August 1 2025 Rule change : 1 ऑगस्टपासून LPG गॅस, बँक व्याजदर ते UPI पेमेंटपर्यंत हे 5 बदल होणार
August 1 2025 Rule change : प्रत्येक महिन्याचा पहिल्या दिवशी विशिष्ट गोष्टींमध्ये बदल होत असतात, पेट्रोल कंपन्या इंधन दर ठरवतात, तर एलपीजी गॅसच्या किमतीही पुन्हा नव्याने ठरवल्या जातात. ऑगस्ट महिन्यातही एलपीजी (LPG) सिलिंडरच्या किमती, यूपीआय (UPI) पेमेंट नियम, क्रेडिट कार्डचे (Credit Card) फायदे, तसेच सीएनजी (CNG) आणि पीएनजी (PNG) च्या किमती आणि बँकांचे व्याजदर अशा पाच महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये बदल होणार आहेत.
१ ऑगस्टपासून होणाऱ्या बदलांचा सर्वसामान्य नागरिकांच्या आर्थिक जीवनावर थेट परिणाम होणार आहे. त्यामुळे या बदलणाऱ्या गोष्टी प्रत्येकाला माहित असणे आवश्यक आहे, म्हणूनच आम्ही नेमके काय बदल होणार याची सविस्तर माहिती देत आहोत आपण ती जाणून घेऊन संभाव्य बदलांना सामोरे जाऊ शकाल.

१. एलपीजी सिलिंडरच्या किमतीत बदल
दर महिन्याच्या पहिल्या तारखेला तेल कंपन्या एलपीजी सिलिंडरच्या दरांची (LPG Cylinder Prices) समीक्षा करतात. त्यानुसार, १ ऑगस्ट २०२५ पासून घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती बदलणार आहेत. या बदलाचा थेट परिणाम तुमच्या स्वयंपाकघरातील बजेटवर होईल. अनुदानित (Subsidized) आणि विनाअनुदानित (Non-subsidized) अशा दोन्ही प्रकारच्या सिलिंडरच्या किमतींमध्ये बदल अपेक्षित आहे.
२. यूपीआय पेमेंट नियमांमध्ये बदल
१ ऑगस्टपासून यूपीआय पेमेंटच्या (UPI Payments) नियमांमध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे. या बदलांमुळे डिजिटल व्यवहार अधिक सोयीस्कर होतील, असे म्हटले जात आहे. अहवालानुसार, GPay, PhonePe, Paytm यांसारख्या यूपीआय ॲप्सवर (UPI Apps) एका दिवसात ५० पेक्षा जास्त वेळा बॅलन्स तपासण्यावर मर्यादा येऊ शकते. तसेच, मोबाइलशी जोडलेल्या बँक खात्यातील शिल्लक दिवसातून २५ पेक्षा जास्त वेळा तपासण्यावरही मर्यादा येऊ शकते.
३. क्रेडिट कार्डच्या विमा फायद्यांमध्ये कपात
१ ऑगस्ट २०२५ पासून क्रेडिट कार्डवर (Credit Cards) मिळणाऱ्या काही विमा (Insurance) फायद्यांमध्ये कपात होणार आहे. यामध्ये महत्त्वाचा बदल म्हणजे, क्रेडिट कार्डवर मिळणारे मोफत हवाई अपघात विमा कव्हर (Free Air Accident Insurance Cover) बंद केले जाईल. ज्या व्यक्ती प्रवासासाठी किंवा इतर कारणांसाठी या विम्यावर अवलंबून होते, त्यांच्यासाठी हा एक महत्त्वाचा बदल ठरेल.
४. सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीत बदल
तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतात. १ ऑगस्ट २०२५ पासून सीएनजी (Compressed Natural Gas) आणि पीएनजी (Piped Natural Gas) यांच्या किमतींमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम वाहनचालकांवर आणि घरगुती गॅस वापरणाऱ्या ग्राहकांवर होईल.
५. व्याजदरांमध्ये बदल
ऑगस्ट महिन्यात रिझर्व्ह बँकेच्या (Reserve Bank of India) चलनविषयक धोरण समितीची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर आरबीआयचे गव्हर्नर (RBI Governor) व्याजदरांविषयी (Interest Rates) महत्त्वपूर्ण घोषणा करतील. व्याजदरातील बदलांचा थेट परिणाम तुमच्या कर्जाचे हप्ते (EMIs) आणि बँक ठेवींवरील (Bank Deposits) व्याजावर होईल, ज्यामुळे तुमच्या मासिक बजेटवर परिणाम होऊ शकतो.












Click it and Unblock the Notifications