Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या साडीची चर्चा, मधुबनी कलेचा केला सन्मान, जाणून घ्या खास कनेक्शन

Nirmala Sitharaman Madhubani saree : अर्थमंत्री निर्मला सीतारामन या त्यांच्या कारकिर्दीतला आठवा अर्थसंकल्प सादर करत आहेत. जेव्हा जेव्हा त्या बजेट सादर करतात तेव्हा तेव्हा त्यांच्या साडीचीही चर्चा होते. प्रत्येक बजेटमध्ये त्यांच्या साडीचे रंग बदलतात. याचा अर्थही आहे. असं म्हणतात की त्यांच्या साडीचा नेहमीच बजेटशी काहीतरी संबंध नक्कीच असतो.

तर आज त्या अर्थसंकल्प सादर करत असून त्यांनी अर्थसंकल्पाची कॉपी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासमोर सादर केली आहे. त्यावेळी त्यांच्या अंगावर परिधान केलेली साडी देखील विशेष आहे. गेल्या सात वर्षांत, सीतारमण यांनी त्यांच्या उत्कृष्ट साड्यांच्या संग्रहाने अर्थसंकल्पाच्या दिवशीच्या मथळ्यांमध्ये स्थान मिळवले आहे.

Budget 2025

निर्मला सीतारमण यांनी मधुबनी कलेचा सन्मान केला

त्यांच्या ८ व्या अर्थसंकल्पासाठी, सीतारमण यांनी एक सुंदर पांढरी साडी परिधान करून एक कलाकृतीची उत्कृष्ट नमुना निवडला. पद्मश्री पुरस्कार विजेत्या दुलारी देवी यांनी भेट म्हणून दिलेली साडी परिधान करून त्यांनी मधुबनी कलेला आदरांजली वाहिली.

मिथिला आर्ट इन्स्टिट्यूटमध्ये एका क्रेडिट आउटरीच कार्यक्रमादरम्यान अर्थमंत्र्यांनी देवी यांची भेट घेतली, जिथे त्यांनी बिहारच्या समृद्ध मधुबनी कला परंपरेबद्दल विचार मांडले.

कोण आहेत दुलारी देवी?

बिहारमधील मिथिला चित्रकार दुलारी देवी दलित समुदायातील आहेत. दुलारी देवी मधुबनी जिल्ह्यातील रांती गावात राहतात आणि त्या ५९ वर्षांच्या आहेत. दुलारी देवींना शालेय शिक्षणही मिळालेले नाही. जेव्हा त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळत होता तेव्हा त्यांना ते काय आहे हे देखील माहित नव्हते.

🔴 दुलारी देवीने तिच्या आयुष्यात खूप गरिबी पाहिली आहे. दुलारी देवी २५ वर्षे करपुरी देवी आणि महासुंदरी देवी यांच्या घरी सफाई कामगार म्हणून काम करत होत्या. या काळात त्यांनी मधुबनी चित्रे काढायलाही शिकले. येथून दुलारी देवीला मधुबनी चित्रकलेची आवड निर्माण झाली.

🔴 मच्छीमार समुदायातील असूनही, दुलारी देवी यांनी मिथिलाची प्रसिद्ध कला मधुबनी चित्रकला शिकली आणि आज त्या राष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त कलाकार बनल्या आहेत.

गेल्या काही वर्षात बजेटदिवशी परिधान केलेल्या साडीचे काय होते वैशिष्ट्ये

  • नीर्मला सीतारमण यांनी फायनान्स मिनिस्टर झाल्यानंतर 2019 साली पहिल्याच बजेटला गुलाबी रंगाची आणि सोनेरी बॉर्डरची साडी नेसली होती. या साडीला मंगलागिरी साडी असं म्हणतात. गुलाबी रंग स्थिरता आणि गंभीरता दर्शवतं. स्थिरता जी विकासदरात दिसली. 2019 मध्ये 3.87 टक्के होती 2023 मध्ये ती वाढून 7.3 टक्क्यांवर पोहोचली.
  • "2020 च्या दुसऱ्या बजेटला निर्मला सीतारमण यांनी नेसलेली पिवळ्या-सोनेरी रंगाची सिल्क साडी देखील खूपच चर्चेत होती. या साडीला आकाशी रंगाची हलकी बॉर्डर आहे. भारतीय परंपरा आणि शास्त्रांमध्ये पिवळा रंग शुभ मानला जातो. याशिवाय रंगांची खासियत बघितली तर पिवळा रंग समृद्धी आणि आनंदाचे प्रतीक आहे. 2020 वर्ष कोरोना महासाथीचं. अशा परिस्थितीत, पिवळ्या साडीत देशात लाल खाती प्रत्येकासाठी समृद्धी आणू शकते, असा विश्वास होता. नवीन उर्जा, चांगलं भविष्य याचा विश्वास त्यांनी दिला.
  • 2021 च्या बजेटला त्या लाल रंगाची पोचमपल्ली साडी नेसल्या होत्या. असे मानले जाते की अर्थमंत्री सीतारामन अनेकदा महत्त्वाच्या दिवशी लाल साडी नेसतात. भारतीय परंपरेत लाल रंग हा शक्ती, ऊर्जा आणि प्रेमाचा रंग मानला जातो. हा अधिकाराचा रंग देखील आहे आणि त्वरित आकर्षित करणारा देखील आहे. हा रंग नेहमीच सामर्थ्य आणि आत्मविश्वासाशी संबंधित आहे.
  • 2022मध्ये त्यांची साडी पारंपारिक दक्षिण भारतीय शैलीत मरून आणि केशरी रंगाची होती. ज्यामध्ये मरून रंगाची बॉर्डर होती आणि मधला भाग नारंगी होता. या साडीला चंदेरी रंगाची बॉर्डर होती. ही साडी ओडीसाची असल्याचं सांगितलं जातं. या साडीला बोमकाई किंवा सोनपुरी साडी असं देखील म्हणतात. ही साडी त्यांच्या आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्वाला वेगळा रंग देत होती. केशरी रंग लाल आणि पिवळ्या रंगाचे मिश्रण आहे. लाल रंग आपल्याला दृढनिश्चय देतो. पिवळ्या रंगामुळे सात्विक प्रवृत्तीचा विकास होतो. जिथे भगवा रंग हा भाजपचा रंग मानला जातो, तिथे तो हिंदुत्वाशी निगडित पवित्र रंग मानला जातो. मरून रंगाचा अर्थ स्थिरता आणि शक्ती. याचवर्षी आर्थिकरित्या आपला देश अधिक मजबूत झाला आणि जगातील सगळ्यात मोठी पाचवी अर्थव्यवस्था बनला.
  • गेल्या वर्षी 2023 साली त्यांनी लाल आणि काळ्या रंगाची साडी नेसली होती. हा रंग शौर्य आणि ताकदीचं प्रतीक आहे. हा रंग शक्ती, सामर्थ्य आणि संकल्पाचा रंग. या वर्षाच्या शेवटी अर्थमंत्री जगातील सगळ्यात शक्तिशाली महिलांच्या यादीत समाविष्ट झाल्या. त्या 32 व्या क्रमांकावर होत्या.
  • आता 2024 च्या अर्थसंकल्पात त्या निळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या साडीत दिसल्या. निळा रंग हा शांतता, स्थिरता, प्रेरणेचं प्रतीक आहे.
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+