Raksha Bandhan 2024 date and muhurta: 19 ऑगस्टला रक्षाबंधन,जाणून घ्या शुभ मुहूर्त
Raksha Bandhan 2024 date and muhurta : रक्षाबंधन हा सण भाऊ आणि बहिणीच्या नात्याचे प्रतीक आहे. रक्षाबंधनाच्या सणाला बहीण आपल्या लाडक्या भावाला राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्य आणि आनंदासाठी शुभेच्छा देते. भाऊ आपल्या प्रिय बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो.
श्रावण महिन्याची पौर्णिमा कधी सुरू होणार?
श्रावण महिन्याची पौर्णिमा 19 ऑगस्ट रोजी पहाटे 3:04 वाजता सुरू होईल आणि त्याच दिवशी रात्री 11:55 वाजता समाप्त होईल. त्यामुळे 19 ऑगस्टला रक्षाबंधन साजरे केले जाणार आहे.
रक्षाबंधन 2024 शुभ मुहूर्त
रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त दुपारी 1.30 ते रात्री 9.06 पर्यंत आहे. राखी बांधण्याची विशेष वेळ दुपारी 1:46 ते 4:19 पर्यंत आहे, (एकूण वेळ 2 तास 37 मिनिटे)

प्रदोष कालचा मुहूर्त
संध्याकाळ 6:56 ते 9:07 पर्यंत आहे, ज्याचा कालावधी 2 तास 11 मिनिटे आहे.
रक्षाबंधनावर भाद्रचा प्रभाव
यंदा रक्षाबंधनाच्या दिवशी सकाळपासूनच भद्राची प्रभाव असेल. त्यामुळे दुपारी दीड नंतरच राखी बांधणे शुभ मानले जाते. भाद्र समाप्ती वेळ दुपारी 1:30 आहे. भद्राचा शेवटचा काळ सकाळी 9:51 ते 10:53 पर्यंत असतो, त्यानंतर भद्राचा मुख काल सकाळी 10:53 ते दुपारी 12:37 पर्यंत असतो.
रक्षाबंधनाच्या दिवशी राहील पंचकची सावली, का जाणून घ्या?
पंचक हा प्रत्येक महिन्यातील पाच दिवस असतो जेव्हा अनेक शुभ कार्ये पुढे ढकलली जातात. ऑगस्टमधील पंचक श्रावण महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी 19 तारखेला संध्याकाळी 7:01 वाजता सुरू होईल आणि 23 ऑगस्टपर्यंत चालेल. सोमवारपासून रज पंचक सुरू होत असल्याने शुभ कार्ये कोणत्याही दोषाशिवाय करता येतील.












Click it and Unblock the Notifications