Navratri Day 4 : आज देवी कूष्मांडाची कृपा, सूर्यदेवाच्या आशीर्वादाने ‘या' 4 राशींचे नशीब चमकेल!
Navratri Day 4 : आज नवरात्रीचा चौथा दिवस, आणि आजच्या दिवशी सृष्टीची आदिशक्ती मा कूष्मांडाची आराधना केली जाते. असं म्हणतात की त्यांच्या हास्यातूनच या ब्रह्मांडाची निर्मिती झाली. ज्योतिष आणि सनातनी परंपरेनुसार, मा कूष्मांडाचा संबंध थेट सूर्य ग्रहाशी जोडलेला आहे. त्यामुळे या दिवशी देवीची पूजा केल्याने सूर्यदेवही प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांना आशीर्वाद देतात.
आज सूर्य ग्रहाच्या विशेष स्थितीमुळे काही राशींच्या नशिबात मोठे बदल होणार आहेत. चला जाणून घेऊया, कोणत्या राशींना याचा फायदा होईल.

सूर्य ग्रहाचा राशींवर परिणाम
ज्योतिषशास्त्रानुसार, कुंडलीत सूर्य मजबूत असेल तर व्यक्तीचा आत्मविश्वास, आरोग्य, आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढते. पण, जर सूर्य कमजोर असेल तर आत्मविश्वास कमी होतो, करिअरमध्ये अडचणी येतात आणि सरकारी कामांमध्ये अडथळे येतात. आज मा कूष्मांडाची पूजा केल्याने सूर्याची नकारात्मकता दूर होते, ज्यामुळे व्यक्तीला ऊर्जा, प्रतिष्ठा आणि यश मिळते.
हेही वाचा : Shardiya Navratri 2025 wishes messages marathi : नवरात्रीसाठी 'या' मराठमोळ्या शुभेच्छा-कोट! शेअर करा
या राशींचे नशीब आज पालटणार!
ज्योतिष्यांच्या मते, नवरात्रीच्या चौथ्या दिवशी सूर्याच्या बदलामुळे सिंह, मेष, धनु, आणि मकर राशीच्या लोकांना विशेष लाभ होणार आहे.
सिंह राशी: कामाच्या ठिकाणी सन्मान मिळेल आणि पदोन्नतीची शक्यता आहे.
मेष राशी: आत्मविश्वास वाढेल आणि नवीन संधी प्राप्त होतील.
धनु राशी: अडकलेली सरकारी कामे मार्गी लागतील.
मकर राशी: आरोग्य सुधारेल आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
देवी माता कूष्मांडाची पूजा कशी करावी?
देवी माता कूष्मांडांना लाल आणि नारंगी रंग खूप प्रिय आहे. त्यामुळे आजच्या दिवशी त्यांना लाल किंवा नारंगी रंगाची फुले अर्पण करणे शुभ मानले जाते. यासोबतच, सूर्यदेवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी गूळ आणि गहू दान करणे लाभदायक ठरते. 'ॐ ऐं ह्रीं क्लीं कूष्माण्डायै नमः' या मंत्राचा जप आणि आदित्य हृदय स्तोत्राचे पठण केल्यास विशेष फळ मिळते.
देवी माता कूष्मांडाच्या कृपेने आरोग्य चांगले राहते, कामाच्या ठिकाणी सन्मान वाढतो आणि घरात सकारात्मक ऊर्जा येते. असं मानलं जातं की या दिवशी देवी कूष्मांडा आणि सूर्यदेवाची मनोभावे पूजा केल्यास सूर्य दोष (पितृ दोष, आत्मविश्वास कमी होणे किंवा सरकारी कामातील अडथळे) दूर होतात.
(टीप ः या लेखातील माहिती ही ज्योतिष्य, धार्मिक धारणा आणि धार्मिक समजांवर आधारीत आहे. आपापल्या सद्सद्वविवेक बुद्धीने आपण काय करावे काय नको याचा निर्णय घ्यायला हवा.)
हेही वाचा : देवीची कृपा, ब्रह्म योगामुळे 'या' राशींना आज आर्थिक लाभ, पदोन्नती; जाणून घ्या तुमचं आजचं राशीभविष्य
-
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!







Click it and Unblock the Notifications