Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

फोनपे, पेटीएमच्या डिजिटल गोल्ड ऑफर्स , कॅशबॅक आणि डिस्काउंट मिळवा,कशी खरेदी करायची घ्या जाणून

अक्षय तृतीया निमित्त ज्वेलर्सकडून ग्राहकांसाठी सोने, चांदी आणि डायमंड ज्वेलरीवर खास ऑफर्स आणि डिस्काऊंट देण्यात येत आहे. पार्श्वभूमीवर आता डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म फोनपे आणि पेटीएमने डिजिटल गोल्ड गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष ऑफर्स जाहीर केल्या आहेत.

अक्षय तृतीया हा सण 30 एप्रिल 2025 रोजी साजरा होणार आहे.या शुभ मुहूर्तावर सोने खरेदी करण्याची परंपरा डिजिटल स्वरूपात अधिक सोयीस्कर बनवण्याचा प्रयत्न या प्लॅटफॉर्म्सनी केला आहे. फोन पे ने गोल्ड खरेदीवर 1% म्हणजेच 2000 रुपये पर्यंत कॅशबॅक ऑफर जाहीर केली आहे तर पेटीएमने 'गोल्डन रश' कॅम्पेन अंतर्गत 500 रुपये किंवा त्याहून अधिक गुंतवणुकीवर रिवॉर्ड पॉइंट्स देण्याची योजना सुरू केली आहे.

phonepe and paytm digital gold offers

अक्षय तृतीया आणि सोने खरेदीची परंपरा

हिंदू धर्मात अक्षय तृतीया हा सण संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो. या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते, कारण असे मानले जाते की, या दिवशी केलेली खरेदी दीर्घकालीन समृद्धी आणि सौभाग्य आणते. यंदा अक्षय तृतीया 30 एप्रिल 2025 रोजी साजरी होणार आहे, आणि या निमित्ताने डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म्सनी पारंपारिक सोने खरेदीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याचा प्रयत्न केला आहे. सोन्याचे भाव सध्या 10 ग्रॅमसाठी 1 लाखाच्या घरात असले तरी डिजिटल गोल्डच्या माध्यमातून कमी रकमेत गुंतवणूक करण्याची संधी या ऑफर्समुळे ग्राहकांना मिळत आहे.

फोनपे आणि पेटीएम सारख्या प्लॅटफॉर्म्सनी डिजिटल गोल्ड गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक आकर्षक ऑफर्स जाहीर केल्या आहेत. या ऑफर्समध्ये कॅशबॅक, रिवॉर्ड पॉइंट्स आणि डिजिटल गोल्ड रिडीम करताना सवलतींचा समावेश आहे. डिजिटल गोल्डच्या माध्यमातून ग्राहकांना कमी रकमेत सोन्यात गुंतवणूक करता येते आणि त्याची सुरक्षितता आणि शुद्धता याची हमी विश्वासार्ह ब्रँड्सकडून दिली जाते.

फोनपेच्या डिजिटल गोल्ड ऑफर्स

फोनपेने अक्षय तृतीया निमित्त डिजिटल गोल्ड खरेदीवर विशेष ऑफर जाहीर केली आहे. 30 एप्रिल 2025 रोजी, फोनपे युजर्सना 2000 रुपये किंवा त्याहून अधिक रकमेच्या एकरकमी डिजिटल गोल्ड खरेदीवर 1% कॅशबॅक (जास्तीत जास्त 2000 रुपये) मिळेल. ही ऑफर फक्त एका ट्रान्झॅक्शनसाठी वैध आहे आणि सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) आधारित खरेदीवर लागू होणार नाही. ही फक्त ऑफर 30 एप्रिल 2025 रोजी रात्री 12:00 पर्यंत वैध असेल. युजर्स UPI, डेबिट/क्रेडिट कार्ड, फोनपे वॉलेट किंवा गिफ्ट कार्डद्वारे पेमेंट करू शकतात.

फोनपे MMTC-PAMP, SafeGold आणि CaratLane सारख्या विश्वासार्ह ब्रँड्सकडून सोने घेतल्यामुळे त्याची शुद्धता आणि सुरक्षिततेची हमी मिळते. फोनपे युजर्स 5 रुपयांपासून SIP च्या माध्यमातून सोन्यात गुंतवणूक सुरू करू शकतात. गरज पडल्यास हे सोने विकून पैसे थेट बँक खात्यात जमा करता येतात, ज्यामुळे ही गुंतवणूक लवचिक आणि सोयीस्कर बनते.

पेटीएमची 'गोल्डन रश' कॅम्पेन

पेटीएमने डिजिटल गोल्ड बचतीला प्रोत्साहन देण्यासाठी 'गोल्डन रश' नावाची विशेष कॅम्पेन सुरू केली आहे. या कॅम्पेन अंतर्गत, जे युजर्स 500 रुपये किंवा त्याहून अधिक रकमेची गुंतवणूक पेटीएम गोल्डमध्ये करतील त्यांना ट्रान्झॅक्शन रकमेच्या 5% रिवॉर्ड पॉइंट्स मिळतील. हे रिवॉर्ड पॉइंट्स लीडरबोर्डवर स्थान मिळवून देतील, ज्यामुळे युजर्सना अधिक पुरस्कार जिंकण्याची संधी मिळेल. पेटीएम गोल्ड हे MMTC-PAMP कडून घेतले जाते, जी भारतातील एकमेव LBMA-मान्यता प्राप्त रिफायनरी आहे. हे सोने पूर्णपणे विमाकृत वॉल्ट्समध्ये साठवले जाते, ज्यामुळे सुरक्षिततेची हमी मिळते.

पेटीएम डेली गोल्ड SIP च्या माध्यमातून युजर्स 9 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकतात. युजर्स एकरकमी खरेदी किंवा डेली, साप्ताहिक किंवा मासिक SIP चा पर्याय निवडू शकतात. पेटीएमवर सोन्याच्या किमती रिअल-टाइम अपडेट होतात आणि युजर्सला कधीही गुंतवणूक करण्याची लवचिकता मिळते. हे कॅम्पेन अक्षय तृतीया निमित्त डिजिटल गोल्ड खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि युजर्सना दीर्घकालीन बचतीसाठी प्रेरित करण्यासाठी सुरू करण्यात आले आहे.

डिजिटल गोल्ड खरेदी कशी करावी?

फोनपेवर डिजिटल गोल्ड खरेदी

- फोनपे अ‍ॅपवर डिजिटल गोल्ड खरेदी करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:

- फोनपे अ‍ॅप उघडा आणि 'गोल्ड' सेक्शनमध्ये जा.

- तुमचा गोल्ड प्रोव्हायडर निवडा (MMTC-PAMP, SafeGold किंवा CaratLane).

- 30 एप्रिल 2025 रोजी 2000 रुपये किंवा त्याहून अधिक रकमेचे सोने एकरकमी खरेदी करा.

- UPI, डेबिट/क्रेडिट कार्ड, फोनपे वॉलेट किंवा गिफ्ट कार्डद्वारे पेमेंट करा.

- तुम्हाला 1% कॅशबॅक (जास्तीत जास्त 2000 रुपये) मिळेल.

पेटीएमवर डिजिटल गोल्ड खरेदी

- पेटीएम अ‍ॅपवर डिजिटल गोल्ड खरेदी करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:

- पेटीएम अ‍ॅप उघडा आणि 'पेटीएम गोल्ड' किंवा 'डेली गोल्ड SIP' सर्च करा.

- तुम्हाला किती रकमेचे सोने खरेदी करायचे आहे ते निवडा (किमान 9 रुपये).

- वनटाइम खरेदी किंवा SIP (डेली, साप्ताहिक, मासिक) पर्याय निवडा.

- UPI, नेट बँकिंग किंवा डेबिट कार्डद्वारे पेमेंट करा.

- 500 रुपये किंवा त्याहून अधिक गुंतवणुकीवर 5% रिवॉर्ड पॉइंट्स मिळवा.

या ऑफर्समुळे अक्षय तृतीया निमित्त डिजिटल गोल्ड खरेदी करणे सोपे आणि फायदेशीर बनले आहे. डिजिटल गोल्ड खरेदीमुळे ग्राहकांना पारंपारिक सोने खरेदीच्या तुलनेत अधिक लवचिकता आणि सुरक्षितता मिळते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+