कुणाची संपत्ती जास्त देवेंद्र फडणवीस की, आदित्य ठाकरेंची? जाणून घ्या दोघांकडे किती आहे पैसा, जमीन
Aditya Thackeray Net Worth Vs Devendra Fadnavis Net Worth : राज्याची विधानसभा निवडणूक येत्या 20 नोव्हेंबरला होणार असून 23 नोव्हेंबरला या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती बनल्यानंतर पहिल्यांदाच आमने-सामने येणार आहेत. भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरलाआहे.
उमेदवारी अर्ज सादर करताना उमेदवारांना निवडणूक आयोगाकडे प्रतित्रापत्रात आपल्या नावावर किती संपत्ती आहे, याची माहिती देणं बंधनकारक असतं. आज आपण देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांच्यापैकी कुणाची संपत्ती जास्त आहे. कुणाकडे किती संपत्ती आहे हे पाहूया.

देवेंद्र फडणवीसांकडे 3.78 कोटींची स्थावर मालमत्ता
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं शक्तीप्रदर्शन करून 25 ऑक्टोबरला नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघासाठी अर्ज दाखल केलायं. उमेदवारी अर्ज दाखल करताना फडणवीसांनी त्यांची एकूण संपत्ती जाहीर केली आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत फडणवीसांकडे 3.78 कोटींची स्थावर मालमत्ता असल्याचं प्रतिज्ञापत्रातून समोर आलं होतं. अशातच 2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना फडणवीसांनी त्यांची एकूण संपत्ती घोषित केली आहे.
फडणवीसांच्या संपत्तीत असे आहेत चढउतार
देवेंद्र फडणवीसांच्या प्रतिज्ञापत्रात दिलेली माहितीनुसार, वर्ष 2023-24 मध्ये फडणवीसांची एकूण संपत्ती 38 लाख 73,536 रुपये आहे.
- वर्ष 2019-20 मध्ये 30 लाख 19 हजार 905 रुपये
- वर्ष 2020-21 मध्ये 25 लाख 71 हजार 651
- वर्ष 2021-22 मध्ये 32 लाख 79 हजार 116 रुपये इतकी
- वर्ष 2022-23 मध्ये 38 लाख 61 हजार 207 रुपयांची संपत्ती फडणवीसांच्या नावावर असल्याची माहिती आताच्या प्रतिज्ञापत्रातून जाहीर करण्यात आली.
आदित्य ठाकरेंकडे 15 कोटी रुपयांहून अधिक रुपयांची चल संपत्ती
आदित्य ठाकरे यांनीदेखील प्रतित्रापत्रात आपल्या संपत्तीची माहिती दिलीयं. आदित्य ठाकरेंकडे 15 कोटी रुपयांहून अधिक रुपयांची चल संपत्ती आहे. तर अचल संपत्ती म्हणजेच स्थावर मालमत्ता 6 कोटी 4 लाख रुपयांची आहे.
इतकी आहे आदित्य ठाकरेंची एकूण संपत्ती
आदित्य ठाकरे यांची बँकेतील रक्कम आणि ठेवी ही 2 कोटी 81 लाख रुपयांची आहे.
आदित्य ठाकरे यांनी 5 लाखांचे 50 हजार शेअर घेतले आहेत. तसंच त्यांनी म्युचुअल फंड आणि शेअर मार्केटमध्ये एकूण 10 कोटी 14 लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे.
आदित्य ठाकरे यांच्याकडे 1 कोटी 91 लाख रुपयांचे सोन्या-चांदी आहे.
आदित्य ठाकरे यांची कर्जतच्या भिसेगांव येथे 171 स्केवअर मीटर इतकी जमीन आहे.
आता आदित्य ठाकरेंची कुठे किती मालमत्ता?
- प्रतिज्ञापत्रानुसार, आदित्य ठाकरे यांच्यावर 1 गुन्हा दाखल आहे. डिलाईल रोड खुला केल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल झाला.
- आदित्य ठाकरे यांच्या नावावर रायगड येथे काही एकर जागा आहे, ज्याचं आताचं बाजारमूल्य 1 कोटी 48 लाख 51 हजार 350 रुपये आहे.
- आदित्य ठाकरे यांच्या नावावर ठाकुर्ली आणि घोडबंदर येथे दोन दुकानाचे गाळे आहेत. त्यांचं आताचं बाजार मूल्य 4 कोटी 56 लाख रुपये आहे.
1. आदित्य ठाकरे यांच्याकडे BMW चार चाकी वाहन आहे.
2. आदित्य ठाकरे यांच्याकडे 1 कोटी 91 लाख 7 हजार 159 रुपयांचे दागिने आहेत
3. आदित्य ठाकरेंकडे 15 कोटी 43 लाख 3 हजार 60 रुपयांची जंगम तर 6 कोटी 4 लाख 51 हजार 350 रुपयांची अचल मालमत्ता आहे.4. आदित्य ठाकरे यांच्या बँक खात्यात 2 कोटी 44 लाख 18 हजार 985 रुपये आहेत.
5. बँक खात्यात फिक्स डिपॉसिट - 2 कोटी 81 लाख 20 हजार 723 रुपये इतके आहे.
6. शेअर मार्केट गुंतवणूक - 70 हजार
7. म्युच्युअल फंड - 10 कोटी 13 लाख 78 हजार 52 रुपये
8. बॉण्ड्स - 50 हजार रुपये
यासह स्वतःची एकूण गुंतवणूक 10 कोटी 14 लाख 98 हजार 52 रुपये असून 21 लाख 55 हजार 741 रुपयांची एलआयसी विमा आहे.












Click it and Unblock the Notifications