यंदाच्या अर्थसंकल्पात तुमच्या खिशाला किती बसणार झळ! मागील 5 वर्षात काय स्वस्त काय महाग झाले? वाचा
Budget 2025 in Marathi : देशाच्या संसदेत आज अर्थसंकल्पिय अधिवेशनाला सुरुवात झाली. 1 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करतील. आज अधिवेशनाला सुरुवात होण्याआधी पंतप्रधान नरेंद मोदी यांनी माध्यमांशी संवाद साधून अर्थसंकल्पात 2047 चे विकासविषयक उद्दीष्ट्य ठेवण्यात आल्याचे सांगितले. यातून महिला आणि तरुणांना फायदा होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या अधविशेनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणातून उद्या अर्थसंकल्पात काय होणार याचा अंदाजही लागतो. आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी विकासाची त्रिसूत्री मांडली. उद्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण वैयक्तिक आठवा अर्थसंकल्प मांडणार आहेत. आपण उद्या काय स्वस्त आणि काय महाग होणार हे जाणून घेऊया. यासह मागील पाच वर्षात काय महाग झाले अन् काय स्वस्त हे जाणून घेऊया.

2025-2026 संभाव्य शक्यता - हे होऊ शकते स्वस्त
- ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स
- वैद्यकीय विमा
- जीवन विमा
- सोने चांदी
- EV-कार, 3-वाहन
- फार्मा
काय महाग होऊ शकते
- आयातित फिन्निश व्हाईट गुड्स
- वैद्यकीय उपकरण
- सेमीकंडक्टर
- सिगारेट
- आयात केलेली खेळणी
अर्थसंकल्प 2024-25 मध्ये काय झाले होते स्वस्त -महाग?
स्वस्त
- मोबाईल फोन
- महत्वपूर्ण खनिजं
- सौर उपकरण
- समुद्री उत्पादन
- मौल्यवान धातू
महाग
- अमोनियम नाईट्रे़ट
- प्लाॅस्टीक
- उपकरण
अर्थसंकल्प 2023-24 मध्ये काय झाले होते स्वस्त -महाग?
स्वस्त
- टिव्ही
- स्मार्टफोन
- गॅस
- चारा
- हिरे
- इव्हीएससाठी लिथियम आयर्न मशनरी
महाग
- नकली दागिने
- पर्यटन
- विद्यूत चिमणी
- तांब्याचा माल
अर्थसंकल्प 2022-23 मध्ये काय झाले होते स्वस्त -महाग?
स्वस्त
- नकली दागिने
- संगणक
- मोबाईल फोन
- पेट्रोलियमशी निगडीत रसायन
- पाॅलिश केलेले हिरे
महाग
- छत्री
- आयात केलेल्या वस्तू
- अमिश्रीत इंधन
- स्मार्टवाॅच आणि त्याचे इयरबड
अर्थसंकल्प 2021-22 मध्ये काय झाले होते स्वस्त -महाग?
स्वस्त
- सोने
- चांदी
- चमड्याचे उत्पादन
- कपड़े
- स्टील आणि तांबे
महाग
- सौर सेल
- मोबाईल फोन आणि चार्जर
- आयातीत रत्न आणि मौल्यवान दगड
- आयात केलेले फ्रिज काॅम्प्रेसर आणि एसी
- आयात केलेले ऑटो पार्ट्स
अर्थसंकल्प 2020-21 मध्ये काय झाले होते स्वस्त -महाग?
स्वस्त
- साखर
- स्किम्ड दूध
- सोया फायबर
- सोया प्रोटीन
- मादक पेयपदार्थ
- त्यावर आधारित उत्पादन
- वर्तमानपत्राचा कागद
- शुद्ध टेरेफ्थेलिक अॅसिड
महाग
- संशोधनाची उपकरण
- बुट
- भिंतीवरील पंखे
- सिगारेट आणि तंबाखू उत्पादन
- चिनी मातीची भांडी
- सीव्ही पार्ट्स












Click it and Unblock the Notifications