Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

फायद्याची बातमी! दिवाळी धनत्रयोदशी धमाका! 'या' 5 दमदार बाईक्सवर तुफान बचत, तुमच्या खिशाला परवडतील दर

Diwali Dhanteras Offers 5 Best Mileage Bikes : तुमचा नवीन दुचाकी घेण्याचा प्लॅन आहे? मग ही दिवाळी आणि धनतेरस तुम्हाला मालामाल करणारी ठरू शकते! GST कपातीचा डबल फायदा आणि कंपन्यांच्या उत्सवी ऑफर्स मुळे बाईक मार्केटमध्ये अक्षरशः बचत धमाका झाला आहे. ज्या बाईक्सचे स्वप्न तुम्ही पाहत होतात, त्या आता थेट ८० हजार रुपयांपेक्षाही कमी किमतीत उपलब्ध आहेत!

जीएसटी कपातीनंतर दुचाकी खरेदी सोपी झाली आहे. सरकारने आधीच जाहीर केले होते की, चारचाकी वाहने आणि दुचाकीवरील जीएसटी कपात होणार त्यानुसार, आता २२ सप्टेंबरपासून सरकारने वस्तू आणि सेवा करात कपात केली आहे. त्यामुळे गेल्या काही काळात वधारलेले दुचाकी आणि चारचाकीचे भाव आता काहीसे कमी झाले आहेत.

Diwali Dhanteras Bike Offers 5 Best Mileage Bikes

दमदार मायलेज, बेजोड परफॉर्मन्स आणि अटूट विश्वासार्हता देणाऱ्या ५ 'दणकट' बाईक्स तुमच्यासाठी योग्य असू शकतात. तुमचे बजेट कमी असले तरी आता चिंता नाही! कारण किमती आवाक्यात असलेल्या बाईक्स ऐकून खरेदीचा निर्णय तुम्ही घेऊ शकला. दिवाळीला दुचाकी घरी आणण्याची ही उत्तम संधी आहे.

८० हजार रुपयांपेक्षा कमी बजेटमधील ५ 'बेस्ट' बाईक्स

जीएसटी कपात आणि सणासुदीच्या ऑफरमुळे 100cc ते 125cc सेगमेंटमधील या कम्युटर मोटरसायकल आता अधिक परवडणाऱ्या झाल्या आहेत.

बाईकचे नाव खास वैशिष्ट्ये अंदाजित नवी किंमत (एक्स-शोरूम)

१. Hero Splendor Plus कमी खर्च आणि अटूट विश्वासार्हता. सर्वाधिक विक्री होणारी बाईक. ₹७३,९०२ (ड्रम ब्रेक व्हेरिएंट)

२. Bajaj Platina 110 मायलेजचा किंग. दैनंदिन वापरासाठी अतिशय टिकाऊ आणि किफायतशीर. ₹६९,२८४ (ड्रम ब्रेक व्हेरिएंट)

३. Honda Shine 100 उत्तम आणि स्मूथ रायडिंगचा अनुभव. सध्याच्या सर्वात परवडणाऱ्या दुचाकींपैकी एक. ₹६३,१९१

४. Hero Passion Plus Pro स्टायलिश आणि फीचर्सने परिपूर्ण. यात यूएसबी चार्जिंग, मायलेज इंडिकेटर आणि एलईडी हेडलाइट मिळते. ₹७६,६९१

५. Bajaj CT 110X जास्त पॉवर आणि इंजिनची क्षमता हवी असल्यास उत्तम. रफ-टफ वापरासाठी मजबूत. ₹६७,२८४

(टीप: वर नमूद केलेल्या किमती अंदाजित एक्स-शोरूम किमती आहेत. तुमच्या शहरानुसार आणि डीलरशिपनुसार अंतिम ऑन-रोड (On-Road) किमतीमध्ये थोडाफार फरक असू शकतो.)

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+