Aaj sone chandi che bhav श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारी सोने-चांदीचा भावात मोठी घसरण! आजचे ताजे दर किती
Aaj sone chandi che bhav : सोन्याचे दर सतत बदलत आहेत. कधी सोन्याचे दर वाढत आहेत तर कधी भाव कमी होत आहे, असे असले तरीही गेल्या एक वर्षात सोन्याने मोठा परतावा दिला आहे, याचाच अर्थ सोने महागले आहे. त्यामुळे आगामी सण-उत्सव आणि नवीन वर्षात सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे.

आज श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार, शेवटच्या सोमवारी सोने आणि चांदीचा भाव किती आहे? हे प्रत्येकाला जाणून घ्यावसे वाटते, सोने खरेदी करत असाल तर मग सोन्याचे दर जाणून घेणे खूपच महत्वाचे ठरते. देशात आज, सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे. जर तुम्ही श्रावणातील आजच्या शुभ दिवशी सोने किंवा चांदीचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही योग्य संधी असू शकते.
२४ आणि २२ कॅरेट सोन्याचे दर काय? (Aaj sone chandi che bhav)
गेल्या आठवड्यात सोने उच्चांकार पोहचले होते, तेथूनच ही घसरण सुरु झाली असून गेल्या आठवड्याच्या तुलनेत आज १० ग्रॅम सोने सुमारे १०० रुपयांनी स्वस्त झाले आहेत. आज २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम ₹ ९९ हजारांच्या आसपास व्यवहार करत आहे. त्याचवेळी, २२ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम ९१ हजार ४०० रुपयांनी विकले जात आहे.
दिल्लीत सोन्याचे भाव काय? (Aaj sone chandi che bhav Delhi)
आज ४ ऑगस्ट २०२५ रोजी दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ९९ हजार ९०० रुपये आहे. तर, २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ९१ हजार ६०० रुपये झाला आहे.
मुंबईत सोन्याचे भाव काय? (Aaj sone chandi che bhav Mumbai)
मुंबई आणि कोलकातामध्ये २४ कॅरेटचा दर ९९ हजार ७६० रुपये आहे आणि २२ कॅरेटचा दर १० ग्रॅम ९१ हजार ४०० रुपये आहे. दिल्लीच्या तुलनेत हे दर दोनशे रुपये प्रतिग्रॅमने कमी आहेत. नोएडा आणि गाझियाबादमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ९१ हजार ६०० रुपये आहे. तर, २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ९९ हजार ९०० रुपये आहे.
आज चांदीची किंमत किती
आज ४ ऑगस्ट २०२ भारतात चांदीची किंमत प्रती किलो १ लाख १२ हजार ९०० रुपये इतका झाला आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आजचे दर कमी आहेत.












Click it and Unblock the Notifications