Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीया 30 एप्रिल 2025 रोजी, सोने खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त जाणून घ्या
Akshaya Tritiya 2025 : अक्षय तृतीया हा सण हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला साजरा केला जातो. या वर्षी बुधवारी 30 एप्रिलला अक्षय तृतीया साजरी केली जाणार आहे. अक्षय्य तृतीयेला केलेले दान आणि चांगले काम वाया जात नाही असे मानले जाते. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करण्याचे महत्त्व आहे. यामुळे घरात सुख आणि समृद्धी येते. या दिवशी नवीन काम सुरू करणे शुभ मानले जाते. या वेळेत सोने खरेदी केल्याने त्याचे फळ कायमस्वरूपी लाभदायक ठरते, अशी मान्यता आहे.
हा दिवस अक्षय (कधीही नष्ट न होणारा) म्हणून ओळखला जातो, कारण या दिवशी केलेल्या कार्यांचे सकारात्मक परिणाम कायम राहतात. ज्योतिष आणि धार्मिक दृष्टिकोनातून अक्षय तृतीया हा कोणताही मुहूर्त पाहण्याची गरज नसलेला शुभ दिवस मानला जातो. यामुळे नवीन व्यवसाय सुरू करणे, लग्न, घर खरेदी किंवा सोन्यासारख्या मौल्यवान गोष्टी खरेदी करणे या दिवशी विशेष शुभ मानले जाते.

अक्षय्य तृतीया: तारीख आणि शुभ मुहूर्त
यंदा अक्षय्य तृतीया 30 एप्रिल 2025, बुधवार रोजी साजरी होईल. वैशाख शुक्ल तृतीया तिथी 29 एप्रिल रोजी संध्याकाळी 5:32 वाजता सुरू होईल आणि 30 एप्रिल रोजी दुपारी 2:13 वाजता संपेल. उदया तिथीनुसार अक्षय्य तृतीया 30 एप्रिल रोजी साजरी होईल.
या दिवशी कोणतेही शुभ कार्य किंवा खरेदी कोणत्याही वेळी करता येते. विशेषतः सोने, चांदी, संपत्ती, वाहन किंवा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी सकाळी 5:30 वाजल्यापासून दुपारी 12:30 वाजेपर्यंत पूजा आणि खरेदीसाठी विशेष शुभ मुहूर्त आहे, असे पंचांगात नमूद आहे. या वेळेत माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा केल्यास घरात समृद्धी आणि सुखाची प्राप्ती होते, अशी श्रद्धा आहे.
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त
30 एप्रिल 2025 रोजी सकाळी 5:41 ते दुपारी 2:12 पर्यंत. या दिवशी सुमारे 8 तास 30 मिनिटे सोने खरेदीसाठी खूप फायदेशीर वेळ आहे.
अक्षय तृतीया आणि सोन्याची खरेदीचे महत्त्व
अक्षय तृतीया हा सण भारतात समृद्धी आणि सौभाग्याचा प्रतीक मानला जातो. या दिवशी सोने खरेदी करणे हा एक पारंपरिक पध्दत आहे, जो पिढ्यानपिढ्या चालत आली आहे. हिंदू धर्मात सोने हे श्रीमहालक्ष्मीचे प्रतीक मानले जाते, आणि या दिवशी सोने खरेदी केल्याने घरात संपत्तीचा प्रवाह कायम राहील, अशी धारणा आहे. सोन्याची खरेदी ही फक्त गुंतवणूक नव्हे तर भावनिक आणि सांस्कृतिक महत्त्व देखील बाळगते.
या सणादरम्यान सोन्याची मागणी वाढते, ज्यामुळे बाजारातही उत्साह दिसून येतो. गेल्या काही वर्षांत सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली असून 2025 मध्ये 10 ग्रॅम सोन्याचे दर जवळपास 1 लाखाच्या घरात आहेत. तरीही अक्षय तृतीया निमित्त ग्राहक सोने खरेदी करण्यासाठी उत्सुक असतात, कारण या दिवशी केलेली गुंतवणूक दीर्घकालीन लाभ देते, अशी लोकांची श्रद्धा आहे.












Click it and Unblock the Notifications