Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

दही, दूधाच्या भावापेक्षा कमी झाले क्रूड ऑईलचे रेट! Petrol, डिझेलच्या दरावर काही परिणाम झाला का? वाचा

Petrol and Diesel Rate : क्रुड ऑईल आणि पेट्रोल, डिझेलचा परस्पर संबंध आहे. अशातच जर क्रूड आईलच्या किमती कमी झाल्या आणि भाव स्थीर राहीले तर देशात पेट्रोल - डिझेलच्या किमती कमी होऊ शकतात असे संकेतच काही दिवसांपुर्वी एका कार्यक्रमात केंद्रीय पेट्रोलीयम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी संकेत दिले होते.

आता क्रूड आईलचे दर घटले आहेत. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरावर काही परिणाम झाला का? संभाव्य स्थिती काय असेल याबद्दल आपण जाणून घेऊया.

Petrol and Diesel Rate

दही, दुधापेक्षा स्वस्त झाले क्रूड आईल

सध्या बाजारात उच्चप्रतिच्या दुधाचा दर 70 रुपये प्रतीलीटर आहे तर दह्याचा दर 80 रुपये प्रतीलिटर इतका आहे. परंतु आश्चर्याची बाब म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलचा भाव त्यापेक्षाही स्वस्त म्हणजे 65 रुपये इतका झाला आहे. त्यामुळे आता याचा पेट्रोल डिझेलवर काय परिणाम झाला हे लक्षात घेऊया.

पेट्रोल-डिझेलच्या दरावर काही परिणाम झाला का?

आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड आईलचे दर जरी घसरुन 65 रुपयांवर आले असले तरीही पेट्रोल -डिझेलच्या दरात आज 15 एप्रिल 2025 तरी काही परिणाम झालेला दिसत नाही. पेट्रोल आणि डिझेलचे दर देशात काल जेवढे होते तेवढेच आहेत. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थीरच आहेत. ते कमी झालेले नाही.

उत्पादन शुल्कात वाढ पण सरकारचा दिलासा

केंद्रातील एनडीए सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ केली केली आहे आणि ती लागूही केली आहे मात्र, याचा बोझा सरकारने ग्राहकांवर टाकला नाही हा दिलासा मात्र सामान्यांना दिला आहे. तर दुसरीकडे पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी काही शक्यता सांगून इंधनदर कमी होऊ शकतात असे म्हटले आहे.

आजचे पेट्रोल भाव किती? (petrol price in maharashtra)

महाराष्ट्रात आज पेट्रोलचे भाव

महाराष्ट्रात (मुंबई) आजचा पेट्रोलचा दर ₹103.50 प्रति लिटर आहे. कालच्या तुलनेत पेट्रोलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. 1 डिसेंबर 2024 पासून किमती स्थिर ठेवून, महाराष्ट्रात मागील सलग 4 महिन्यांपासून दर अपरिवर्तित राहिले आहेत.

महाराष्ट्रात आज डिझेलचे भाव किती? (Diesel-price in maharashtra)

महाराष्ट्रात (मुंबई) आजचा डिझेलचा दर ₹90.03 प्रति लीटर आहे. कालच्या तुलनेत डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. 1 डिसेंबर 2024 पासून किमती स्थिर ठेवून, महाराष्ट्रात मागील सलग 4 महिन्यांपासून दर स्थीर आहेत.

पेट्रोलियम मंत्र्यांकडून दर कपातीचे संकेत

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी संकेत दिले होते की, कच्चा तेलाच्या किंमती कमी झाल्या आहेत. याचा फायदा भारताला होईल आणि पर्यायाने देशातील तेल विपणन कंपन्या पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्याच्या स्थितीत आहेत.

पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात किती रुपयांनी वाढले आहे?

पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रतीलिटर 2 रुपये वाढ झाली आहे.

महाराष्ट्रात आज पेट्रोलचे भाव किती आहे?

महाराष्ट्रात (मुंबई) आजचा पेट्रोलचा दर ₹103.50 प्रति लिटर आहे.

महाराष्ट्रात आज डिझेलचे भाव किती आहे?

महाराष्ट्रात (मुंबई) आजचा डिझेलचा दर ₹90.03 प्रति लीटर आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+