अदानी फाउंडेशन-DMIHER यांची भागीदारी; परवडणाऱ्या आरोग्य शिक्षणासाठी उत्कृष्टता केंद्र स्थापन होणार
अदानी समूहाच्या सामाजिक उत्तरदायित्व विभागाने (CSR) मोठे पाऊल उचलत दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च (DMIHER) सोबत भागीदारी केली आहे. या सहकार्याअंतर्गत परवडणाऱ्या आणि दर्जेदार आरोग्य शिक्षणासाठी एक जागतिक दर्जाचे Centre of Excellence (CoE) महाराष्ट्रात उभारले जाणार आहे.

ही भागीदारी "सेवा ही साधना आहे" या अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या तत्वज्ञानाने प्रेरित असून, आरोग्य आणि शिक्षण यांचा सर्वसामान्यांपर्यंत पोहोच याच माध्यमातून सुकर होणार असल्याचे मानले जात आहे.
दर्जेदार शिक्षण व सेवा देणारी संयुक्त संकल्पना
DMIHER ही महाराष्ट्रातील एक मान्यताप्राप्त विद्यापीठ संस्था असून, ती सध्या 15 शैक्षणिक संस्था आणि 5 रुग्णालयांच्या माध्यमातून कार्यरत आहे. येथे 13 वेगवेगळ्या शाखांमध्ये एकूण 217 अभ्यासक्रम - पदवी, पदव्युत्तर, सुपर-स्पेशालिटी, डॉक्टोरल व फेलोशिप - यांचा समावेश आहे.
या नवीन भागीदारीमुळे संस्थेच्या शैक्षणिक नवोपक्रमांना, क्लिनिकल संशोधनाला आणि समाजाभिमुख आरोग्य सेवांना अधिक गती मिळणार आहे. हे केंद्र 'ट्रीटमेंट सेंटर'पेक्षा अधिक, म्हणजेच सेवा, सन्मान आणि करुणा या मूल्यांवर आधारित 'टेम्पल ऑफ हेल्थकेअर' या संकल्पनेच्या रूपात उभारले जाणार आहे.
'विकसित भारत 2047' च्या दिशेने ठोस पाऊल
या प्रकल्पाच्या माध्यमातून केवळ संस्थात्मकच नव्हे तर राष्ट्रीय आरोग्य आणि शिक्षण यंत्रणेत परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. परवडणारे, दर्जेदार आणि स्केलेबल शिक्षण व आरोग्यसेवा देणारे मॉडेल उभारण्याचे या भागीदारीचे उद्दिष्ट आहे.
अदानी फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. प्रीती अदानी म्हणाल्या, "DMIHER सोबतची ही भागीदारी ही आमच्या या मूलभूत विश्वासाचे प्रतीक आहे की, दर्जेदार आरोग्यसेवा आणि शिक्षण हा प्रत्येकाचा अधिकार आहे - विशेषाधिकार नव्हे. हे उत्कृष्टता केंद्र शैक्षणिक नवोपक्रम, क्लिनिकल संशोधन आणि समुदाय सेवा यांचा आदर्श समन्वय साधेल. आमचे उद्दिष्ट म्हणजे 'विकसित भारत 2047' च्या दिशेने सन्मानपूर्वक सेवा करणारे एक प्रभावी मॉडेल उभारणे."
DMIHER चे संस्थापक श्री दत्ता मेघे म्हणाले, "गेल्या तीन दशकांहून अधिक काळ आम्ही आरोग्य व शिक्षण क्षेत्रात स्वावलंबनाचा पाया मजबूत केला. अदानी फाउंडेशनसोबतची भागीदारी ही केवळ संस्थात्मक प्रगतीचेच नव्हे, तर एक समावेशक आणि शाश्वत भारत घडवण्याचे प्रतीक आहे. 'विकसित भारत 2047' या संकल्पनेशी ती सुसंगत आहे."
-
Eid mubarak 2026 wishes marathi : आपल्या जोडीदाराला पाठवा 'हे' रोमँटिक ईद शुभेच्छा संदेश आणि शायरी! -
KVS Admission पालकांनो, केंद्रीय विद्यालयांचा प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी 'ही' कागदपत्रे ठेवा तयार ठेवा -
जगातील आनंदी देशांची यादी जाहीर! भारत कितव्या स्थानावर? वाचा भारत की पाकीस्तान कोण जास्त सुखी? -
आजचे राशीभविष्य: मेष ते मीन, कोणाला मिळणार धनलाभ आणि कोणाला राहावे लागेल सावध? -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
जपानचे PM अमेरिकेशी मैत्री वाढवासाठी आले अन् ट्रम्प यांनी खोचक उत्तर देऊन जुन्या जखमांवर मीठ चोळले! -
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
सोनं झालं स्वस्त! युद्धाच्या काळातही दरात 'एवढ्या' हजारांची ऐतिहासिक घसरण; खरेदी करावं की थांबावं? -
Dhurandhar 2 : धुरंधर-2 चा बॉक्स ऑफिस धमाका! दुसऱ्याच दिवशी 'एवढा' गल्ला, मोडला जवान, ॲनिमलचा विक्रम -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी






Click it and Unblock the Notifications