Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

काय सांगताय! दिवाळीच्या मुहूर्तावर सोने 3 हजारांनी घसरले; चांदी 9 हजारांनी स्वस्त! ग्राहकांना दिलासा

Diwali 2025 gold silver prices drop : दिवाळीच्या मुहूर्तावर सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. आज (सोमवार, २० ऑक्टोबर) इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, सोन्याच्या दरात जवळपास ₹३,००० ची तर चांदीच्या दरात ₹९,००० हून अधिकची मोठी घसरण नोंदवली गेली आहे.

सोन्याच्या दरात मोठी घसरण

सोमवारी २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ₹२,८५४ ने घसरून ₹१,२६,७३० वर पोहोचली. यापूर्वी, १७ ऑक्टोबर रोजी सोन्याने ₹१,२९,५८४ चा सर्वकालीन उच्चांक गाठला होता. विक्रमी उच्चांकावरून सोन्याच्या दरात ही लक्षणीय घसरण झाली आहे.

diwali 2025 gold silver prices drop

चांदीच्या दरात विक्रमी घट

चांदीच्या किमतीतही मोठी घट झाली आहे. आज चांदी ₹९,१३० ने घसरून ₹१,६०,१०० प्रति किलोवर पोहोचली. यापूर्वी चांदीचा भाव ₹१,६९,२३० प्रति किलो होता. विशेष म्हणजे, १४ ऑक्टोबर रोजी चांदीने ₹१,७८,१०० चा सर्वकालीन उच्चांक गाठला होता. सध्याच्या दरानुसार, चांदीचा भाव विक्रमी उच्चांकी दरापासून जवळपास १८,००० रुपयांनी स्वस्त झाला आहे.

सोने खरेदी करताना या दोन गोष्टी लक्षात ठेवा

दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर सोने खरेदी करताना ग्राहकांनी खालील दोन महत्त्वाच्या गोष्टी नक्कीच तपासाव्यात

१. प्रमाणित (हॉलमार्क) सोने खरेदी करा

नेहमी भारतीय मानक ब्युरो (BIS) च्या हॉलमार्कसह प्रमाणित सोने खरेदी करा. हा हॉलमार्क सोन्याचे कॅरेट दर्शवतो आणि त्याची शुद्धता प्रमाणित करतो.

२. किंमत तपासा

खरेदीच्या दिवशी सोन्याचे अचूक वजन आणि त्याची किंमत अनेक विश्वसनीय स्त्रोतांकडून (उदा. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन वेबसाइट) तपासा. सोन्याच्या किमती २४ कॅरेट, २२ कॅरेट आणि १८ कॅरेटनुसार वेगवेगळ्या असतात, याची खात्री करा.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+