Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

अक्षय तृतीयानिमित्त ज्वेलर्सकडून ग्राहकांना बंपर ऑफर आणि डिस्काऊंट, सर्वात खास ऑफर कोणाची ? पहा यादी

Akshaya Tritiya 2025, Gold Offers and Discounts : अक्षय्य तृतीया 2025 निमित्त भारतीय ज्वेलरी बाजारात उत्साहाचे वातावरण आहे. यंदा अक्षय तृतीया 30 एप्रिल 2025 रोजी साजरी होणार असून या शुभ मुहूर्तावर सोने, चांदी आणि डायमंड ज्वेलरीवर अनेक आकर्षक ऑफर्स जाहीर झाल्या आहेत.

कल्याण ज्वेलर्स, रिलायन्स ज्वेलर्स, तनिष्क, जोयलुक्कास आणि इतर अनेक नामांकित ब्रँड्सनी मेकिंग चार्जेसवर सवलत, सोन्याच्या नाण्यांचा समावेश आणि प्राइस-लॉकिंग ऑफर्स जाहीर केल्या आहेत. सोन्याचे भाव सध्या 10 ग्रॅमसाठी 1 लाख रुपये जवळपास असले तरी या ऑफर्स ग्राहकांना आकर्षित करत आहेत.

akshaya tritiya Gold News

अक्षय तृतीया आणि सोने खरेदीचे महत्त्व

हिंदू धर्मात अक्षय्य तृतीया हा सण संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो. या दिवशी सोने, चांदी आणि मौल्यवान वस्तूंची खरेदी करणे शुभ मानले जाते. असे मानले जाते की, या दिवशी केलेली खरेदी दीर्घकालीन समृद्धी आणि सौभाग्य आणते. यंदा अक्षय तृतीया 30 एप्रिल 2025 रोजी साजरी होणार आहे. या निमित्ताने ज्वेलरी रिटेलर्सनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक ऑफर्स जाहीर केल्या आहेत. सोन्याचे भाव सध्या उच्च पातळीवर असले तरी मेकिंग चार्जेसवर सवलत आणि इतर ऑफर्समुळे ग्राहकांना खरेदी करणे सोपे होणार आहे.

दरम्यान कल्याण ज्वेलर्स, पीपी ज्वेलर्स बाय पवन गुप्ता, झेन डायमंड, इरास्वा आणि अकोइरा बाय ऑगमॉन्ट यांसारख्या रिटेलर्सनी ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स जाहीर केल्या आहेत. या ऑफर्समध्ये मेकिंग चार्जेसवर सवलत, सुनिश्चित सोन्याच्या नाण्यांचा समावेश, एक्सचेंज स्कीम्स आणि प्राइस-लॉकिंग पर्याय यांचा समावेश आहे. या ऑफर्समुळे ग्राहकांना उच्च भाव असूनही सोने खरेदी करणे परवडणारे होणार आहे.

ज्वेलरी ब्रँड्सच्या आकर्षक ऑफर्स

कल्याण ज्वेलर्स

कल्याण ज्वेलर्सने अक्षय्य तृतीया निमित्त सर्व श्रेणींमध्ये मेकिंग चार्जेसवर 50% पर्यंत सवलत जाहीर केली आहे. कल्याण ज्वेलर्सचे कार्यकारी संचालक रमेश कल्याणरामन यांनी सांगितले की, "आम्ही आमच्या एक्सचेंज ऑफरचा विस्तार केला आहे. ग्राहक त्यांचे जुने सोने आणू शकतात, त्याची शुद्धता तपासून नवीन डिझाइन्समध्ये अपग्रेड करू शकतात. ही ऑफर अनेकांसाठी व्यावहारिक ठरत आहे." या ऑफरमुळे ग्राहकांना त्यांचे जुने सोने नवीन डिझाइन्समध्ये बदलण्याची संधी मिळते, ज्यामुळे खरेदीचा खर्च कमी होतो.

रिलायन्स ज्वेल्स

रिलायन्स ज्वेल्सने सोन्याच्या ज्वेलरीच्या मेकिंग चार्जेसवर 25% आणि डायमंड ज्वेलरीच्या (डायमंड मूल्य + मेकिंग चार्जेस) 30% पर्यंत सवलत जाहीर केली आहे. रिलायन्स ज्वेल्सने आपल्या ऑफर्सद्वारे ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. या सवलतीमुळे डायमंड ज्वेलरी खरेदी करणे अधिक परवडणारे झाले आहे, विशेषतः मेट्रो शहरांमध्ये डायमंड ज्वेलरीला असलेली मागणी लक्षात घेता, या ऑफर ग्राहाकांना देण्यात आल्या आहेत.

तनिष्क

तनिष्कने आपली अॅडव्हान्स बुकिंग ऑफर पुन्हा सुरू केली आहे, ज्यामुळे ग्राहकांना अक्षय्य तृतीया निमित्त सोन्याचे भाव लॉक करण्याची संधी मिळते. तनिष्कने मेकिंग चार्जेसवर 20% सवलत जाहीर केली आहे, जी 2 मे ते 12 मे 2025 पर्यंत वैध आहे. तनिष्कने आपल्या ग्राहकांना परवडणारी ज्वेलरी रेंज सादर केली आहे, ज्यामुळे ग्राहकांना बजेटमध्ये खरेदी करता येईल. तनिष्कने डिजिटल गोल्ड खरेदीचा पर्याय देखील उपलब्ध करून दिला आहे, ज्यामुळे ग्राहकांना ऑनलाइन खरेदी करणे सोपे झाले आहे.

जोयलुक्कास

जोयलुक्कासने विशेष ऑफर्स जाहीर केल्या आहेत, ज्यामध्ये 50,000 रुपयांपेक्षा जास्त सोन्याच्या ज्वेलरी खरेदीवर 1,000 रुपयांचे फ्री गिफ्ट व्हाउचर आणि 10,000 रुपयांपेक्षा जास्त चांदीच्या ज्वेलरी खरेदीवर 500 रुपयांचे फ्री गिफ्ट व्हाउचर देण्यात येत आहे. ही ऑफर 1 मे ते 10 मे 2025 पर्यंत वैध आहे. जोयलुक्कासने आपल्या सर्व शोरूम्स आणि वेबसाइटवर ही ऑफर लागू केली आहे, ज्यामुळे ग्राहकांना ऑनलाइन आणि ऑफलाइन खरेदीचा पर्याय उपलब्ध आहे.

मालाबार गोल्ड अँड डायमंड्स

मलबार गोल्डने अक्षय्य तृतीयेला खास ऑफर दिली आहे. कंपनीच्या प्रेस रिलीजनुसार, सोन्याच्या खरेदीवर 25% सूट दिली जात आहे, तर हिऱ्यांच्या खरेदीवरही 25% सूट आहे. याशिवाय, एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांना 5% कॅशबॅक मिळेल. ही ऑफर 23 एप्रिल 2025 पर्यंत वैध आहे. मालाबार गोल्डने ऑनलाइन आणि ऑफलाइन खरेदीवर ही ऑफर लागू केली आहे, ज्यामुळे ग्राहकांना निवड करण्याची मोकळीक आहे.

अकोइरा बाय ऑगमॉन्ट

अकोइराह बाय ऑगमॉन्टने एक अनोखी प्राइस-लॉकिंग ऑफर जाहीर केली आहे. "आमच्याकडून खरेदी करा आणि महिन्यातील सर्वात कमी किमतीवर 10 ग्रॅमपर्यंत सोन्याच्या नाण्यांचा लाभ घ्या," असे अकोइराहच्या संस्थापक नमिता कोठारी यांनी सांगितले. ही ऑफर ग्राहकांना सोन्याच्या भावातील चढ-उतारांपासून संरक्षण देते, ज्यामुळे खरेदी अधिक सुरक्षित होते.

झेन डायमंड

झेन डायमंडवर 50,000 रुपयांच्या प्रत्येक खरेदीवर तुम्हाला 1 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे नाणे मोफत मिळत आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक नील सोनावाला म्हणतात की सोन्याच्या किमती वाढल्या तरी ग्राहकांचा कल कायम आहे. गेल्या एका वर्षात ऑनलाइन दागिन्यांच्या विक्रीतही 30-50% वाढ झाली आहे आणि दागिन्यांच्या व्यवसायात आता डिजिटल सहभाग आवश्यक झाला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+