फास्टॅग नव्हे आता टोल टॅक्स थेट बँक खात्यातून कटणार; नवी ऑटो डेबिट सिस्टम कधीपासून लागू होणार?
fastag new auto debit system : आता लवकरच महामार्गांवरील टोल प्लाझावर लागणाऱ्या लांब रांगांपासून दिलासा मिळणार आहे. सरकार लवकरच वाहनचालकांसाठी एक नवीन ऑटो डेबिट प्रणाली सुरू करू शकते. या नवीन प्रणालीच्या अंमलबजावणीमुळे टोल प्लाझावर थांबण्याचा त्रास संपेल आणि वाहनचालकांचा मौल्यवान वेळ वाचेल.
सध्या, फास्टॅग रिचार्ज न झाल्यास किंवा कमी बॅलन्स असल्यास, टोल प्लाझावर बराच वेळ जाम होतो. अशा परिस्थितीत, ही समस्या सोडवण्यासाठी, NHAI एक नवीन ऑटो डेबिट प्रणाली लागू करण्याचा विचार करत आहे.

ही नवीन ऑटो डेबिट प्रणाली कशी काम करेल?
सरकार लवकरच टोल प्लाझावर ऑटो डेबिट सिस्टम लागू करण्याचा विचार करत आहे. ज्या अंतर्गत फास्टॅग, स्मार्ट नंबर प्लेट आणि बँक जोडण्याचे काम केले जाईल. म्हणजेच फास्टॅग आणि बँक खाते जोडले जातील. जेव्हा एखादे वाहन टोल प्लाझावरून जाते, तेव्हा त्याची नंबर प्लेट स्कॅन केली जाईल आणि टोल कर आपोआप कापला जाईल. म्हणजेच फास्टॅग खात्याऐवजी टोल टॅक्स थेट बँक खात्यातून कापला जाईल.
ही प्रक्रिया पूर्णपणे स्वयंचलित असेल, ज्यामुळे मानवी हस्तक्षेपाची आवश्यकता राहणार नाही. या प्रणालीच्या अंमलबजावणीमुळे वाहने न थांबता टोल प्लाझावरून जाऊ शकतील आणि वाहतूक कोंडीची समस्या सुटेल.
मल्टी लेन फ्री फ्लो (MLFF) सिस्टम
सरकार मल्टी लेन फ्री फ्लो (MLFF) प्रणालीवरही वेगाने काम करत आहे. ही प्रणाली सॅटेलाईट तंत्रज्ञानाद्वारे स्वयंचलित टोल कर वसूल करण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करेल. ही प्रणाली लागू करण्यापूर्वी डेटा सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी जागतिक निविदा जारी करण्यात आल्या आहेत. या तंत्रज्ञानामुळे भविष्यात टोल कर वसुलीची पद्धत पूर्णपणे बदलेल.
ही नवीन ऑटो डेबिट प्रणाली पुढील महिन्यापासून लागू होण्याची शक्यता आहे. सद्या, सरकार बँका आणि इतर भागधारकांशी चर्चा करत आहे. पहिल्या टप्प्यात, देशातील चार पदरी किंवा त्याहून अधिक पदरी असलेल्या राष्ट्रीय महामार्गांवर ते लागू केले जाईल. या प्रणालीच्या यशानंतर, ती हळूहळू इतर महामार्ग आणि रस्त्यांवर देखील लागू केली जाईल.












Click it and Unblock the Notifications