Bank Holidays May 2025 : मे महिन्यात कोणत्या राज्यात कधी असणार बॅंकांना सुट्टी, वाचा शहरनिहाय यादी
Bank Holidays in India and Maharashtra, May 2025 : भारतीय रिझर्व्ह बँकेने 2025-2026 या आर्थिक वर्षाच्या अधिकृत सुट्टीच्या कॅलेंडर जाहीर केलेले आहे. त्यात मे-2025 साठी 13 बँक सुट्ट्या निश्चित केल्या आहेत, ज्यामध्ये राष्ट्रीय आणि प्रादेशिक सुट्ट्यांचा समावेश करण्यात आलेला आहे.
भारतातील बँक सुट्ट्या तपशीलवार आहेत आणि त्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या नियमांनुसार निश्चित केल्या जातात. ज्यामघ्ये विविध प्रादेशिक आणि राष्ट्रीय उत्सवांचा समावेश करण्यात आलेला असतो. मे महिन्यात राष्ट्रीयकृत बॅंकांना तेरा सुट्ट्या असणार आहे, त्या कुठे व कशा आहेत, याविषयी जाणून घेऊया अन् समजून घेऊया..!

मे-2025 मध्ये भारतातील बँक सुट्ट्यांची संपूर्ण शहरवार यादी
ग्राहकांना आणि व्यवसायांना मे 2025 मध्ये त्यांच्या आर्थिक व्यवहारांचे नियोजन करण्यास मदत करण्यासाठी राज्यानुसार बँक सुट्ट्यांची तपशीलवार शहरवार यादी पुढे आलेली आहे. त्याची संपूर्ण यादी खालीलप्रमाणे आहे. जाणून घ्या सविस्तर..!
- 1 - मे 1 गुरुवार कामगार दिन : बेलापूर, बेंगळुरू, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद (आ.प्र.), हैदराबाद (टी.एस.), इंफाळ, कोची, कोलकाता, मुंबई, नागपूर, पणजी, पटना, तिरुअनंतपुरम.
- 2 - मे 4 रविवार : अनिवार्य साप्ताहिक देशभर सुट्टी
- 3 - मे 7 बुधवार : पंचायत निवडणूक 2025 गुवाहाटी
- 4 - मे 9 शुक्रवार : रवींद्रनाथ टागोर यांचा वाढदिवस कोलकाता
- 5 - मे 10 दुसरा शनिवार अनिवार्य साप्ताहिक देशभर सुट्टी.
- 6 - मे 11 रविवार अनिवार्य साप्ताहिक देशभर सुट्टी.
- 7 - मे 12 सोमवार : बुद्ध पौर्णिमा अगरतळा, ऐझॉल, बेलापूर, भोपाळ, देहरादून, इटानगर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, रायपूर, रांची, शिमला, श्रीनगर.
- 8 - मे 16 शुक्रवार : राज्य दिन गंगटोक
- 9- मे 18 रविवार : अनिवार्य साप्ताहिक देशभरात सुट्टी
- 10 - मे 24 चौथा शनिवार अनिवार्य साप्ताहिक देशभरात सुट्टी.
- 11- मे 25 रविवार अनिवार्य साप्ताहिक देशभरात सुट्टी
- 12- मे 26 सोमवार काझी नजरुल इस्लाम यांचा वाढदिवस आगरतळा
- 13 - मे 29 गुरुवार महाराणा प्रताप जयंती शिमला












Click it and Unblock the Notifications