जानेवारी 2025 पासून Amazon प्राइम मेंबरशिपच्या नियमात बदल, येथे सर्वकाही जाणून घ्या
Amazon Prime : आजकाल डिजिटलच्या काळात इंटनेटमूळे सर्व जग जवळ आलं आहे. तंत्रज्ञानाच्या काळात तुमच्या स्मार्टफोनवर सर्वकाही सहज उपलब्ध होत. त्यामुळे अनेक जण थिएटरमध्ये जाण्याऐवजी आपल्या आवडीचा कंटेट मोबाईलवर पाहणे पसंत करतात. तुम्ही जर Amazon Prime सदस्य असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.
तुम्ही जर तुमचे Amazon Prime अकाउंट मित्र किंवा कुटुंबियांसोबत शेअर करत असाल तर तुम्हाला या प्लॅटफॉर्मचे काही नवीन नियम फॉलो करावे लागतील. हे नियम थोडे कडक आहेत, पण Netflix इतके कडक नाही. खरं तर, Amazon ने जाहीर केले आहे की, जानेवारी 2025 पासून Amazon प्राइमचे सदस्य त्यांच्या अकाउंट 5 डिव्हाइसेसवर लॉग इन करू शकतील, ज्यापैकी दोन डिव्हाइस फक्त टेलिव्हिजन असू शकतात.

याचा अर्थ असा की आता तुम्ही एका वेळी दोन टीव्हीवर प्राइम व्हिडिओ पाहू शकाल आणि तिसऱ्या टीव्हीवर लॉग इन केल्यावर तुम्हाला दुसऱ्या डिव्हाइसवरून लॉग आउट करावे लागेल.
Amazon ने आपल्या नवीन धोरणात म्हटले आहे की, जानेवारी 2025 पासून Prine Video वापरण्यासाठी प्रत्येक अकाउंटमध्ये जास्तीत जास्त 5 उपकरणे असतील, त्यापैकी फक्त दोन टीव्हीचा समावेश असेल. याचा अर्थ तुम्ही एकाच वेळी दोन टीव्हीवर प्राइम व्हिडिओ पाहू शकाल. याव्यतिरिक्त, जर तुम्हाला ही सेवा अधिक उपकरणांवर वापरायची असेल, तर तुम्हाला दुसरी प्राइम मेंबरशिप खरेदी करावी लागेल.
दरम्यान सध्या Amazon प्राइम सदस्यांना एका वेळी 10 डिव्हाइसेसवर लॉग इन करण्याची परवानगी आहे, ज्यामध्ये फोन, लॅपटॉप, टॅब्लेट आणि टीव्ही समाविष्ट आहेत. परंतु जानेवारी 2025 पासून ग्राहक प्राइम व्हिडिओ फक्त 5 डिव्हाइसवर वापरू शकतील, त्यापैकी 2 डिव्हाइस फक्त टीव्ही असू शकतात.
Amazon च्या नवीन धोरणांतर्गत तुम्ही कोणत्याही 30-दिवसांच्या कालावधीत तुमच्या अकाउंटमधून जास्तीत जास्त 2 डिव्हाइस काढू किंवा बदलू शकता. याचा अर्थ असा की तुमच्या अकाउंटमध्ये नोंदणीकृत डिव्हाइस असल्यास तुम्हाला 30 दिवसांच्या आत दोन डिव्हाइसेस काढण्याची किंवा बदलण्याची परवानगी दिली जाईल. डिव्हाइस नोंदणी आणि अकाउंट सुरक्षिततेवर चांगले नियंत्रण सुनिश्चित करण्यासाठी वारंवार बदल मर्यादित करणे हा यामागचा उद्देश आहे.
भारतात Amazon प्राइम सबस्क्रिप्शनची किंमत 299 रुपये मासिक, 599 रुपये तिमाही आणि 1,499 रुपये वार्षिक आहे. याशिवाय वार्षिक प्राइम लाइट प्लॅन 799 रुपयांना आणि प्राइम शॉपिंग एडिशन 399 रुपयांना उपलब्ध आहे. जानेवारी 2025 मध्ये लागू होणाऱ्या धोरणांतर्गत प्राइम व्हिडिओ सदस्यत्व अमर्यादित जाहिरात-मुक्त स्ट्रीमिंग आणि 5 डिव्हाइसेसपर्यंत प्रवेश प्रदान करणार आहे.












Click it and Unblock the Notifications