EPFO pension rule : EPFO ची गुड न्यूज! 'या' कर्मचाऱ्यांना मिळणार महिन्याला साडेसात हजार!
EPFO pension rule : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अर्थात 'इपीएफओ'ने कर्मचाऱ्यांना एक गुड न्यूज दिली आहे. आता इपीएओ काही खास कर्मचाऱ्यांना महिन्याला साडेसात हजार रुपये देणार आहे. इपीएफओने घेतलेला हा निर्णय आणि केंद्र सरकारची ही नवीन घोषणा खासगी नोकरदारांसाठी मोठा आधारस्तंभ ठरणार आहे.
कर्मचाऱ्यांच्या भविष्यासाठी मोठा निर्णय
खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या एकूण पगारातील ठाराविक रक्कम कर्मचारी भविष्य निर्वाह निधीत दर महिन्याला रक्कम जमा केली जाते. कर्मचाऱ्यांच्या या पगारातून आणि नियोक्त्याकडून ही रक्कम जमा केली जाते. कर्मचाऱ्यांचे भविष्य सुरक्षित होण्यासाठी ही गुंतवणूक केली जाते. निवृत्तीनंतर त्यांना सन्मानजनक जीवन जगता यावे, कर्मचाऱ्यांच्या आर्थिक गरजा कुणाच्याही आधाराविना पुर्ण व्हाव्यात, हा यामागील मुख्य हेतू आहे.

पीएफच्या पैशांवर बँकेपेक्षा मिळतो जास्त व्याजदर
पीएफमध्ये जमा झालेल्या पैशांवर चांगले व्याजदरदेखील मिळते. EPFO आता असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठीही लवकरच नवीन योजना राबवणार आहे.
या कर्मचाऱ्यांच्या खात्यात दर महिन्याला येणार रक्कम
ईपीएफओ कर्मचाऱ्यांच्या खात्यात साडेसात हजार रुपये जमा करणार आहेत. यासाठी इपीएफओचे काही नियम आहेत. त्यानुसार, ज्या कर्मचाऱ्यांनी किमान 23 वर्षे नोकरी केली, त्यांनाच या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे.
23 वर्षांची नोकरी केल्यास काय मिळणार लाभ
जर तुम्ही 23 वर्षांची सर्व्हिस केली तर तुम्हाला पेन्शन मिळणार आहे. ही रक्कम ईपीएफओकडून दिली जाणार आहे पेन्शन म्हणून ही रक्कम तुम्हाला देण्यात येणार आहे.
दहा वर्षे नोकरी केली तर काय होतो फायदा
ज्या कर्मचाऱ्यांनी दहा वर्षे नोकरी केली आहे त्याच कर्मचाऱ्यांना पेन्शनची रक्कम आप्तकालीन परिस्थितीत काढता येत होती. मात्र, या नियमांमध्येही लवकरच बदल केला जाऊ शकतो. लवकरच आता कर्मचाऱ्यांना हवे तितके पैसे काढता येतील. सध्या घर बांधणे आणि लग्न्न या कारणासाठी कर्मचारी पूर्ण पीएफ काढू शकतील.
पीएफ खात्यात व्याजाचे पैसे जमा झाले का नाही? असे तपासा
- तुमच्या पीएफ खात्यात ठराविक काळानंतर व्याजदर जमा केला जातो.
- पीएफचे व्याजदर हे सर्वाधिक आहे. त्यामुळे तुमच्या खात्यात व्याजदर जमा झाल्यानंतर ते कसे चेक करायचं हा प्रश्न तुम्हाला पडणारच झाला. त्यासाठी तुम्ही खालील स्टेप्स वापरु शकता.
- तुम्ही एसएमएसद्वारे पीएफचे पैसे चेक करु शकतात. यासाठी तुम्हाला 7738299899 या नोंदणीकृत क्रमांकावर मेसेज पाठवावा लागेल.
- त्यानंतर तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये पैसे किती आहेत हे कळणार आहे.
- तुम्हाला रजिस्टर नंबरवरुन AN EPFOHO ENG हा मेसेज पाठवायचा आहे. तुम्हाला मेसेजद्वारे पीएफमधील शिल्लक रक्कमेची माहिती मिळेल












Click it and Unblock the Notifications