व्हॅलेंटाईन वीकमध्येही 'या' तारखेला बँका बंद राहणार? जाणून घ्या फेब्रुवारीत सुट्ट्या कधी आहेत?
February bank holidays 2025 : फेब्रुवारी महिन्यात जर तुम्ही बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम करणार असाल, तर बँका कोणत्या दिवशी बंद आणि सुरु राहणार हे प्रथम जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने फेब्रुवारी 2025 च्या बँक सुट्ट्यांची यादी जारी केली आहे. या महिन्यात एकूण 14 दिवस बँका बंद राहतील, यामध्ये विविध राज्यांच्या साप्ताहिक सुट्या आणि सणांचा समावेश आहे. तरीही टेन्शन घ्यायची गरज नाही कारण इंटरनेट बँकिंग आणि UPI सारख्या सेवा नेहमीप्रमाणे सुरू राहतील.

आरबीआयच्या म्हणण्यानुसार, सरस्वती पूजा, गुरु रविदास जयंती, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, राज दिवस आणि महाशिवरात्री यासारख्या अनेक प्रमुख सणांमुळे फेब्रुवारीमध्ये काही राज्यांमध्ये बँका बंद राहतील. याशिवाय दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारीही देशभरातील बँका बंद राहतील.
फेब्रुवारी 2025 मध्ये बँका कधी बंद राहणार संपूर्ण यादी
- 2 फेब्रुवारी (रविवार) - देशभरात साप्ताहिक सुट्टी
- 3 फेब्रुवारी (सोमवार) - वसंत पंचमीमुळे त्रिपुरामध्ये बँका बंद
- 8 फेब्रुवारी (शनिवार) - दुसरा शनिवार, सर्वत्र बँका भारतात बंद
- 9 फेब्रुवारी (रविवार) - देशभरात साप्ताहिक सुट्टी
- 11 फेब्रुवारी (मंगळवार) - थाईपुसममुळे तामिळनाडूमध्ये बँका बंद
- 12 फेब्रुवारी (बुधवार) - गुरु रविदास जयंतीमुळे हिमाचल प्रदेशातील बँका बंद
- 15 फेब्रुवारी (शनिवार) - लुई-एनगाईनी मुळे मणिपूरमधील बँका बंद
- 16 फेब्रुवारी (रविवार) - देशभरात साप्ताहिक सुट्टी
- 19 फेब्रुवारी (बुधवार) - छत्रपती शिवाजी महाराज जयंती
- 20 फेब्रुवारी (गुरुवार) निमित्त महाराष्ट्रात बँका बंद ) - राज्य स्थापना दिनानिमित्त मिझोराम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये बँक बंद
- 22 फेब्रुवारी (शनिवार) - चौथा शनिवार, भारतभर बँक बंद
- 23 फेब्रुवारी (रविवार) - देशभरात भारतात साप्ताहिक सुट्टी
- 26 फेब्रुवारी (बुधवार) - महाशिवरात्रीमुळे बहुतांश राज्यांमध्ये बँक बंद आहे (त्रिपुरा, तामिळनाडू, सिक्कीम, आसाम, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, नागालँड, पश्चिम बंगाल, दिल्ली, गोवा, बिहार आणि मेघालय वगळता)
- 28 फेब्रुवारी (शुक्रवार) - महाकुंभ चेंगराचेंगरी मुळे गंगटोक (सिक्कीम) मध्ये बँक बंद
व्हॅलेंटाईन सप्ताहातील दिवस
- रोज डे (7 फेब्रुवारी)
- प्रपोज डे (8 फेब्रुवारी)
- चॉकलेट डे (9 फेब्रुवारी)
- टेडी डे (10 फेब्रुवारी)
- प्रॉमिस डे (11 फेब्रुवारी)
- हग डे (12 फेब्रुवारी)
- किस डे (13 फेब्रुवारी)
- व्हॅलेंटाईन डे (14 फेब्रुवारी)
व्हॅलेंटाईन सप्ताहात 4 दिवस बँका बंद
- प्रपोज डे (8 फेब्रुवारी) दुसरा शनिवार, संपूर्ण भारतात बँका बंद
- चॉकलेट डे (9 फेब्रुवारी) - देशभरात साप्ताहिक सुट्टी
- प्रॉमिस डे (11 फेब्रुवारी) - थाईपुसममुळे तामिळनाडूमध्ये बँका बंद
- हग डे (12 फेब्रुवारी) - गुरु रविदास जयंतीमुळे हिमाचल प्रदेशमध्ये बँका बंद
इंटरनेट बँकिंग आणि UPI चालू राहणार
बँक बंद झाल्यामुळे ऑनलाइन बँकिंग सेवांवर परिणाम होणार नाही. तुम्ही नेट बँकिंग आणि UPI द्वारे पैसे पाठवू आणि प्राप्त करू शकता. याशिवाय एटीएममधून पैसे काढण्याची सुविधाही नेहमीप्रमाणे उपलब्ध असेल. तुमच्याकडे बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम असल्यास, वेळेपूर्वीच त्याचे नियोजन करा जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये.












Click it and Unblock the Notifications