EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी : आता घरबसल्या डाऊनलोड करा UAN पासबूक; स्टेप-बाय-स्टेप करा ही प्रक्रिया
EPFO UAN Passbook Download Online : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) शी जोडलेल्या कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक सुविधा उपलब्ध झाली आहे. आता तुमच्या पीएफ खात्याचा (PF Account) हिशोब जाणून घेण्यासाठी किंवा पासबुकसाठी ऑफिसात हेलपाटे मारण्याची गरज नाही!
तुमच्या पीएफ खात्यातील जमा रक्कम, कंपनीचे योगदान आणि व्याजाची संपूर्ण माहिती असलेले युएएन (UAN) पासबुक आता तुमच्या मोबाइल किंवा कॉम्प्युटरवर फक्त एका क्लिकवर उपलब्ध आहे. सरकारने आणलेल्या या डिजिटल सुविधेमुळे कर्मचाऱ्यांचा वेळ आणि त्रास दोन्ही वाचणार आहे.

या सुविधेमुळे कर्मचारी त्यांच्या पीएफ खात्यातील जमा रक्कम, कंपनीचे योगदान, व्याज आणि एकूण शिल्लक कधीही तपासू शकतात, म्हणूनच घरी बसून, अवघ्या काही मिनिटांत तुमचे पीएफ पासबुक कसे पाहायचे आणि डाउनलोड कसे करायचे, याची संपूर्ण स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस जाणून घेण्यासाठी पुढे वाचा.
UAN पासबुक का आहे महत्त्वाचे?
UAN पासबुक म्हणजे तुमच्या पीएफ खात्याचा संपूर्ण रेकॉर्ड! यात दर महिन्याला जमा होणारे पैसे, मालकाचा (नियोक्ता) हिस्सा आणि व्याजाची संपूर्ण माहिती असते. नोकरी बदलताना, पीएफ हस्तांतरण करताना किंवा पीएफ क्लेम (दावा) करताना ही पासबुक अत्यंत उपयुक्त ठरते. प्रत्येक EPFO सदस्याने वेळोवेळी आपली पासबुक तपासणे आवश्यक आहे.
महत्वाची गोष्ट म्हणजे पासबुक पाहण्यासाठी तुमचा UAN नंबर ॲक्टिव्ह असणे गरजेचे आहे. तसेच, पीएफ खाते बंद असल्यास किंवा काही विशेष सवलत असल्यास त्याची पासबुक ऑनलाइन दिसत नाही.
UMANG ॲपद्वारे UAN पासबुक कसे पाहावे? ही प्रक्रीया करा
भारत सरकारच्या 'UMANG' (उमंग) ॲपद्वारे पासबुक तपासणे खूप सोपे आहे.
- सर्वात आधी तुमच्या मोबाइलमध्ये UMANG ॲप डाउनलोड करा.
- मोबाइल नंबर टाकून नोंदणी करा आणि लॉगिन करा.
- होम स्क्रीनवर 'EPFO' (ईपीएफओ) सर्च करा.
- कर्मचारी संबंधित सेवांमध्ये (Employee Centric Services) जाऊन "पासबुक" (Passbook) पर्याय निवडा.
- तुमचा UAN नंबर टाका आणि मोबाइलवर आलेल्या OTP (वन टाइम पासवर्ड) ने खात्री करा.
- तुमची पासबुक स्क्रीनवर उघडेल, जी तुम्ही PDF मध्ये सेव्ह करू शकता.
EPFO पोर्टलवरून पासबुक डाउनलोड करण्याची पद्धत
- वेबसाईटच्या माध्यमातून पासबुक पाहणे देखील खूप सोपे आहे.
- EPFO च्या मेंबर पोर्टल (Member Portal) वर जा.
- तुमचा UAN आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा.
- लॉगिन केल्यानंतर तुम्हाला तुमचे सर्व जुने आणि सध्याचे पीएफ खाते दिसतील.
- ज्या खात्याची पासबुक हवी आहे, त्यावर क्लिक करा आणि तुमची EPF पासबुक डाउनलोड करण्यासाठी तयार होईल.
डिजिटल सुविधेचा फायदा
ऑनलाइन UAN पासबुकमुळे कर्मचाऱ्यांचा वेळ आणि मेहनत दोन्ही वाचते. पीएफची शिल्लक जाणून घेण्यासाठी आता कोणावरही अवलंबून राहण्याची गरज नाही. काही क्लिकमध्ये संपूर्ण माहिती तुमच्यासमोर उपलब्ध होते. तुम्ही EPFO सदस्य असाल, तर या डिजिटल सुविधेचा नक्कीच लाभ घ्या आणि तुमच्या पीएफ खात्याची माहिती स्वतः जपून ठेवा.












Click it and Unblock the Notifications