Budget 2025: 1 फेब्रुवारी रोजी सादर होणार अर्थसंकल्प! बजेटची सर्व अपडेट्स डेलीहंटवर उपलब्ध
Budget 2025 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन भारतासाठी सर्वात जास्तवेळा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणाऱ्या पहिल्या महिला ठरणार आहेत. 1 फेब्रुवारी 2025 रोजी, त्या एनडीए सरकारचा पहिला आणि वैयक्तिक आठवा सर्वसमावेशक अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
2025-26 या आर्थिक वर्षासाठी, सरकारने वित्तीय तूट कमी करण्यासाठी आणि गुंतवणुकीला चालना देण्यासाठी भांडवली खर्चात वाढ करणे अपेक्षित आहे. 2025 च्या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा अपेक्षित आहेत.

2017 पासून, केंद्रीय अर्थसंकल्प दरवर्षी फेब्रुवारीच्या पहिल्या दिवशी जाहीर केला जातो. भारतीय राज्यघटनेच्या कलम 112 नुसार सरकारने 1 एप्रिलपासून सुरू होणारे आणि 31 मार्च रोजी संपणाऱ्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपूर्वी संसदेसमोर संपूर्ण अर्थसंकल्प सादर करणे अनिवार्य असते. यामुळे आर्थिक नियोजनात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व निश्चित होते.
नोकरीपासून योजनांपर्यंत मिळणार प्रोत्साहन
नोकऱ्यांपासून योजनांपर्यंत एमएसएमई (MSME) सह रोजगार निर्मिती आणि उद्योगांना आगामी काळात चालना मिळेल. पीएलआय योजनेच्या माध्यमातून अर्थसंकल्पाला प्राधान्य दिले जाणे अपेक्षित आहे. याव्यतिरिक्त, नागरिकांचे आर्थिक स्वातंत्र्य वाढवण्यासाठी मोठ्या सरकारी उपक्रमांसाठी निधी वाढणे अपेक्षित आहे. पगारदार व्यक्तींना महागाई आणि जागतिक अनिश्चिततेचा सामना करण्यास मदत करतील, अशी अपेक्षा आयकर सवलत आणि शिथिलता देखील आहे.
भारतात, अर्थसंकल्प सामाजिक न्याय, समानता आणि संतुलित आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतो. त्याचे महसूल आणि भांडवली बजेट असे दोन भाग आहेत. साधन सामग्रीचे गरजेनुसार, कार्यक्षमतेने वाटप करून, नोकऱ्या निर्माण करणे आणि गरिबी कमी करून जलद, शाश्वत विकास साधण्याचे उद्दिष्ट अर्थसंकल्पाचे आहे. यासह किमतींवर नियंत्रण ठेवून संपत्ती आणि उत्पन्नातील असमानता दूर करण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पाद्वारे होतो.
'डेलीहंट' वर बजेट 2025 चे लेटेस्ट अपडेट मिळवा
सरकारने अर्थसंकल्पाद्वारे केलेल्या प्रयत्नांमुळे आर्थिक विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे कारण भारत 2027-28 पर्यंत 5 ट्रिलियन डाॅलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट ठेवत आहे. या उपक्रमांची रचना मुख्य आर्थिक चालकांवर लक्ष केंद्रित करून सर्व नागरिकांसाठी शाश्वत वाढ आणि समृद्धीनिश्चित करण्यासाठी केली गेली आहे.
अर्थसंकल्पाशी निगडीत बातम्या आणि घडामोडींसह प्रत्येक अपडेट्स डेलीहंट बजेट 2025 वर मिळणार आहे. तुम्हाला रिअल-टाइम अपडेट्स, बातम्या, व्हिडिओ आणि विश्लेषणासह बजेटचे संपूर्ण कव्हरेज जाणून घेता येणार आहे. त्यासोबत, डेलीहंटवर तुम्हाला 2025 च्या अर्थसंकल्पाशी संबंधित सर्व अपडेट्स आणि सखोल लेखांचा आनंद घेण्याची संधी आहे. डेलीहंट या वर्षीही अर्थसंकल्प लाईव्ह सादर करणार आहे. त्यामुळे अर्थसंकल्पाशी संबंधित सर्व महत्त्वाच्या माहितीच्या थेट कव्हरेजसाठी Dailyhunt शी कनेक्ट रहा..












Click it and Unblock the Notifications