हिंडेनबर्गच्या रिपोर्टनंतर अदानी ग्रुपच्या 10 शेअर्सवर काय परिणाम झाला, घ्या जाणून
Hindenburg : हिंडनबर्ग रिसर्च रिपोर्ट शनिवारी 10 ऑगस्ट रोजी समोर आल्यानंतर आज सोमवारी भारतीय शेअर मार्केटवर याचा मोठा परिणाम दिसून आला आहे. यावेळी अमेरिकन शॉर्ट सेलरने मार्केट रेग्युलेटरवर निशाणा साधला असून यावेळीही अदानी ग्रुपचे नाव त्यांच्या अहवालात समाविष्ट आहे. अशा परिस्थितीत हे जाणून घेणे महत्त्वाचे की अदानी ग्रुपच्या शेअरवर काय परिणाम झाला आहे.
हिंडनबर्ग रिपोर्ट पब्लिश झाल्यानंतर आज सोमवारी शेअर मार्केट उघडताच मोठी घसरण झाल्याची पाहायला मिळाली आहे. सकाळी 9:15 वाजता बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स 375 अंकांच्या घसरणीसह 79,330 वर उघडला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 47 अंकांनी घसरला आणि 24,320 च्या पातळीवर उघडला. दरम्यान सुरुवातीच्या व्यवहारात अदानी समूहाच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. बाजार उघडताच अदानी एंटरप्रायझेसचा शेअरमध्ये 5 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे.

अदानींच्या शेअर बाजारातील लिस्टेड शेअरवर एक नजर टाकूया
-अदानी पॉवर शेअर 5.31% च्या घसरणीसह 658.45 रुपयांवर व्यवहार करत आहे.
-अदानी टोटल गॅस लिमिटेडचे शेअर्स 6.39% घसरून 814.30 रुपयांवर व्यवहार करत आहेत.
-अदानी विल्मर शेअर 4.21% ने घसरला आहे आणि 368.95 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे.
-अदानी टोटल गॅस लिमिटेडचे शेअर्स 6.59% च्या घसरणीसह 812.55 रुपयांवर व्यवहार करत आहेत.
-अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचा स्टॉक 4.30% घसरून रु. 1,704.30 वर आहे.
-अदानी एनर्जी सोल्युशन्सचे शेअर्स 4.91% घसरून 1,049.60 रुपयांवर व्यवहार करत आहेत.
-अदानी पोर्ट शेअर 3.48% घसरून 1,480.45 रुपयांवर आला आहे.
-अदानीची सिमेंट कंपनी ACC (ACC Ltd Share) चे शेअर्स 2.32% घसरून रु. 2,296.95 वर व्यवहार करत आहेत.
-अंबुजा सिमेंट कंपनीचे शेअर्स (अंबुजा सिमेंट शेअर) 1.71% घसरून 621.20 रुपयांवर व्यवहार करत आहेत.
-NDTV शेअर बद्दल बोलायचे तर तो 3.10% ने घसरून 201.88 रुपयांच्या पातळीवर आला.
सोमवारी अदानी समूहाच्या शेअर बाजारात लिस्टेड झालेल्या सर्व शेअर्समध्ये घसरण झाली असली,तरी गेल्या वर्षी 24 जानेवारी 2023 रोजीच्या हिंडेनबर्ग अहवाल प्रकाशित झाल्यानंतर जी घसरण दिसून आली होती. तेवढा परिणाम यावेळेस दिसत नाही.हे पाहता हिंडेनबर्गच्या अहवालाचा बाजारावर फारसा परिणाम झालेला नाही, असे म्हणता येईल.












Click it and Unblock the Notifications