Ayushman Vaya Vandanan :70 वर्षावरील नागरिकांना मोफत उपचार! सरकारच्या आयुष्मान वय वंदन योजनेचा फायदा
Ayushman Vaya Vandana Card : राष्ट्रीय आरोग्य जर चांगले असेल तर त्यामुळे हेल्थ आणि हॅपी इंडेक्स चांगला राहतो, खासकरुन अर्थव्यवस्थेसाठी आणि विकासासाठी या गोष्टी खूपच महत्वाच्या असतात. देशाची लोकसंख्या ही ताकद असते तर युवकांचे विकासाचा रथ पुढे नेण्यात महत्वाचे योगदान असते तसेच ज्येष्ठ नागरिक हे ज्ञानाचे भांडार आणि अनुभवाची शिदोरी असतात, त्यांची काळजी घेणे हे राष्ट्रीय कर्तव्य असते. ज्येष्ठांचे वय आणि त्यांचा थांबलेला रोजगार, वेतन यामुळे त्यांना आर्थिक समस्यांही असतात, तर वाढत्या वयानुसार व्याधींची समस्या त्यामुळेच त्यांच्या वैद्यकीय गरजा पुर्ततेसाठी केंद्र सरकारने आयुष्यमान वय वंदन योजना सुरु केलेली आहे.
भारतात वाढत्या वृद्ध लोकसंख्येला आणि त्यांच्या उपचारांवरील खर्चाला लक्षात घेऊन, कोणत्याही ज्येष्ठ नागरिकाला पैशाअभावी उपचारांपासून वंचित राहावे लागू नये, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.आज आपण ही योजना काय आहे, त्याची पात्रता काय आहे आणि मोफत उपचारासाठी काय करावे हे जाणून घेऊया.

'आयुष्मान वय वंदना कार्ड': ७० वर्षांवरील ज्येष्ठांसाठी मोफत उपचार
केंद्र सरकारने ७० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी 'आयुष्मान वय वंदना कार्ड' सुरू केले आहे. या कार्डद्वारे, त्यांना दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंतच्या वैद्यकीय खर्चावर मोफत उपचारांची सुविधा मिळणार आहे.
'आयुष्मान वय वंदना कार्ड' म्हणजे काय?
'आयुष्मान वय वंदना कार्ड'म्हणजे'आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY)' अंतर्गत सुरू करण्यात आलेली एक विशेष सुविधा आहे. या योजनेत सरकारी आणि खाजगी अशा हजारो रुग्णालयांचा समावेश आहे, जिथे ज्येष्ठ नागरिक मोफत उपचार घेऊ शकतात.
या कार्डचा लाभ कोण घेऊ शकतो?
- ज्यांचे वय ७० वर्षे किंवा त्याहून अधिक आहे.
- ज्यांच्याकडे आधार कार्ड आणि मोबाईल नंबर आहे.
- जे भारताचे स्थायी रहिवासी आहेत.
कार्डसाठी अर्ज कसा करावा?
तुम्ही 'आयुष्मान भारत ॲप' वापरून घरबसल्या या कार्डसाठी अर्ज करू शकता.
१. 'Ayushman App' मोबाईलवर इंस्टॉल करा.
२. 'लाभार्थी' (beneficiary) म्हणून लॉग इन करा.
३. तुमचा मोबाईल नंबर आणि कॅप्चा (captcha) भरा.
४. तुमच्या मोबाईलवर आलेल्या OTP (वन टाइम पासवर्ड) द्वारे लॉग इन पूर्ण करा.
५. आता तुमचं नाव, आधार नंबर आणि राज्याची माहिती भरा.
६. जर तुमचं नाव सिस्टीममध्ये नसेल, तर e-KYC (आधार-आधारित ओळख) साठी OTP चा वापर करा.
७. पिन कोड आणि कुटुंबातील सदस्यांचे तपशील जोडा.
८. सर्व माहिती भरल्यानंतर अर्ज सबमिट करा.
अर्ज स्वीकार झाल्यावर, तुम्ही ॲपमधूनच तुमचं 'आयुष्मान वय वंदना कार्ड' डाउनलोड करू शकता.
-
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!







Click it and Unblock the Notifications