Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Budget 2025 in Marathi Updates : अर्थसंकल्पात 5 मोठ्या घोषणा! वाचा सविस्तर काय म्हणाल्या अर्थमंत्री?

Budget 2025 in Marathi Updates : केंद्रीय अर्थसंकल्प वाचनाला सुरुवात झाली असून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या मोदी 3.0 चा दुसरा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करत आहेत. अर्थमंत्र्यांनी आज सकाळी बरोबर 11 वाजता संसदेत देशाचा अर्थसंकल्प वाचनास सुरुवात केली.

अर्थमंत्री सीतारमण यांचे हे सलग आठवा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पातून सामान्यांपासून ते विशेष वर्गापर्यंत विविध क्षेत्रात सुधारणा आणि प्रोत्साहनांची अपेक्षा आहे. अर्थंसकल्पात 'आमचे लक्ष आरोग्य आणि रोजगारावर आहे' असे सीतारामन म्हणाल्या.

Budget 2025 in Marathi Updates

अर्थसंकल्पात कृषी, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात मोठ्या घोषणा होऊ शकतात. वाढती महागाई आणि जागतिक मंदीच्या भीतीच्या पार्श्वभूमीवर, सर्वांच्या नजरा या अर्थसंकल्पावर आहेत.

बजेटमधील 5 मोठ्या घोषणा

1. पुढील 6 वर्षे मसूर आणि तूर यासारख्या डाळींचे उत्पादन वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल

2. कापसाचे उत्पादन वाढवण्याचे 5 वर्षांचे ध्येय, यामुळे देशाचा वस्त्रोद्योग बळकट होईल.

3. किसान क्रेडिट कार्डवरील कर्ज मर्यादा 3 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये करण्यात येईल.

4. बिहारमध्ये मखाना बोर्ड स्थापन केले जाईल, याचा फायदा लहान शेतकरी आणि व्यापाऱ्यांना होईल.

5. लघु उद्योगांसाठी विशेष क्रेडिट कार्ड, पहिल्या वर्षी 10 लाख कार्ड जारी केले जातील.

अपडेट्स

  • उडीद आणि मसूर डाळींच्या उत्पादनासंदर्भात विशेष लक्ष दिलं जाणार - निर्मला सीतारामन
  • कापूस उत्पादकता मिशनची घोषणा
  • शेतकऱ्यांना विज्ञान आणि सर्व क्षेत्रातून मदत मिळणार
  • किसान क्रेडीट कार्डद्वारे अल्पकाळासाठी कर्ज मिळणार
  • किसान क्रेडीट कार्डद्वारे अल्पकाळासाठी आता तीन लाखांची मर्यादा हटवली, पाच लाखांपर्यंत कर्ज मिळणार
  • भारतीय टपालखात्यांद्वारे ग्रामीण अर्थव्यवस्थेला उभारी देणार
  • एमएसएमईसाठी वर्गिकरण मानधनासाठी संशोधन
  • सुक्ष्म उद्योगांसाठी पाच लाखांचे क्रेडीटकार्ड, पहिल्या वर्षात दहा लाख क्रेडिट कार्ड वाटणार

काय स्वस्त झालं

- टीव्ही, मोबाईल, औषध आणि इलेक्ट्रिक कार होणार स्वस्त, अर्थसंकल्पात घोषणा.

- मोबाईल फोन, एलईडी, एलसीडी टीव्ही , चामड्याच्या वस्तू स्वस्त होणार आहेत.

- 36 जीवनावश्क औषधांना करामध्ये सूट जाहीर, कॅन्सरची औषधं स्वस्त होणार, कॅन्सरच्या 36 औषधांवरची कस्टम ड्युटी हटवली.

- पुढील आठवड्यात सरकार नवीन आयकर विधेयक आणणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जाहीर केलं. नव्या आयकर विधेयकाचा टॅक्स स्लॅबशी संबंध नाही. नवीन बिल म्हणजे आयकराच्या पद्धतीत बदल.

- शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता, किसान क्रेडिट कार्डची वाढली मर्यादा, कृषी क्षेत्रात आत्मनिर्भरतेचा नारा

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+