एफडी करण्याची मोठी संधी, सर्व बॅंका आणताहेत जास्त व्याजदराची खास स्किम, हा होईल फायदा!
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी नुकतेच आरबीआयच्या अधिका-यासोबत झालेल्या बैठकीत बॅंकांतील घटलेल्या ठेवींबाबत चिता व्यक्त केली होती. ठेवी वाढवण्यासाठी बॅंकांनी आकर्षक योजना सुरु कराव्यात असे अर्थमंत्र्यांनी सांगितले.तसेच कर्जही फक्त त्याच लोकांना दिले गेले पाहिजे ज्यांना त्याची गरज आहे असेही म्हटले होते.
सरकारच्या या निर्देशानंतर सर्व बॅंका ठेवींबाबत गंभीरतेने विचार करत आहेत. नजिकच्या काळात फक्त कर्जे महाग केली जाणार नाहीत तर एका नंतर एक असा फिक्स्ड डिपाॅझिट लाॅंच करण्यासोबतच ठेवींवर आकर्षक व्याज दिले जाण्याची शक्यता देखील आहे.

आरबीआयच्या डेटानुसार, बॅंकिग सिस्टिममध्ये कर्जांची वृद्धि जवळजवळ 13.7 टक्के आणि ठेवींचा वेग वार्षिक 10.6 टक्के एवढा आहे. याविषयी अनेक वेळा चिंता व्यक्त करण्यात आली आहे. नुकतेच बॅंक आॅफ महाराष्ट्र, आरबीएल बॅंक, फेडरल बॅंकेसह तामिळनाडू मर्केंटाईल बॅंकेसहीत अनके लहान बॅंकांनी मुदत ठेवीच्या स्किम्स लाॅंच केल्या आहेत
बँका सुरु करत आहेत विशेष एफडी योजना
फेडरल बँकेने 400 दिवसांच्या कालावधीसाठी 7.35 टक्के, 777 दिवसांच्या कालावधीसाठी 7.40 टक्के आणि 50 महिन्यांची विशेष योजना सुरू केली आहे. या सर्व योजनांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना 0.50 टक्के अतिरिक्त व्याज मिळेल. दरम्यान, 400 दिवसांसाठी 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त ठेवींवर 7.50 टक्के व्याज दिले जात आहे.
याशिवाय 777 दिवस आणि 50 महिन्यांच्या कालावधीसाठी 7.55 टक्के व्याज दिले जाईल. आरबीएल बँकेने विजय ठेव योजना सुरू केली आहे. यामध्ये 500 दिवसांच्या कालावधीसाठी 8.10 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 8.60 टक्के व्याज मिळणार आहे.
मोठ्या बॅंकांनीही वाढविले एफडीवरील व्याजाचे दर
बँक ऑफ महाराष्ट्रने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जाहीर केले आहे की ते 777 दिवसांच्या ठेवींवर 7.25 टक्के व्याज देणार आहेत. याशिवाय तमिळनाडू मर्कंटाइल बँक 400 दिवसांच्या कालावधीसाठी 7.50 टक्के व्याजदर देत आहे. बंधन बँकेने 21 महिन्यांच्या कालावधीसाठी विशेष एफडी योजनेवर 8 टक्के व्याज देण्याची घोषणा केली आहे. याआधी एचडीएफसी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदासह मोठ्या बँकांनीही विशेष एफडी योजना सुरू केल्या आहेत.












Click it and Unblock the Notifications