Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Adani group : अदानींचे किती आहे साम्राज्य? ते काय विकतात अन् शेअर्समधून कशी करतात कमाई? घ्या जाणून

Adani group companies List : एखाद्याला आर्थिक बाबीवरुन सल्ला द्यायला असला तर दोन दशकांपुर्वी म्हटलं जायचं कि तू टाटा, बिर्ला आहेस का...पण आता अदानी, अंबानी आहे का असं म्हटलं जातं...म्हणजेच देशात या दोन उद्योगपतींची हवा आहे यावरुन दिसून येते. त्यातल्या त्यात अदानी हे नेहमी कुठे ना कुठे टार्गेट होतात. काही राजकीय पक्षांच्या अजेंड्यातही अदानींना टार्गेट केले जाते, अशा गौतम अदानींसंदर्भातच एक चिंता करणारी बातमी आली आहे.

अमेरिकेच्या फेडरल कोर्टात त्यांच्यावर लाचखोरी आणि फसवणुकीचे आरोप झाले आहेत. अदानी समूहाने हे आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. अदानी समूहाचे व्यवसाय मॉडेल विविधता आणि वाढीवर आधारित आहे. मात्र, नुकताच झालेला वाद हे त्यांच्या गटासाठी मोठे आव्हान आहे.

Adani group companies List

अदानींचे बिझनेस माॅडेल आणि कंपन्या

अदानी समूह हा शेअर बाजारातील कमाईचा मुख्य स्त्रोत आहे आणि भारताच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीस हातभार लावत आहे. भविष्यात, त्यांचे हरित उपक्रम आणि जागतिक विस्तार प्रकल्प त्यांना आणखी नफा मिळवून देऊ शकतात. चला त्यांचे बिझनेस मॉडेल आणि कंपन्या तपशीलवार समजून घेऊया...

गौतम अदानी, भारतातील सर्वात मोठ्या उद्योगपतींपैकी एक, अदानी समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. त्याच्या कंपन्या ऊर्जा, पायाभूत सुविधा, अन्न आणि अक्षय ऊर्जा यासारख्या अनेक क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत.

अदानी समूहाच्या प्रमुख कंपन्या आणि काय विकतात

अदानी एंटरप्रायजेस लिमिटेड - खणन, नविनीकरण ऊर्जा, विमानतळ, डेटा सेंटर्स, खाद्यतेल (फॉर्च्युन ब्रँड)

अदानी पोर्ट्स आणि सेझ - भारतातील सर्वात मोठे खाजगी बंदर ऑपरेटर, लॉजिस्टिक आणि विशेष आर्थिक क्षेत्र विकास

अदानी पॉवर लिमिटेड - औष्णिक ऊर्जा आणि नविनीकरण ऊर्जा उत्पादन,

अदानी ग्रीन एनर्जी - सौर आणि पवनऊर्जा तसेच ऊर्जा प्रकल्प

अदानी ट्रान्समिशन - ऊर्जा ट्रान्समिशन नेटवर्क आणि ग्रिड व्यवस्थापन

अदानी टोटल गॅस - शहरात गॅस वितरण, पीएनजी, सीएनजी

अदानी विल्मर - खाद्यतेल आणि एफएमसीजी उत्पादने (मुख्य ब्रँड: फॉर्च्यून)

अदानी समूहाचा प्रवास

  • 1994: 150/शेअरच्या खाली BSE आणि NSE वर लिस्टेड
  • 1995: सिंगापूरमध्ये विल्मारसोबत JV वर स्वाक्षरी केली
  • 1996: भाजपचा पूर्णवेळ कार्यकर्ते.
  • 2001: शहरी गॅस वितरण व्यवसाय सुरू केला 2010: ऑस्ट्रेलियाची कारमाइकल खाण
  • 2017: सौर PV पॅनल्सचे उत्पादन सुरू केले 2018: फॉर्च्यून हा भारतातील सर्वात मोठा फूड FMCG ब्रँड म्हणून उदयास आला
  • 2019: जगातील दुसऱ्या क्रमांकाचा IRM खेळाडू म्हणून
  • 2020 ग्रुपचा विमानतळ व्यवसायात प्रवेश

अदानी समूह शेअर्समधून कमाई कशी करतात?

प्राथमिक स्टॉक लिस्टिंग आणि गुंतवणूकदारांकडून भांडवल उभारणे : जेव्हा अदानी ग्रुपची कंपनी IPO (इनिशियल पब्लिक ऑफरिंग) जारी करते, तेव्हा ती स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध होते. यातून उभारलेले भांडवल कंपनीच्या विस्तारासाठी आणि प्रकल्पांसाठी वापरले जाते.

शेअर बाजारातील शेअर्सच्या किमती वाढणे : कंपनीची आर्थिक स्थिती, प्रकल्पातील यश आणि विस्तार योजना यावर अवलंबून शेअरची किंमत वाढते. उदाहरण: जर, एखाद्या गुंतवणूकदाराने 1 लाख रुपयांचे शेअर्स खरेदी केले आणि किंमत 20% ने वाढली, तर गुंतवणूकदाराला 1.2 लाख रुपये मिळतील.

लाभांश : कंपन्या त्यांच्या नफ्यातील काही भाग भागधारकांना लाभांश म्हणून देतात. उदाहरण: जर, अदानी ग्रीन एनर्जीने प्रति शेअर 5 रुपये लाभांश दिला आणि तुमच्याकडे 1000 शेअर्स असतील, तर तुम्हाला 5000 रुपये मिळतील.

बाजार मुल्यांकन : 2024 मध्ये समूहाचे एकूण बाजार मूल्य $200 अब्ज पेक्षा जास्त होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे अदानी कंपन्या गुंतवणूकदारांसाठी आकर्षक बनतील.

अदानी समूहावरील अलीकडील आरोप

हिंडेनबर्ग अहवालाचे मुख्य आरोप

  • शेअरच्या किंमतींमध्ये फेरफार.
  • मनी लॉन्ड्रिंग आणि अकाउंटिंग फसवणूक.
  • 2.20 लाख कोटी रुपयांचे कर्ज, जे कंपन्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त आहे.
  • मॉरिशसमधील बनावट कंपन्यांचा वापर करून शेअर्स खरेदी करणे.

अमेरिकेच्या न्यायालयात आरोप

  • अदानी समूहावर सौरऊर्जेचे कंत्राट मिळवण्यासाठी 2200 कोटी रुपयांची लाच दिली किंवा देण्याचा प्लॅन रचल्याचा आरोप आहे.
  • अदानी समूहाने हे आरोप फेटाळून लावले असून ते पूर्णपणे निराधार असल्याचे म्हटले आहे.
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+