाही. तेल कंपन्यांनी आणखी एक निर्णय घेतला आहे.

भविष्यात विमान प्रवासही महागणार
तेल कंपन्यांच्या या निर्णयानुसार भविष्यात विमानप्रवास महागण्याची शक्यता आहे. कारण तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरासोबतच विमानप्रवासात वापरल्या जाणाऱ्या एटीएफच्या किमतीतही वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबईत 1754 रुपयांना सिलिंडर
तेल कंपन्यांनी घेतलेल्या दरवाढीनंतर प्रत्येक शहरातील गॅस सिलिंडरच्या किमतीत देखील वाढ होणार आहे. आज 1 नोव्हेंबरपासून दिल्लीत 1 हजार 802 रुपयांना व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळणार आहे तर कोलकातामध्ये 1 हजार 911 रुपयांना तर मुंबईत 1 हजार 754 रुपयांना तर चेन्नईमध्ये 1 हजार 964 रुपयांना व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळणार आहे.
घरगुती सिलिंडरमध्ये काय बदल
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तेल कंपन्यांनी वाढ केली असली तरी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. म्हणजेच 14 किलो गॅस सिलिंडरच्या दरात सध्यातरी कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. दिल्लीत 803 रुपयांना, कोलकातामध्ये 829 रुपयांना, मुंबईत 802 रुपयांना तर चेन्नई घरगुती गॅस सिलिंडर 818 रुपयांना सध्या मिळतेय.












Click it and Unblock the Notifications