जुलै महिन्यात “हे” आहेत लग्नाचे मुहूर्त
"आली लग्नघटी समीप नवरा" या ओळी ऐकण्यासाठी प्रत्येक लग्नाळू इच्छुक असतोच. अक्षता, मंगलाष्टका, सनई, चौघडे, वरात प्रत्येकाला हवेहवेसेच असतात. लग्नांचा मौसम हा समाजात एक वेगळे चैतन्य घेऊन येत असतो. आणि हा मौसम जुलै महिन्यात दिमाखात सुरु होतोय.
ज्योतिष गणनेनुसार जुलै महिन्यात शुक्रदेवाचा उदय होतोय. युअमुळे लग्न सोहळ्यांचा हंगाम पुन्हा सुरु होणार आहे. पाहूयात जुलै महिन्यात कोणकोणते मुहूर्त आहेत.

जून महिन्यात लग्नाचा कोणताही मुहीर्त नव्हता कारण शुक्राचा अस्त होत असल्याने एकही चांगला मुहूर्त मिळाला नव्हता. मात्र एका महिन्याच्या प्रतीक्षेनंतर मुहूर्त मिळत आहेत. अर्थात जुलै महिन्यात देखील कमी मुहूर्त उपलब्ध आहेत. जुलै मध्ये शुक्रदेवाचा उदय झाल्यानंतर सनई चौघडे वाजू लागतील मात्र १७ जुलै रोजी देवशयनी एकादशी आहे. त्यानंतर चार महिने कोणत्याही प्रकारचे मंगल कार्य होणार नाही.
सध्या शुक्राचा अस्त असल्याने लग्नसोहळ्यांना विराम लागला आहे. जुलैमध्ये मोजकेच मुहूर्त उपलब्ध आहेत. या मुहूर्तांपैकी एखादा मुहूर्त चुकला तर इच्छुकांना तब्बल चार महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
जुलै महिन्यातील विवाह मुहूर्त
• मिथिला पंचांगाच्या अनुसार जुलै महिन्यात १०, ११ आणि १२ जुलै रोजी विवाहाचे मुहूर्त उपलब्ध आहेत.
• बनारसी पंचांगाच्या अनुसार ९, १०, ११, १२, १३, १४ आणि १५ जुलै रोजी विवाहासाठी मुहूर्त उपलब्ध आहेत.
जुलै महिन्यात या दिवशी विवाह सोहळे संपन्न होतील. १७ जुलै पासून सर्व मंगल सोहळ्यांना विराम लागेल. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात पुन्हा सनई चौघडे वाजू लागणार आहेत. .
* नोव्हेंबर मधील विवाह मुहूर्त : १६, १७, २२, २३, २४, २५, २६, २८ आणि २९ नोव्हेंबर
* डिसेंबरमधील विवाह मुहूर्त : २, ३, ४, ५, ९, १०, ११, १४, १५ डिसेंबर
चातुर्मासात मंगल सोहळे नाहीत
मिथिला पंचांगाच्या अनुसार जुलै महिन्यात तीन दिवस आणि बनारस पंचांगाच्या अनुसार ७ दिवस विवाह सोहळ्यांसाठी मिळत आहेत. चातुर्मासात विवाहासाठी देवदेवतांचे आशीर्वाद मिळत नसल्याची धारणा आहे. त्यामुळे चातुर्मासात विवाह होणार नाहीत. चातुर्मासात विवाह केल्याने वैवाहिक जीवन सुखी होत नाही, अशी धारणा आहे.
नक्षत्रांमध्ये अश्विनी, रेवती, रोहिणी, मृगाशिरा, श्रावणा, हस्त, मूल, मघा, चित्रा, अनुराधा, उत्तरा भाद्रपदा, उत्तरा फाल्गुन आणि उत्तरा आषाढ यापैकी एक असणे गरजेचे आहे. अति उत्तम मुहूर्तासाठी रोहिणी, मृगाशिरा किंवा हस्त नक्षत्र महत्वाचे मानण्यात येत आहे.












Click it and Unblock the Notifications