Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Govardhan Puja : गोवर्धन पूजा कधी आहे? आज किंवा उद्या, पूजेची वेळ काय आहे? सर्व माहिती एका क्लिकवर

Govardhan Puja 2024 Kadhi aahe: 'धनत्रयोदशी', 'नरक चतुर्दशी', 'लक्ष्मी कूबेर पूजन' या पाच दिवसीय दिव्यांचा उत्सवाचा चौथा दिवस 'गोवर्धन पूजा' आहे. परंतु यंदा दिवाळीत तिथीबाबत थोडा संभ्रम निर्माण झाला आहे. काही ठिकाणी 31 ऑक्टोबरला दिवाळी साजरी केली तर काही ठिकाणी 1 नोव्हेंबरला म्हणजेच आज दिवाळी साजरी केली जात आहे.

या कारणास्तव गोवर्धन पूजा केव्हा करायची या संभ्रमात लोक आहेत. त्यामुळे तुमचा गोंधळ आम्ही दूर करणार आहोत. पंचागानुसार कार्तिक प्रतिपदा तिथी 1 नोव्हेंबरला संध्याकाळी 6.16 पासून सुरू होत आहे. ती 2 नोव्हेंबर रोजी रात्री 8:21 वाजता संपेल. 2 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6.30 ते 8:45 पर्यंत पूजा करण्याचा शुभ मुहूर्त आहे.

govardhan puja 2024

गोवर्धन पूजा 'अन्नकूट' पूजा म्हणूनही ओळखली जाते. या दिवशी भगवान श्रीकृष्णाने इंद्रदेवाचा अहंकार नष्ट करून गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवर उचलून गोकुळवासीयांचे रक्षण केले.

गोवर्धन पूजेची कथा (Govardhan Puja 2024 Katha) भगवान श्रीकृष्णाने गोकुळातील लोकांना इंद्रदेवाची पूजा करण्याऐवजी गोवर्धन पर्वताची पूजा करण्यास प्रेरित केले होते. त्यांनी इंद्रदेवाचा अहंकार नष्ट करुन गोवर्धन पर्वत बोटावर उचलून गोकुळातील लोकांचे रक्षण केले. म्हणून या दिवशी भगवान श्रीकृष्ण गोवर्धन पर्वत आणि माता गाय यांची पूजा केली जाते.

गोवर्धन पूजा 2024 पूजा विधि (Govardhan Puja 2024 Puja Vidhi)

- गोवर्धन पूजेसाठी सर्व प्रथम अंगणात किंवा कोणत्याही स्वच्छ ठिकाणी शेण टाकून गोवर्धन पर्वताचे चित्र बनवावे.

- रंगीबेरंगी फुलांनी सजवा आणि जवळ दिवा लावा.

- भगवान श्रीकृष्ण, गोवर्धन पर्वत आणि गाय मातेचा फोटो किंवा मूर्ती ठेवा.

- पूजेनंतर भगवान श्रीकृष्णाची आरती करा आणि भजन म्हणा.

- यानंतर सर्वांना प्रसाद वाटप करा.

गोवर्धन पूजेच्या शुभेच्छा ( Happy Govardhan Puja 2024)

- गोवर्धन पर्वताच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात सदैव सुख, समृद्धी आणि शांती नांदो. गोवर्धन पूजेच्या शुभेच्छा

- अन्नकूटच्या या पवित्र सणावर भगवान श्रीकृष्णाची कृपा तुमच्यावर राहो.

- गोवर्धन पूजेच्या या प्रसंगी भगवान श्रीकृष्ण तुमचे घर खूप आनंदाने भरू दे.गोवर्धन पूजेच्या शुभेच्छा

- भगवान गोवर्धनच्या उपासनेने तुमच्या जीवनात संपत्ती, वैभव आणि समृद्धी येवो. गोवर्धन पूजेच्या शुभेच्छा

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+