Guru Purnima 2024 : गुरु पौर्णिमा कधी आहे? महत्त्व काय? जाणून घ्या काही खास गोष्टी

Guru Purnima 2024 : आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला 'गुरु पौर्णिमा' हा सण साजरा केला जातो, हा दिवस आपल्या गुरुदेवांना धन्यवाद देण्यासाठी आहे. परंतु यावेळी तिथीबाबत काही गोंधळ आहे.

काही लोक म्हणत आहेत की हा सण 20 जुलैला आहे तर काही लोक म्हणत आहेत की, हा सण 21 जुलैला साजरा केला जाईल. त्यामुळे तुमचा गोंधळ दूर करूया. वास्तविक, आषाढ शुक्ल पौर्णिमेची तारीख 20 जुलै रोजी संध्याकाळी 05:59 पासून सुरू होईल आणि 21 जुलै रोजी दुपारी 03:46 वाजता समाप्त होईल. वैदिक धर्मात सूर्योदयापासून तिथी मानली जाते आणि म्हणूनच 21 जुलै रोजी गुरुपौर्णिमेचा उपवास केला जातो.

Guru Purnima 2024

पौर्णिमेच्या दिवशी दान केले जाते, असे म्हटले जाते की, जो कोणी या दिवशी असे करतो त्याच्या सर्व संकटांचा अंत होतो आणि त्याला सुख आणि शांती प्राप्त होते. चंद्रदेवाची पूजा पौर्णिमेच्या दिवशी होत असली तरी गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुंची पूजा केली जाते.

महर्षी व्यास यांचा जन्म गुरुपौर्णिमेच्या दिवशी झाला

गुरुपौर्णिमेच्या दिवशी महाभारताचे लेखक कृष्ण द्वैपायन व्यास यांचाही जन्मदिवस आहे, त्यामुळे या दिवसाचे महत्त्व खूप वाढते, त्यांना आदिगुरू असेही म्हणतात, म्हणून या दिवसाला 'व्यास पौर्णिमा' असे म्हणतात.

गुरु पौर्णिमा 2024 शुभ मुहूर्त

21 जुलै रोजी सकाळी 07:36 ते रात्री 09:15 पर्यंत
21 जुलै रोजी सकाळी 09:15 ते रात्री 10:54 पर्यंत

गुरुची आरती (Guru Ki Aarti)

धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची।
झाली त्वरा सुरवरां विमान उतरायाची।। धृ.।।
पदोपदी अपार झाल्या पुण्याच्या राशी।
सर्वही तीर्थे घडली आम्हा आदिकरुनि काशी।। १।।
मृदुंग टाळ ढोल भक्त भावार्थे गाती।
नामसंकीर्तने ब्रह्मानंदे नाचती।। २।।
कोटि ब्रह्महत्या हरिती करितां दंडवत।
लोटांगण घालिता मोक्ष लोळे पायात।। ३।।
गुरुभजनाचा महिमा न कळे आगमानिगमांसि।
अनुभव जे जागति ते गुरुपदिचे अभिलाषी।। ४।।
प्रदक्षिणा करूनि देह भावे वाहिला।
श्रीरंगात्मज विठ्ठल पुढे उभा राहिला।। ५।।

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+