Fastag annual pass : 3 हजारांत वर्षभर पास, आधीच फास्टॅग आहे; आता काय करायचे? फायदे - तोटे काय? वाचा
Fastag annual pass : फास्ट टॅग प्रणातील येत्या 15 ऑगस्ट 2025 पासून मोठे बदल होत आहेत. आता अवघ्या 3 हजार रुपयांमध्ये वार्षिक FASTag पास उपलब्ध करुन दिला जाणार आहेत. यामुळे टोल प्लाझावरील शुल्क प्रक्रिया आणखी सोपी आणि जलद होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी याबद्दल माहिती दिली आहे.
3 हजार रुपयांमध्ये वार्षिक FASTag पास उपलब्ध करुन दिला जाणार आहेत. हा एक ऐतिहासिक उपक्रम म्हणून, 15 ऑगस्ट 2025 पासून फास्टॅगवर आधारित वार्षिक पासची किंमत ₹3,000 आहे. हा पास सक्रिय झाल्यापासून एक वर्षासाठी किंवा 200 प्रवासांपर्यंत, जे आधी असेल ते वैध असेल असेही म्हटले आहे त्यामुळे काही अटी आणि शर्ती सरकारने ठेवल्या आहेत, मग या योजनेचे फायदे आहेत की, तोटे तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेऊया.

प्रश्न 1: फास्टॅग म्हणजे काय आणि ते कसे कार्य करते?
फास्टॅग ही एक डिजिटल टोल कलेक्शन सिस्टम आहे, जी RFID (रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन) तंत्रज्ञानाचा वापर करते. हा टॅग वाहनाच्या विंडस्क्रीनवर लावला जातो आणि टोल प्लाझामधून जाताना टोल शुल्क आपोआप कापले जाते. यामुळे प्रवासाचा वेळ आणि इंधन दोन्ही वाचते कारण थांबण्याची आवश्यकता नाही.
प्रश्न 2 : फास्टॅग वार्षिक पास कोणाला मिळेल?
हा पास खाजगी (गैर-व्यावसायिक) वाहनांसाठी आहे - जसे की कार, जीप आणि व्हॅन. FASTag वार्षिक पास एक वर्षासाठी वैध असेल आणि या अंतर्गत, प्रवासी एकाच वेळी 200 ट्रिप करू शकतील. हा पास फक्त राष्ट्रीय महामार्ग आणि एक्सप्रेसवेवरील टोल प्लाझावरच वैध असेल.
प्रश्न 3 : या वार्षिक पासची किंमत किती आहे आणि तो कधी उपलब्ध होईल?
पासची किंमत 3, 000 रुपये आहे आणि तो 15 ऑगस्ट 2025 पासून उपलब्ध असेल. तो 1 वर्षासाठी किंवा 200 ट्रिपची वैधता पूर्ण होईपर्यंत वैध असेल.
प्रश्न 4 : FASTag वार्षिक पास कसा सक्रिय करायचा?
जर तुमच्याकडे आधीच FASTag असेल, तर नवीन टॅग खरेदी करण्याची आवश्यकता नाही. हा पास त्याच FASTag वर सक्रिय केला जाईल. लवकरच त्याची सुविधा महामार्ग यात्रा App (राजमार्ग यात्रा App) आणि NHAI/MoRTH वेबसाइटवर उपलब्ध होईल.
प्रश्न 5 : कोणत्या टोलवर पास वैध राहणार नाही?
FASTag वार्षिक पास फक्त राष्ट्रीय महामार्ग आणि एक्सप्रेसवेच्या टोल प्लाझावरच वैध असेल. राज्य महामार्ग किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांवरील टोलवर सामान्य टोल दर लागू होतील.
प्रश्न 6 : लोकांना याचा कसा फायदा होईल?
मंत्रालयाच्या मते, हा पास घेऊन नियमित प्रवासी दरवर्षी ₹ 7,000 पर्यंत बचत करू शकतो. सहसा एका ट्रिपसाठी टोल ₹ 50 असतो, परंतु या पास अंतर्गत, हा प्रभावी खर्च प्रति ट्रिप सुमारे ₹ 15 पर्यंत कमी केला जाईल.
प्रश्न 7 : पासची मुदत संपल्यास काय करावे?
तुम्ही त्याच प्रक्रियेने पुन्हा सक्रिय किंवा नूतनीकरण करू शकता - पुढील पास सुविधा महामार्ग यात्रा App किंवा वेबसाइटवर उपलब्ध असेल.
प्रश्न 8 : फास्टॅगसाठी कोणतेही अतिरिक्त कागदपत्र आवश्यक आहे का?
फास्टॅग वार्षिक पास राष्ट्रीय महामार्ग (NH) आणि एक्सप्रेसवेवर लागू असेल आणि तो राजमार्ग यात्रा App आणि NHAI च्या अधिकृत वेबसाइटवरून खरेदी करता येईल. पास खरेदी करण्यासाठी कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांची आवश्यकता नाही - तो विद्यमान फास्टॅगवर सक्रिय होतो.
-
IPL 2026 csk schedule वेळापत्रक जाहीर; संजू सॅमसन चेन्नईत सामील, पाहा संपूर्ण शेड्युल! -
Eid mubarak 2026 wishes marathi : आपल्या जोडीदाराला पाठवा 'हे' रोमँटिक ईद शुभेच्छा संदेश आणि शायरी! -
केंद्रीय विद्यालयात प्रवेशाची सुवर्णसंधी! 2026-27 सत्रासाठी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर; वाचा डिटेल्स -
Gudi padwa 2026 wishes in Marathi : गुढीपाडव्यानिमित्त नववर्षाचे खास 30 शुभेच्छा संदेश शेअर करा -
गुढी कशी उभारावी? वाचा शास्त्रोक्त पूजा-विधी, शुभ मुहूर्त, मंत्र आणि आरती; करा नववर्षाचे स्वागत -
KVS Admission पालकांनो, केंद्रीय विद्यालयांचा प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी 'ही' कागदपत्रे ठेवा तयार ठेवा -
DA Hike सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात 5% वाढ; पगार वाढणार 'या' राज्याचा मोठा निर्णय -
युद्धाचा भडका! तरीही सोन्याच्या दरात मोठी घसरण! 10 ग्रॅमचा भाव झाला 'एवढा'; पहा मुंबई पुण्याचे दर -
जगातील आनंदी देशांची यादी जाहीर! भारत कितव्या स्थानावर? वाचा भारत की पाकीस्तान कोण जास्त सुखी? -
Eid mubarak 2026 wishes messages marathi ईदचे 25 खास शुभेच्छा संदेश; व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम मेसेसेज -
Gudi Padwa 2026: गुढीपाडवा कधी आहे? का साजरा केला जातो हा सण? जाणून घ्या यामागील रंजक पौराणिक कथा -
'धुरंधर-2' मोडणार सर्व रेकॉर्ड्स! पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर नोटांचा पाऊस; आकडा पाहून व्हाल थक्क!








Click it and Unblock the Notifications