साप्ताहिक राशिभविष्य : 22 ते 28 डिसेंबर 2025 : वर्षातील अखेरच्या आठवड्यात तुमच्या भाग्यात काय? वाचा
Weekly Horoscope marathi december 22-28 : डिसेंबरचा हा चौथा आठवडा हा वर्षातील अखेरचा आठवडा आहे. या आठवड्यात अनेक राशींसाठी प्रगतीचे नवे मार्ग उघडणारा ठरणार आहे. विशेषतः मेष आणि कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत लाभदायक असेल.

१. मेष रास
हा आठवडा तुमच्यासाठी प्रगतीचा ठरेल. कार्यक्षेत्रात नवीन जबाबदाऱ्या तुमच्या खांद्यावर येतील. मेहनतीचे योग्य फळ मिळेल, मात्र कोणतीही मोठी गुंतवणूक करताना घाई करू नका. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा सुधारेल. कुटुंबात एखादे मंगल कार्य किंवा शुभ वार्ता कानावर येईल.
२. वृषभ रास
तुमची रखडलेली कामे या आठवड्यात मार्गी लागतील. नशिबाची उत्तम साथ लाभेल. व्यवसाय किंवा वैयक्तिक कारणास्तव केलेले प्रवास फायदेशीर ठरतील. दांपत्य जीवनात गोडवा राहील. आठवड्याच्या शेवटी जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करू नका.
३. मिथुन रास
हा आठवडा संमिश्र फळांचा असेल. नवीन संपर्कामुळे व्यवसायात प्रगती होईल. मात्र, आर्थिक व्यवहारात विशेष काळजी घेण्याची गरज आहे. घाईघाईत घेतलेले निर्णय अंगलट येऊ शकतात. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा हा काळ आहे. स्पर्धा वाढली तरी तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेने बाजी माराल.
४. कर्क रास
तुमच्यासाठी हा आठवडा अतिशय 'लकी' ठरणार आहे. विशेषतः भागीदारीच्या कामात मोठे यश मिळेल. करिअरमध्ये प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतील. जोडीदाराच्या मदतीने मानसिक बळ वाढेल. भावनेच्या भरात कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेऊ नका, बुद्धीचा वापर करा.
५. सिंह रास
आत्मविश्वास शिखरावर असेल. नोकरीत वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील आणि प्रशंसा करतील. प्रेमसंबंधांमध्ये सकारात्मक बदल दिसून येतील. कामाचा ताण वाढला तरी तुम्ही तो हसतमुखाने पेलून न्याल. आर्थिक परिस्थिती सामान्य राहील, मोठ्या खर्चाचे नियोजन विचारपूर्वक करा.
६. कन्या रास
नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा पगारात वाढ मिळण्याचे संकेत आहेत. गुंतवणुकीसाठी हा आठवडा अत्यंत अनुकूल आहे. कुटुंबातील सदस्यांशी असलेले मतभेद मिटतील आणि प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील. कामाच्या गडबडीत आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, थकवा जाणवू शकतो.
७. तूळ रास
हा आठवडा संतुलनाचा आहे. घर आणि ऑफिस या दोन्ही ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील. मालमत्ता किंवा जमिनीच्या व्यवहारात लाभ होण्याची शक्यता आहे. दांपत्य जीवनात सामंजस्य राहील. मानसिक शांततेसाठी योगासने किंवा ध्यानाचा आधार घ्या.
८. वृश्चिक रास
तुमच्या धाडसात आणि आत्मविश्वासात वाढ होईल. गुप्त शत्रूंवर तुम्ही मात कराल. व्यापारात नवीन योजना राबवण्यासाठी काळ उत्तम आहे. भावंडांच्या सहकार्याने कौटुंबिक समस्या सुटतील. छोटा प्रवास संभवतो, जो आनंददायी आणि फायदेशीर ठरेल.
९. धनु रास
धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात तुमची रुची वाढेल. शिक्षणाशी संबंधित लोकांसाठी हा काळ भाग्योदयाचा आहे. उत्पन्नाचे नवीन मार्ग सापडतील, ज्यामुळे तुमची आर्थिक बाजू भक्कम होईल. आरोग्यात चढ-उतार येऊ शकतात, खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा.
१०. मकर रास
हा आठवडा मेहनतीचा असला तरी त्याचे परिणाम समाधानकारक मिळतील. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. करिअरमध्ये एखादा मोठा सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे. वरिष्ठांचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल. नवीन घराचे किंवा गाडीचे स्वप्न पूर्ण होण्याच्या दिशेने पाऊल पडेल.
११. कुंभ रास
हा आठवडा आत्मचिंतनाचा आहे. कामाच्या ठिकाणी काही गुप्त शत्रू अडचणी निर्माण करू शकतात, त्यामुळे सावध राहा. अनावश्यक खर्च वाढल्याने बजेट कोलमडू शकते. जोडीदारासोबत वेळ घालवल्याने तणाव कमी होईल. मित्रांकडून अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता आहे.
१२. मीन रास
आर्थिक दृष्टीने हा आठवडा अत्यंत सुखावह असेल. उत्पन्नात वाढ होईल आणि जुनी देणी फेडण्यात यश येईल. सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घ्याल, ज्यामुळे तुमची प्रतिष्ठा वाढेल. भविष्यातील योजनांवर काम करण्यासाठी हा उत्तम काळ आहे. घरातील वातावरण आनंदी राहील.
(Disclaimer : सदर राशीभविष्य सामान्य ज्योतिषीय समजुतींवर आधारित आहे. वैयक्तिक परिणाम वेगवेगळे असू शकतात. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी, तुमच्या विवेकाचे ऐका आणि तज्ञांचा सल्ला घ्या.)












Click it and Unblock the Notifications