नवीन कर विधेयकाबाबत मोठी अपडेट; उद्या मोदींच्या उपस्थितीत मंत्रिमंडळाची बैठक, मंजुरी मिळणार?
Big update on the new tax bill : 2 फेब्रुवारी 2025 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी नवीन कर विधेयक मांडले जाण्याची घोषणा केली. त्यानुसार आता पंतप्रधान कार्यालयाकडून मोठी अपडेट मिळत आहे. उद्या होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत नवीन कर विधेयकाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
मोदी 3.0 चा 2025 चा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या होत्या की, नवीन कर विधेयक पुढील आठवड्यात सादर केले जाईल. आता याबाबत एक मोठी अपडेट आली आहे. या प्रकरणाशी संबंधित सूत्रांकडून असे सांगितले जात आहे की, उद्या शुक्रवारी होणाऱ्या मोदी मंत्रिमंडळाच्या बैठकीत नवीन आयकर विधेयकाला मंजुरी मिळू शकते.

10 तारखेला सादर होऊ शकते विधेयक
अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नवीन आयकर विधेयकाची माहिती दिली. आता, मंत्रालयाच्या सूत्रांकडून मिळालेल्या वृत्तानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत याला मान्यता मिळू शकते आणि सोमवारी लोकसभेतही ते सादर केले जाऊ शकते.
नवीन विधेयकात काय असू शकते?
सरकारने आधीच नवीन कर विधेयकाबाबत माहिती दिलेली आहे. नवीन आयकर विधेयकात कोणताही नवीन कर लादण्याची तरतूद नसेल. त्याऐवजी, नवीन विधेयकात फक्त कर रचना तर्कसंगत आणि सोपी केली जाईल. मिळालेल्या माहितीनुसार, सध्याच्या आयकर कायद्यात अनेक नवीन सुधारणांची तरतूद असेल आणि अनेक गुन्ह्यांसाठी शिक्षा कमी करण्याची तरतूद देखील असू शकते.
या विधेयकाचा मुख्य उद्देश काय आहे?
या विधेयकाद्वारे सरकारचे उद्दिष्ट सामान्य करदात्यांसाठी कर प्रणालीत पारदर्शकता आणणे आणि १९६१ चा आयकर कायदा सोपा, स्पष्ट आणि समजण्यासारखा बनवणे हा मुख्य उद्देश सांगितला जात आहे.
नवीन कर व्यवस्था (नवीन कर व्यवस्था 2025)
- 0-4 ०%
- 4-8 -5%
- 8-12 - 10%
- 12-16 - 15%
- 16-20 - 20%
- 20-24 - 25%
- 24 पेक्षा जास्त - 30%
जुनी कर व्यवस्था
- 0 ते 2.5 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न: 0 %
- 2.5 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न: 5 % -
- 5 लाख रुपयांपासून 10 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न: 20 %
- 10 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न: 30 %












Click it and Unblock the Notifications