सावधान! PF च्या कामांसाठी सायबर कॅफे, थर्ट पार्टी एजंटची मदत घेऊ नका; ईपीएफओने दिला इशारा! कारण काय?
EPFO warns Do not take help of cyber cafes third party agents for PF related work : देशात जवळपास सात कोटी पीएफ धारक आहेत. या नोकरदारांना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अर्थात ईपीएफ कार्यालयात कधी न् कधी काम पडतेच. त्यासंबंधी कामे ऑनलाईनही करता येतात, पण ही कामे करताना आपण अनेकदा सायबर कॅफेचालक किंवा थर्ड पार्टी एजंटची मदत घेतो. अशावेळी तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) ने आपल्या सदस्यांना पीएफशी संबंधित कोणत्याही कामासाठी सायबर कॅफे किंवा तृतीय-पक्ष एजंटची मदत घेऊ नका असे स्पष्टपणे सांगितले आहे. ईपीएफओचे म्हणणे आहे की अनेक एजंट पैशासाठी हे काम करत आहेत, जे ईपीएफओ वेबसाइट आणि उमंग APP वर पूर्णपणे मोफत उपलब्ध आहे. या गोष्टींसाठी पैसे देण्याची गरज नाही, जे सरकारी पातळीवर पुर्णपणे मोफत आहे.

काय आहे कारण...?
केवायसी अपडेट, क्लेम फाइलिंग, फंड ट्रान्सफर आणि पैसे काढणे यासारख्या सेवांसंदर्भात जे कामं करुन देतात ते एजंट अधिकृत नाहीत आणि त्यांच्याकडून तुमच्या वैयक्तिक माहितीचा गैरवापर होऊ शकतो असे इपीएफओकडून सांगण्यात आले आहे. आपल्या वैयक्तिक माहीतीचा उपयोग करुन दुसरे कुणी आवश्यक त्या गोष्टींचा लाभ घेऊ शकतात. अशावेळी तुम्ही दक्ष असायला हवे.
सायबर कॅफे आणि फिनटेक कंपन्यांकडून धोका!
Good Returns च्या वृत्तानुसार, ईपीएफओने असेही सांगितले आहे की, काही सायबर कॅफे आणि डिजिटल कंपन्या सेवांच्या बदल्यात लोकांकडून फसवणूक करून पैसे आकारत आहेत. यामुळे लोकांची वैयक्तिक आणि बँकिंग माहिती चुकीच्या हातात जाण्याचा धोका वाढतो. सदस्यांना ईपीएफओ वेबसाइट किंवा उमंग APP चा थेट वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
मदत हवी असल्यास ईपीएफओशी थेट संपर्क साधा
जर कोणत्याही सेवेमध्ये समस्या असेल तर ईपीएफओ हेल्पलाइन नंबर, प्रादेशिक कार्यालये आणि जनसंपर्क अधिकाऱ्यांशी संपर्क साधता येईल तसेच त्यांची माहिती ईपीएफओच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे असे इपीएफओकडून सांगण्यात आले आहे.
ईपीएफओने प्रक्रिया केली सोपी
इपीएफओने त्यांच्या प्रक्रियेत अनेक सुधारणा केल्या आहेत, जेणेकरून सदस्यांना कमी वेळेत आणि कमी त्रासात सेवा मिळू शकेल. जानेवारी २०२५ पासून, हस्तांतरण दाव्याच्या प्रक्रियेत म्हणजेच ट्रान्सफर क्लेममध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे, आता बहुतेक प्रकरणांमध्ये नियोक्त्याची मंजुरी आवश्यक नाही.
केवायसी आणि बँक तपशील अपडेट करण्याची सोप्पी प्रक्रिया
- इपीएफओने एप्रिल २०२५ पासून, UAN मध्ये बँक खात्याची माहिती जोडण्यासाठी कंपनीच्या मंजुरीची आवश्यकता देखील रद्द केली आहे. आता दावा करताना बँक पासबूक किंवा चेकचा फोटो अपलोड करण्याची गरज नाही.
- मीडिया रिपोर्टनुसार, EPFO ने आजारपण, लग्न, घर आणि शिक्षण यासारख्या खर्चासाठी आगाऊ दाव्याची ऑटो प्रोसेसिंग मर्यादा १ लाख रुपये केली आहे. २०२४-२५ आर्थिक वर्षात, कोणत्याही कृत्रिम हस्तक्षेपाशिवाय २.३४ कोटी दावे निकाली काढण्यात आले आहेत हे विशेष.
- EPFO ने सांगितले की, तक्रार प्रणाली सक्षम असून आर्थिक वर्ष २०२५ मध्ये EPFiGMS आणि CPGRAMS पोर्टलद्वारे लाखो तक्रारी नोंदवल्या गेल्या आणि ९८ टक्के तक्कारींचा वेळेत निपटारा केला गेला.












Click it and Unblock the Notifications