EPFO Minimum Pension Hike : PF पेन्शनर्सना दिवाळीपूर्वी मिळणार मोठी भेट? किमान पेन्शन 'एवढी' होणार
EPFO Minimum Pension Hike : EPFO - कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या पेन्शनधारकांसाठी आता आणखी एक मोठी आनंदाची बातमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पेन्शनर्स कर्मचारी पेन्शन योजना (EPS-95) अंतर्गत मिळणाऱ्या किमान मासिक पेन्शनमध्ये वाढ करण्याची मागणी करत आहेत. सध्या ही किमान पेन्शन रक्कम प्रति महिना १,००० रुपये आहे, पण आता ही रक्कम ७,५०० रुपये होण्याची शक्यता आहे.

पेन्शनमध्ये वाढ करण्याची मागणी
ट्रेड युनियन्स, पेन्शनर संघटना आणि लोकप्रतिनिधींकडून सरकारला किमान पेन्शन वाढवण्याबाबत अनेक विनंत्या प्राप्त झाल्या आहेत. महागाईच्या या काळात पेन्शनर्सना दिलासा देण्यासाठी ही वाढ खूप महत्त्वाची आहे. एका संसदीय समितीने केंद्र सरकारला खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी किमान पेन्शन १,००० रुपयांवरून ७,५०० रुपये करण्याची शिफारस केली आहे.
काय आहे मागणी?
२०१४ मध्ये, किमान पेन्शन २५० रुपयांवरून १,००० रुपये करण्यात आली होती. पण वाढत्या महागाईमुळे ही रक्कम पुरेशी नाही. म्हणूनच, तेव्हापासूनच ट्रेड युनियन्स आणि पेन्शनर संघटनांनी ही रक्कम ७,५०० रुपये करण्याची मागणी लावून धरली आहे.
हेही वाचा : House rent payment service : भाडेकरुंना मोठा झटका! RBI चा नवा नियम 'ही' सेवा झाली बंद, अडचण वाढणार
संसदीय समितीची शिफारस
श्रमविषयक संसदीय स्थायी समितीने सरकारला EPS अंतर्गत किमान पेन्शन वाढवण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले आहे की, २०१४ पासून महागाईमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे आणि पेन्शनर्स व त्यांच्या कुटुंबाची आर्थिक चिंता दूर करण्याची गरज आहे.
थर्ड पार्टी रिव्ह्युव्ह सुरु
सध्या या योजनेचे तिसऱ्या पक्षाकडून मूल्यांकन (Third Party Review) सुरू आहे, जे २०२५ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. हे मूल्यांकन पूर्ण झाल्यानंतर पेन्शन वाढीबाबत निर्णय घेतला जाण्याची अपेक्षा आहे.
दिवाळीपूर्वी निर्णय होण्याची शक्यता?
सध्या तरी दिवाळीपूर्वी पेन्शन वाढीची कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. सरकारने याबाबत कोणतीही अंतिम मुदत सांगितलेली नाही, पण किमान १,००० रुपयांची पेन्शन निश्चित करण्यासाठी अर्थसंकल्पीय मदत सुरूच राहील, असे सरकारने स्पष्ट केले आहे. EPFO मध्ये कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनापैकी १२ टक्के रक्कम दरमहा जमा केली जाते आणि तेवढीच रक्कम नियोक्त्याकडून जमा होते. यापैकी एक हिस्सा पेन्शनसाठी EPS मध्ये जातो.
येत्या काही दिवसांत इपीएफओची बैठक
केंद्रीय भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात इपीएफओ आपल्या सदस्यांसाठी एक मोठी भेट देणार आहे. केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत येत्या काही दिवसांत इपीएफओची मोठी बैठक होणार आहे. या बैठकीत पीएफच्या पैशांसंदर्भात मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे. खास करुन पीएफचे पैसे काढणे कसे सहज होईल याबद्दल धडाकेबाज निर्णयाची शक्यता आहे.
पीएफ एटीएमद्वारे काढण्याची सुविधा मिळणार!
गुड रिटर्ननुसार, ईपीएफओ ३.० (EPFO 3.0) लवकरच सुरू होणार असून, यात अनेक महत्त्वाचे बदल अपेक्षित आहेत. या बदलांमध्ये ए.टी.एम. (ATM) आणि युपीआयच्या (UPI) माध्यमातून पीएफ (PF) चे पैसे काढण्याची सुविधा मिळण्याची शक्यता आहे.












Click it and Unblock the Notifications