EPF Partial Withdrawal: PF खात्यातून पैसे काढायचे आहेत? खूप सोपी आहे प्रक्रिया, या 10 टीप्स फॉलो करा
EPF Partial Withdrawal Process: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) द्वारे चालवल्या जाणाऱ्या ईपीएफ योजनेअंतर्गत मोठा निधी जमा केला जाऊ शकतो. या निधीचा लाभ तुम्हाला निवृत्तीनंतर पेन्शनच्या स्वरूपात मिळतो. तुम्हाला तातडीच्या उपचारांची गरज भासली तरी तुम्ही पीएफ खात्यातून पैसे काढता येतात.
मुलांच्या शिक्षणासाठी पीएफ फंडातूनही पैसे काढता येतात. याशिवाय तुम्ही किंवा तुमचा भाऊ, बहीण किंवा मुलगा किंवा मुलीचे लग्नासाठी तुम्ही तुमच्या पीएफ खात्यातून पैसे काढू शकता. घर खरेदी करण्यासोबतच घराच्या दुरुस्तीच्या कामासाठीही या निधीतून पैसे काढता येतात. सरकारने अलीकडेच वैयक्तिक आर्थिक गरजांसाठी EPF काढण्याची मर्यादा 50,000 वरून 1 लाख केली आहे.

कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत PF खात्यातून गरजेनुसार पैसे कसे काढायचे याबद्दल अनेक कर्मचारी वर्गाला माहिती नसते. त्यासाठी आम्ही तुम्हाला पीएफ खात्यातून कसे काढायचे याबद्दल काही सोप्या टिप्स सांगणार आहोत.
EPF पैसे काढण्यासाठी या 10 टीप्स फॉलो करा
1. सर्वप्रथम EPFO च्या ई-सेवा पोर्टलवर जा.
2. यानंतर तुम्हाला तुमचा UAN (युनिव्हर्सल अकाउंट नंबर) आणि पासवर्डसह EPFO सदस्य पोर्टलवर लॉग इन करावे लागेल.
3. आता तुम्हाला पोर्टलवर विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल जसे तुमचे नाव, जन्मतारीख, पॅन, आधार क्रमांक आणि इतर.
4. त्यानंतर तुम्हाला ऑनलाइन दाव्यासाठी 'प्रोसीड' वर क्लिक करावे लागेल.
5. आता तुम्हाला ड्रॉप-डाउन मेनूमध्ये दिलेला पीएफ ॲडव्हान्स (फॉर्म 31) निवडावा लागेल.
6. येथे तुम्हाला आगाऊ रकमेवर दावा करण्याचे कारण द्यावे लागेल जे आजारपण, शिक्षण किंवा घर खरेदी असू शकते.
7. आता तुम्हाला तुमची इच्छित रक्कम टाकावी लागेल आणि तुमचा वर्तमान पत्ता द्यावा लागेल.
8. त्यानंतर तुम्हाला 'Disclosure Form' वर स्वाक्षरी करावी लागेल.
9. पुढे तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर OTP प्राप्त करण्यासाठी आधार OTP वर क्लिक करावे लागेल.
10. पासवर्ड टाकल्यानंतर, तुम्हाला क्लेम फॉर्म सबमिट करण्यापूर्वी 'Validate OTP' वर क्लिक करावे लागेल.












Click it and Unblock the Notifications