गणेश चतुर्थीच्या दिवशी आज सोन्याचे दर वाढले की कमी झाले? जाणून घ्या सोन्या-चांदीचे ताजे भाव

Did gold prices increase or decrease today on Ganesh Chaturthi : आज, गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर सोन्याच्या दरात चढ-उतार दिसून आले आहेत. भारतीयांसाठी सोने हे केवळ एक दागिना नसून एक सुरक्षित गुंतवणूक देखील आहे. आजच्या काळातही अनेक लोक सोन्याला संकटकाळात आधार देणारा एक महत्त्वाचा घटक मानतात. आजच्या या बदललेल्या दरांमुळे खरेदीदार आणि गुंतवणूकदार दोघांचेही लक्ष सोन्या-चांदीच्या बाजारावर लागून आहे.

Gold prices rise or fall today

आजचे सोन्या-चांदीचे दर (२७ ऑगस्ट २०२५):

  • २४ कॅरेट सोने: ₹ १०,२२२ प्रति ग्रॅम
  • २२ कॅरेट सोने: ₹ ९,३७१ प्रति ग्रॅम
  • १८ कॅरेट सोने: ₹ ७,६६८ प्रति ग्रॅम
  • चांदी: ₹ ११९.९० प्रति ग्रॅम

    Did gold prices increase or decrease today

    प्रमुख शहरांमधील सोन्याचे दर (१ ग्रॅम)

    (शहर) (२४ कॅरेट) (२२ कॅरेट) (१८ कॅरेट)

    • मुंबई ₹ १०,२४४ ₹ ९,३९० ₹ ७,६८३
    • पुणे ₹ १०,२४४ ₹ ९,३९० ₹ ७,६८३
    • नागपूर ₹ १०,२४४ ₹ ९,३९० ₹ ७,६८३
    • नाशिक ₹ १०,२४७ ₹ ९,३९३ ₹ ७,६८६
    • जळगाव ₹ १०,२४४ ₹ ९,३९० ₹ ७,६८३
    • दिल्ली ₹ १०,२५९ ₹ ९,४०५ ₹ ७,६९५
    • बंगळूर ₹ १०,२४४ ₹ ९,३९० ₹ ७,६८३
    • लखनऊ ₹ १०,२५९ ₹ ९,४०५ ₹ ७,६९५
    • जयपूर ₹ १०,२५९ ₹ ९,४०५ ₹ ७,६९५
    • कोलकाता ₹ १०,२४४ ₹ ९,३९० ₹ ७,६८३

    सोन्याच्या भाववाढीचा या वर्षातील प्रवास कसा आहे?

    या वर्षी आतापर्यंत सोने २४,५४१ रुपयांनी महाग झाले आहे. डिसेंबर २०२४ मध्ये सोन्याचे दर ७६,१६२ रुपये प्रतितोळा होते. या वर्षी म्हणजेच १ जानेवारीपासून आतापर्यंत, २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ७६,१६२ रुपयांवरून १ लाख ७०३ रुपयांवर पोहोचले आहे. म्हणजेच २४,५४१ रुपयांची वाढ या नऊ महिन्यात झाली आहे. डिसेंबर २०२४ मध्ये चांदीची किंमत ८६,०१७ रुपये प्रति किलो होते. हे भाव कालपर्यंत २९ हजार २३३ रुपयांनी वाढून ते आता १ लाख १५ हजार २५० रुपयांवर पोहोचले आहेत.

    सोन्याचे दर गेल्या चार वर्षांत गगनाला भिडले

    सोन्याचे दर गेल्या चार वर्षांत गगनाला भिडले आहेत. आता सोन्याचे भाव लाखांजवळ पोहचले आहेत. त्यामुळे सोन्याचे दर वाढले तेवढे खूप झाले आता वाढणार नाहीत, असे कुणी जर वक्तव्य करत असेल तर ते साफ खोटे ठरणार आहे. कारण सोन्याचे भाव आगामी पाच वर्षात डोळे विस्फारतील एवढे वाढणार असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

    किती होऊ शकतात सोन्याचे दर?

    मिंटच्या वृत्तानुसार, जागतिक संघर्ष आणि युद्धजन्य भू-राजकीय तणाव आणि अमेरिकन डॉलरपेक्षा मध्यवर्ती बँकेच्या विविधतेमुळे तो वाढतच राहील आणि पाच वर्षांत तो प्रति १० ग्रॅम सव्वा दोन लाखांपर्यंत पोहोचू शकतो, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+