Ravan Dahan Muhurat 2024 : या वर्षी दसऱ्याला खास योग, जाणून घ्या रावण दहनाचा शुभ मुहूर्त?
Ravan Dahan Muhurat 2024 : हिंदू पंचांगानुसार अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दशमीला दसरा हा सण साजरा केला जातो. आश्विन महिन्याच्या पहिल्या दिवसापासून नऊ दिवस नवरात्री असते. त्यानंतरचा दहावा दिवस म्हणजेच 'दसरा'. या सणाला विजयादशमी असंही म्हटलं जातं. हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानला जातो. या दिवशी रामाने रावणाचा वध करून अधर्मावर धर्माचा विजय मिळवला. हिंदू पौराणिक कथेनुसार या दिवशी माता दुर्गेने महिषासुराचा वध केला होता.
त्यामुळे तो वाईटाचा अंत आणि सत्याचा विजय म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी हा सण हिंदू दिनदर्शिकेनुसार अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील दशमी तिथीला साजरा केला जातो. यंदा 12 ऑक्टोबर 2024 रोजी दसरा साजरा होत आहे. जाणून घेऊया शुभ मुहूर्त कोणता?

दसरा 2024: रावण दहन वेळ
या वर्षी 12 ऑक्टोबर 2024 रोजी दसऱ्याच्या दिवशी रावणाचे दहन केले जाईल. या दिवशी रावण दहनासाठी सर्वात शुभ मुहूर्त संध्याकाळी 5:53 ते 7:27 पर्यंत असेल. हा काळ हिंदू धर्मात प्रदोष काल म्हणून ओळखला जातो. रावण दहन सूर्यास्तापासून अडीच तासांपर्यंत केले जाऊ शकते.
शास्त्र पुजेचे महत्त्व आणि शुभ मुहूर्त
दसऱ्याच्या दिवशी शास्त्रपूजेलाही विशेष महत्त्व आहे. ही पूजा विजयाचे प्रतीक मानली जाते, आणि शुभ विजय मुहूर्तावर केली जाते. यावर्षी शस्त्रपूजेचा शुभ मुहूर्त 2:02 ते 2:48 पर्यंत सुरू होईल. एकूण हा मुहूर्त 46 मिनिटांचा असेल.
दसऱ्याला विशेष योग
यंदा दसऱ्याच्या दिवशी चार दुर्मिळ आणि शुभ योगायोग आहेत. यातील पहिला श्रवण नक्षत्राचा योगायोग आहे. जो 12 ऑक्टोबरला पहाटे 5:25 पासून सुरू होईल आणि 13 ऑक्टोबरला पहाटे 4:27 पर्यंत राहील. यासोबतच कुंभ राशीतील शनी शश राजयोग निर्माण करत आहे, शुक्र आणि बुध लक्ष्मी नारायण योग निर्माण करत आहेत. तसेच शुक्र मालव्य नावाचा राजयोग देखील या दिवशी तयार होत असल्याने हा दिवस अधिक शुभ होतो.
दसऱ्याच्या दिवशी शुभ कार्य
हिंदू धर्मात दसऱ्याचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी अनेक शुभ कार्ये केली जातात. या दिवशी घर प्रवेश, घर किंवा दुकान बांधकामचं भूमीपूजन, नामकरण सोहळा, यज्ञोपवीत संस्कार, अन्नप्राशन, भूमिपूजन, कान टोचणे यासारखी कामे करणे शुभ मानले जाते.
दसरा हा केवळ धार्मिक सण नसून तो चांगल्याच्या विजयाचे आणि वाईटाच्या अंताचे प्रतीक आहे. हा दिवस आपल्याला जीवनात धर्म, सत्य आणि न्यायाच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देतो. या दसऱ्याला चार दुर्मिळ योगायोग असल्याने या दिवशी केलेले कार्य अधिक फलदायी आणि अधिक शुभ मानले जाते.












Click it and Unblock the Notifications