अदानी फाउंडेशनकडून गौतम अदानी यांच्या 63व्या वाढदिवसानिमित्त विक्रमी रक्तदान शिबिराचे आयोजन
श्री गौतम अदानी यांच्या 63व्या वाढदिवसानिमित्त, अदानी फाउंडेशनने देशभरात एक भव्य रक्तदान अभियान आयोजित केलं. या उपक्रमात 27,661 युनिट्स रक्त संकलित करण्यात आले, जे 83,000 पेक्षा अधिक रुग्णांना मदत करणार आहे. या उपक्रमातून समाजकल्याण आणि सेवाभावना याप्रती फाउंडेशनची निष्ठा दिसून येते.

24 जून रोजी ग्रुपचे चेअरमन श्री गौतम अदानी यांचा वाढदिवस साजरा करताना, अदानी ग्रुपच्या सामाजिक विकास शाखा असलेल्या अदानी फाउंडेशनने 21 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांतील 206 शहरांमध्ये एक विशाल रक्तदान शिबिर आयोजित केलं. हे शिबिर मागील वर्षीच्या 25,282 युनिट्सच्या विक्रमालाही पार करत 27,661 युनिट्सवर पोहोचलं.
अदानी हेल्थकेअर टीमच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या अभियानात अदानी ग्रुपचे कर्मचारी व भागीदार मोठ्या संख्येने सहभागी झाले. एकूण 11,100 लिटर रक्त संकलित करण्यात आले असून, या रक्तातून Whole Blood, PCV, Platelets, Plasma, FFP, Cryoprecipitate आणि Albumin अशा अनेक रक्तघटकांची निर्मिती होऊन हजारो रुग्णांना जीवनदायिनी मदत मिळणार आहे.
"आपल्या अदानी परिवारातील प्रत्येक सदस्याचे मन:पूर्वक आभार. तुमच्या सेवाभावामुळे अनेकांचे प्राण वाचणार आहेत," असे डॉ. प्रीती अदानी, अध्यक्षा अदानी फाउंडेशन यांनी सांगितले.
या उपक्रमात रेड क्रॉस ब्लड बँक व शासकीय रुग्णालयांचे सहकार्य लाभले. याशिवाय अदानी ग्रुपमधील 3,000 हून अधिक डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ, डेटा ऑपरेटर्स आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी यासाठी परिश्रम घेतले.
विशेष म्हणजे, यंदा प्रथमच या रक्तदान मोहिमेचं आंतरराष्ट्रीय स्तरावरही आयोजन करण्यात आलं. कोलंबो वेस्ट इंटरनॅशनल टर्मिनल (CWIT) पोर्ट, श्रीलंका आणि दार-ए-सलाम पोर्ट, टांझानिया येथे रक्तदान शिबिरे भरवण्यात आली, जिथे 100 हून अधिक दात्यांनी सहभाग घेतला.
2011 पासून दरवर्षी श्री गौतम अदानी यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबवण्यात येतो, ज्यातून "सेवा ही साधना आहे" या त्यांच्या तत्त्वज्ञानाला उजाळा दिला जातो. अदानी फाउंडेशन नेहमीच सर्वसमावेशक, समताधिष्ठित आणि शाश्वत विकासासाठी कटिबद्ध असून, समाजासाठी प्रेरणादायी कार्य करत आहे.
-
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!







Click it and Unblock the Notifications