श्रीमंतांच्या यादीत एलन मस्क यांनी इतिहास रचला; 400 अब्ज डॉलर्सच्या पुढे नेटवर्थ, कोणाला टाकले मागे
Elon Musk Net Worth : काही दिवसांपूर्वीच अमेरिकेची निवडणूक झाली अन् डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय झाला. या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांची साथ देणारे जगातील सर्वात श्रीमंत एलन मस्क यांची संपत्तीत अतिशय वेगाने वाढ होत आहे. ट्रम्प अध्यक्ष झाले अन् मस्क यांच्यावर जणू पैशांचा पाऊस पडू लागला आहे. कारण, एलन मस्क यांची संपत्ती ही 400 अब्ज डॉलर्सच्या पुढे गेली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकन उद्योगपती एलन मस्क यांची इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचे शेअर्सने उसळी घेतली आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मस्क यांच्या संपत्तीत अतिशय झपाट्याने वाढ होत आहे. संपत्तीच्या बाबतीत तर आता त्यांनी नवा इतिहास रचला आहे. त्याची संपत्ती 400 अब्ज डॉलर्सच्या पुढे गेली आहे. मागीलल 24 तासांबद्दल जाणून घेतले तर एलन मस्क यांची संपत्ती 62 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त वाढली आहे.

मस्क यांच्या संपत्तीचा आकडा किती?
टेस्ला आणि स्पेस X सारख्या कंपन्यांचे मालक एलन मस्क यांनी टॉप श्रीमंतांच्या यादीत सर्वांना मागे टाकले आहे. त्यांची संपत्ती इतकी झाली की, त्यांच्या आता ना पुढे ना त्यांच्या आसपास आहे. अन्य श्रीमंतांच्या व मस्क यांच्या संपत्तीत खूप मोठी तफावत आहे.
निव्वळ संपत्तीबद्दल बोलायचे तर, ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, एलन मस्क यांची एकूण संपत्ती आता 447 अब्ज डॉलर्स आहे. त्यात गेल्या 24 तासांत 62.8 अब्ज डॉलरची (5.32 लाख कोटींहून अधिक) वाढ झाली आहे. त्यामुळे त्यांच्या संपत्तीच्या आसपास अन्य कोणताही उद्योगपती दिसत नाही.
मस्क यांनी या वर्षातच टॉप-10 अब्जाधीशांच्या यादीत दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या श्रीमंतांची जवळपास एकूण संपत्ती कमावली आहे. जर आपण आकडेवारीवर नजर टाकली तर 2024 सालापर्यंत एलन मस्क यांची नेटवर्थमध्ये 218 अब्ज डॉलर्सची बंपर वाढ झाली आहे आणि अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर त्यात अतिशय वेगाने वाढ होताना दिसून येत आहे.
टॉप-10 श्रीमंतांच्या यादीत कोण कोण?
- टॉप-10 श्रीमंतांच्या यादीत 400 अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडला आहे. तर मस्क यांनी टॉप-10 अब्जाधीशांच्या यादीत समाविष्ट असलेल्या इतर टायकूनच्या संपत्तीतही मोठी झेप घेतली आहे.
- ॲमेझॉनचे जेफ बेझोस हे 249 अब्ज डॉलर्ससह जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत.
- फेसबुकचे मार्क झुकरबर्ग यांची संपत्ती 224 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे आणि ते तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत.
- इतर श्रीमंत लोकांमध्ये, लॅरी एलिसन $198 बिलियनसह चौथ्या, बर्नार्ड अर्नॉल्ट $181 बिलियनसह पाचव्या, लॅरी पेज $174 बिलियनसह सहाव्या, बिल गेट्स $165 बिलियनसह सातव्या, सेर्गे ब्रिन ($165 बिलियन) $ 163) बिलियन डॉलर्स) हे आठव्या स्थानावर आहेत.
- जगातील नवव्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती स्टीव्ह बाल्मर असून त्यांची संपत्ती 155 अब्ज डॉलर्स आहे.
- तर दिग्गज गुंतवणूकदार वॉरन बफे यांचे नाव 144 अब्ज डॉलर्ससह दहाव्या स्थानावर आहे.












Click it and Unblock the Notifications