Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

EPFO's New Rules 2025 : ईपीएफओचे नवीन नियम! ' नोकरी बिनधास्त बदला, PF आपोआप होईल ट्रान्सफर!

EPFO's new rules 2025 : भारतातील संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ही एक मोठी ठेव आहे. नोकरदार व्यक्तींचे इपीएफ कार्यालयात काम पडणार नाही असे कधीच होत नाही. जो नोकरी करतो त्याचा भविष्य निर्वाहाशी संबंध असतो. इपीएफओ कार्यालयात आज ना उद्या काम पडतेच. पीएफ ऑनलाईन झाल्यापासून कार्यालयात आता खेटे मारण्याची गरज नाही हा दिलासा आहे तरीही आता एक मोठी अपडेट आली आहे.

नोकरी बदलताना पीएफ ट्रान्सफर करणे ही एक डोकेदुखी असते आणि ती अनेकांना वाटणे साहाजिक आहे कारण ही प्रक्रीया क्लिस्ट असते. आपल्यालाच कधी कधी यात जास्त लक्ष घालावे लागते पण आता नोकरी तुम्ही बिनधास्त बदलू शकता कारण इपीएफओने त्यांच्या नियमात काही बदल केले आहे, ज्यामुळे तुमचा पीएफ सहज ट्रान्सफर करता येईल.

EPFO s New Rules 2025

2025 मध्ये, ईपीएफओने पाच प्रमुख नियमांमध्ये बदल केले आहेत, ज्याचा थेट परिणाम देशातील 7 कोटींहून अधिक खातेधारकांवर होईल. या बदलांमुळे प्रोफाइल अपडेट, पीएफ ट्रान्सफर, पेन्शन पेमेंट आणि उच्च पगारावरील पेन्शन यासारख्या क्षेत्रांना सोपे आणि पारदर्शक बनवले आहे. आपण हे प्रत्येक बदल तपशीलवार समजून घेऊ.

1. प्रोफाइल अपडेट

आता काही मिनिटांत - कागदपत्रांचा त्रास नाही. जर तुमचा UAN आधारशी लिंक असेल तर तुम्ही आता कोणत्याही कागदपत्राशिवाय नाव, जन्मतारीख, लिंग, वैवाहिक स्थिती यासारखी वैयक्तिक माहिती ऑनलाइन अपडेट करू शकता. हे एका उदाहरणाद्वारे समजून घेऊया. समजा, निकिता (पुणे), हिला लग्नानंतर तिचे आडनाव बदलावे लागले, पूर्वी तिला अनेक फॉर्म भरावे लागत होते आणि एचआरकडून मंजुरी मिळण्यासाठी आठवडे लागत होते. आता तिने जर ईपीएफओ पोर्टलमध्ये लॉग इन केले तर तिचे प्रोफाईल 5 मिनिटांत होते. तेही कोणत्याही कागदपत्रांशिवाय.

अट - ज्यांचे UAN 1 ऑक्टोबर 2017 पूर्वी जारी केले गेले आहे त्यांना काही प्रकरणांमध्ये नियोक्त्याकडून परवानगी घ्यावी लागू शकते.

2. नोकरी बदलताच पीएफ खाते आपोआप ट्रान्सफर

आता नोकरी बदलल्यानंतर तुम्हाला पीएफ ट्रान्सफरसाठी अर्ज करण्याची गरज नाही. ईपीएफओने पीएफ ट्रान्सफर प्रक्रिया स्वयंचलित केली आहे. आता जुन्या किंवा नवीन नियोक्त्याकडून मंजुरी घेण्याची आवश्यकता नाही.

उदाहरण - समजा, निखील पाटील (पुणे) यांनी मार्च 2025 मध्ये त्यांची नोकरी बदलली. ते नवीन कंपनीत रुजू होताच, त्यांचे पीएफ खाते आपोआप ट्रान्सफर झाले. त्याला कोणताही फॉर्म भरावा लागला नाही किंवा त्याला एचआरच्या मागे धावावे लागले नाही.

यासाठी अट काय - या प्रक्रीयेसाठी UAN आधारशी जोडलेले असणे आवश्यक आहे आणि नाव आणि जन्मतारीख बरोबर असणे आवश्यक आहे.

3. संयुक्त घोषणा Joint Declaration प्रक्रिया ऑनलाइन

16 जानेवारी 2025 पासून, EPFO ​​ने JD चे डिजिटलीकरण केले आहे. आता युजर्स चुकीची माहिती (उदा. चुकीचे नाव किंवा जन्मतारीख) ऑनलाइन दुरुस्त करू शकतात.

उदाहरण - समजा, निखील पाटील (पुणे) यांचे नाव ईपीएफमध्ये 'निखिल पाटील' असे लिहिले आहे. प्रथम, त्यांना जेडी फॉर्म भरून ऑफिसमध्ये जावे लागले. आता त्यांनी ही बाब ईपीएफओ पोर्टलवरून ऑनलाइन दुरुस्त केली तील कशी तर फक्त फक्त आधार ओटीपी वापरून.

टीप : जर आधार लिंक केलेला नसेल किंवा सदस्याचा मृत्यू झाला असेल, तर भौतिक प्रक्रिया अजूनही पाळावी लागेल.

4. पेन्शन पेमेंटसाठी नवीन केंद्रीकृत प्रणाली - कोणत्याही बँकेतून पैसे काढा.

1 जानेवारी 2025 पासून, EPFO ​​ने सेंट्रलाइज्ड पेन्शन पेमेंट सिस्टम (CPPS) लागू केली आहे. आता पेन्शन NPCI प्लॅटफॉर्मद्वारे थेट कोणत्याही बँक खात्यात येईल.

उदाहरण - समजा, गणेश पाटील (पुणे) यांना पूर्वी एसबीआयच्या फक्त एकाच शाखेतून पेन्शन मिळत असे. आता तो आयसीआयसीआय बँकेच्या कोणत्याही शाखेतून पैसे काढू शकतील.

फायदा - पीपीओ ट्रान्सफरची आवश्यकता नाही, पेन्शन UAN द्वारे ट्रॅक करता येते आणि जीवन प्रमाणपत्र देखील डिजिटल पद्धतीने दिले जाऊ शकते.

5. उच्च पगारावर पेन्शन मिळण्याची प्रक्रिया सर्वांसाठी समान

उच्च पगारावर पेन्शन मिळविण्यासाठी ईपीएफओने मार्गदर्शक तत्त्वे स्पष्ट केली आहेत. आता अतिरिक्त योगदान देणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना समान प्रक्रियेतून जावे लागेल.

उदाहरण - समजा, निलकांत पाटील (पुणे) यांचा पगार ₹25,००० पेक्षा जास्त होता, परंतु त्यांचे EPF मध्ये योगदान फक्त ₹15,००० पर्यंत होते. त्यांची इच्छा असेल तर ती ईपीएफओच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार अतिरिक्त योगदान देऊन जास्त पेन्शनसाठी पात्र होऊ शकते. ट्रस्ट चालवणाऱ्या कंपन्यांनाही आता हे नियम पाळावे लागतील. यामुळे पारदर्शकता वाढेल आणि पेन्शन मोजणीत एकरूपता येईल.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+