ऑगस्टमध्ये बँकांना 15 दिवस सुट्ट्या! तुमच्या कामाचे नियोजन आताच करा; महाराष्ट्रात किती सुट्ट्या?वाचा
Bank Holiday August 2025 : ऑगस्ट महिन्याला आता काही तासच शिल्लक आहेत. ऑगस्ट हा सण-उत्सवाचा महिना. हा महिना मराठी कॅलेंडरनुसार, श्रावणाचा महिना आहे, या महिन्यात जास्तीत जास्त सण असल्याने यंदा सुट्ट्याही भरमसाट आल्या आहेत. त्यामुळे बँका जवळपास १५ दिवस बंद राहतील. त्यामुळे बँकींगशी संबंधित कामे असतील तर त्याचे नियोजन खाली दिलेली सुट्ट्यांची यादी पाहूनच करावी लागणार आहे.
देशात १५ दिवस जरी बँका बंद असल्या तरीही या सुट्यांत शनिवार आणि रविवारच्या साप्ताहिक सुट्ट्यांचा समावेश आहे. तसेच सर्व सुट्ट्या सर्व राज्यांमध्ये लागू नसतील, तर राज्यातील सण-उत्सव आणि धोरणानुसार त्या लागू असतील. म्हणजेच काही सुट्ट्या विशिष्ट राज्यांमधील स्थानिक सणांवर अवलंबून असतील. त्यामुळे बँकेची कामे करण्यापूर्वी तुमच्या राज्यानुसार सुट्ट्यांची यादी तपासणे महत्त्वाचे आहे. जर तुमची कामे खोळंबू नये असे वाटत असेल तर तुम्ही या यादीकडे एक नजर फिरवा..

ऑगस्ट २०२५ मधील संभाव्य बँक सुट्ट्यांची यादी : (Bank Holiday August 2025 )
ऑगस्ट महिन्यात बँकांना खालील दिवशी सुट्टी असण्याची शक्यता आहे:
- ८ ऑगस्ट (शुक्रवार): तेंडोंग ल्हो रम फाट (गंगटोक)
- ९ ऑगस्ट (शनिवार): रक्षाबंधन आणि झुलन पौर्णिमा (काही राज्यांमध्ये)
- १० ऑगस्ट (रविवार): साप्ताहिक सुट्टी
- १३ ऑगस्ट (बुधवार): देशभक्त दिन (इंफाळ)
- १५ ऑगस्ट (शुक्रवार): स्वातंत्र्य दिन (देशभरात)
- १७ ऑगस्ट (रविवार): साप्ताहिक सुट्टी
- १९ ऑगस्ट (मंगळवार): महाराजा बीर बिक्रम यांची जयंती (आगरतळा)
- २३ ऑगस्ट (शनिवार): चौथा शनिवार
- २४ ऑगस्ट (रविवार): साप्ताहिक सुट्टी
- २५ ऑगस्ट (सोमवार): श्रीमंत शंकरदेव यांची तारीख (देहरादून)
- २७ ऑगस्ट (बुधवार): गणेश चतुर्थी (काही राज्यांमध्ये)
- २८ ऑगस्ट (गुरुवार): नुआखाई आणि गणेश चतुर्थी (भुवनेश्वर, पणजी)
- ३१ ऑगस्ट (रविवार): महिन्याचा शेवटचा रविवार
महाराष्ट्रात किती सुट्ट्या?
राज्यानुसार सुट्ट्यांमध्ये फरक आहे, तरीही १५ सुट्ट्यांपैकी जवळपास ५ रविवार आणि एक दुसरा आणि एक चौथा शनीवार अशा दोन म्हणजेच एकूण सात सुट्ट्या तर साप्ताहिकच असतील तर याशिवाय १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन, २७ ऑगस्ट गणेश चतुर्थी या सुट्ट्याही असतील आणि या महाराष्ट्रात लागू राहतील. म्हणजेच ऑगस्टमध्ये जवळपास ९ साप्ताहिक साप्ताहिक असेल. एका राज्यात मोठा उत्सव असताना दुसऱ्या राज्यात तो सामान्य दिवस असू शकतो. त्यामुळे तुमच्या राज्यानुसार सुट्ट्यांची यादी तपासणे आवश्यक आहे.
ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्रात कधी आहेत सुट्ट्या?
ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्रात ३, ९, १०, १५, १७, २३, २४, २७, ३१ या तारखेला सुट्ट्या असतील. यामध्ये ९ आणि २३ अनुक्रमे दुसरा आणि चौथा शनीवार तर १५ आणि २७ ऑगस्टला अनुक्रमे स्वातंत्र्य दिन आणि गणेश चतुर्थी आहे तर उर्वरित रविवारच्या सुट्या आहेत.












Click it and Unblock the Notifications