अर्थसंकल्पातून तुम्हाला-आम्हाला काय हवंय? सोन्याचे भाव वाढण्याबरोबर करप्रणालीतही होऊ शकतो बदल

येत्या १ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाईल, अशी शक्यता आहे. यंदाच्या अर्थसंकल्पातून सरकार मोठ्या घोषणा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्यावेळच्या अर्थसंकल्पातही सरकारने स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा वाढवली होती. यावेळी महागाई RBI ने ठरवून दिलेल्या मर्यादेपलीकडे गेली आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकार अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना करात सवलत देऊ शकते, अशी शक्यता आहे.

Budget 2025

टॅक्स स्लॅब बदलण्याची शक्यता

नवीन कर प्रणाली अंतर्गत आयकर स्लॅबमध्ये सरकारकडून बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. करदात्यांना प्रोत्साहित करण्यासाठी सरकार नवीन घोषणा करण्याची शक्यता आहे. 20 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न स्तरावर 30% कर दर लागू केला जाऊ शकतो, असेही काहींचे म्हणणे आहे. जुन्या कर प्रमाणीलीप्रमाणे 0-₹3 लाख: शून्य, 3 ते 7 लाख: 5%, 7 ते 10 लाख 10%, 10 ते 12 लाख 15%, 12 ते 15 लाख 20% आणि १५ लाखांच्या वर ३०% कर आकारला जातो.

वजावट मर्यादाही वाढेल

यंदाच्या अर्थसंकल्पात कलम 80C अंतर्गत कपातीची मर्यादा देखील वाढवली जाऊ शकते. सध्या कलम 80C अंतर्गत कपातीची कमाल मर्यादा 1.5 लाख रुपये आहे. मात्र, महागाई आणि करदात्यांच्या वाढत्या आर्थिक दबावामुळे सरकारने ही मर्यादा आणखी वाढवण्याची मागणी तज्ज्ञ करत आहेत. हे वार्षिक किमान 2 लाख रुपये वाढवता येईल, असेही काहींचे म्हणणे आहे.

सोन्यावरील निर्यात शुल्क वाढेल

भारताच्या व्यापार तुटीच्या चिंतेमुळे, सरकार यंदाच्या बजेटमध्ये सोन्यावरील आयात शुल्क वाढवू शकते. सध्या, भारत सोन्यावर 6% आयात कर लादतो, जो पूर्वीच्या 15% पेक्षा कमी आहे. या शुल्क वाढीमुळे अत्याधिक सोन्याच्या आयातीला आळा बसू शकतो आणि संभाव्यतः देशाचा व्यापार असमतोल कमी होऊ शकतो. परंतु यामुळे देशांतर्गत सोन्याच्या किमती देखील वाढू शकतात, जे आंतरराष्ट्रीय बाजारातील ट्रेंडपासून वेगळे होऊ शकतात.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+