Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

भारत-पाक युद्धजन्य परिस्थिती, ATM 3 दिवस बंद राहणार, व्हायरल मेसेजचे नेमकं सत्य काय?, जाणून घ्या

ATM Fact Check News : भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची स्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे शेअर मार्केट व सराफा बाजारावर देखील त्याचा काही अंशी परिणाम पाहायला मिळत आहे. अशातच एक मेसेज सद्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून देशभरातील एटीएम पुढील दोन ते तीन दिवसांसाठी बंद राहतील असा दावा केला जात आहे. दरम्यान, व्हायरल झालेल्या या मेसेजचे प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) ने खंडन केले आहे. पीआयबीच्या फॅक्ट चेक युनिटने ट्विट करून हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट केले. त्याचबरोबर विविध बॅंकांनी देखील ट्विट द्वारे आमच्या सर्व सेवा कार्यान्वित असतील असा दावा केला आहे.

Fact Check Viral Message

PIB Fact Check (@PIBFactCheck) च्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक पोस्ट समोर आली. त्यात म्हटले की, "एटीएम 2-3 दिवसांसाठी बंद राहतील असा दावा करणारा एक व्हायरल #WhatsApp मेसेज. हा मेसेज बनावट आहे. एटीएम सामान्यपणे काम करत राहतील. पडताळणी न केलेले मेसेज शेअर करू नका, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

सरकारच्या अधिकृत तथ्य-तपासणी संस्थेकडून स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे. अनावश्यक घबराट रोखण्यासाठी आणि जनतेला योग्य माहिती देण्याच्या उद्देशाने त्यांनी हे तथ्य तपासणी केली. पीआयबी वेळोवेळी सोशल मीडियावर पसरणाऱ्या अफवांपासून सावध करत आहे आणि लोकांना फक्त सत्य स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवर विश्वास ठेवण्याचे आवाहन करत आहे.

पंजाब व सिंध बॅंकेनेही केला खुलासा

पंजाब अँड सिंध बँकेनेही त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. लिहिले आहे की 'आमचे एटीएम सामान्यपणे कार्यरत आहेत याची खात्री देण्यासाठी हे आहे. तुम्ही कोणत्याही व्यत्ययाशिवाय सर्व सेवा वापरणे सुरू ठेवू शकता.

पंजाब अँड सिंध बँकेने एका सार्वजनिक सूचनेत लिहिले आहे की, 'प्रिय ग्राहक, तुमच्या लक्षात आणून देण्यात आले आहे की पंजाब अँड सिंध बँकेचे एटीएम सर्व ठिकाणी सामान्यपणे कार्यरत आहेत. एटीएम सेवांमध्ये कोणताही व्यत्यय नाही आणि ग्राहक नेहमीप्रमाणे पैसे काढणे आणि इतर सेवांचा लाभ घेऊ शकतात. कोणत्याही प्रश्नांसाठी किंवा मदतीसाठी कृपया तुमच्या जवळच्या शाखेशी किंवा ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधा.

एसबीआयने देखील सांगितले सत्य

स्टेट बँक ऑफ इंडियाने एक निवेदन जारी केले आहे. एसबीआयने म्हटले आहे की, आमचे एटीएम, सीडीएम आणि डिजिटल सेवा सुरळीत सुरू राहणार आहेत. या सेवा पूर्णपणे कार्यरत आहेत. कोणत्याही बनावट माहितीवर विश्वास ठेवू नका. कोणत्याही समस्येच्या बाबतीत, जवळच्या शाखेला भेट द्या किंवा टोल फ्री क्रमांक १८००१२३४, १८००२१००, १८००११२२११, १८००४२५३८०० वर संपर्क साधा.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+