Baba Wang's prediction जुलैमध्ये भयानक दु्र्घटना होतील! बाबा वांगचे भाकित; खरे ठरल्यास विद्धवंस..?
Baba Wang's prediction Terrible accidents will happen in July : बाबा वांग हे भाकित व्यक्त करण्यात पटाईत असून त्यांची अनेक भाकितं जुळली आहेत. कधी त्सुनामी, युद्धाच्या तर कधी खेळातील विजयाच्या तर कधी जागतिक स्तरावरील भाकितं करुन बाबा वांग यांची भविष्यवाणी लक्षवेधक ठरलेली आहेत.

बाबा वांग यांनी २०२५ सालाबद्दल काही गंभीर भाकितं केली आहेत. जूनमध्ये अहमदाबाद विमान अपघात आणि केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातामुळे या गोष्टी आणखी भयावह झाल्या आहेत. बाबा वांगाने जुलैमध्ये अनेक भयानक दुर्घटना घटना घडण्याचीही भविष्यवाणी केली आहे. जर त्या खऱ्या ठरल्या तर निश्चितच मोठा विनाश होऊ शकतो असे बोलले जात आहे. बाबा वांगाने काय भाकीत केले होते आणि या आपत्तींबद्दल ज्योतिषशास्त्र काय म्हणते ते जाणून घेऊया. बाबा वांगाने जुलैमध्ये विनाश होईल असे भाकीत केले होते.
बाबा वांगाच्या मते, २०२५ च्या मध्यात म्हणजेच जून-जुलै महिन्यात जग मोठ्या नैसर्गिक आणि मानवनिर्मित अपघातांच्या विळख्यात सापडू शकते. अग्नी, वायू आणि पाण्याच्या घटकांशी संबंधित विनाशाचे संकेत दिले होते. "मनुष्य स्वतःच्या शोधांनी विनाशाच्या दाराशी पोहोचेल." हे संकेत त्यांनी दिले होते, हे भाकित तांत्रिक किंवा विमान अपघातांकडे निर्देश करू शकतात. बाबा वांगाच्या या भाकितांना अहमदाबाद आणि केदारनाथमधील विमान अपघातांशी जोडले जात आहे.
बाबा वांगचे भाकित काय?
आता जुलैमध्येही बाबा वांगाने नैसर्गिक आपत्ती आणि आगीसारख्या भयानक घटनांची भविष्यवाणी केली आहे. आता ही खरी ठरते की खोटी हे लवकरच कळेल. बाबा वेंगाच्या भाकितांचा विचार केल्यास म्यानमारमधील भूकंप, १२ जून रोजी अहमदाबादमध्ये झालेला विमान अपघात आणि १५ जून रोजी केदारनाथमध्ये झालेला हेलिकॉप्टर अपघात यासारख्या अलीकडील अपघातांशी जोडल्या जात आहेत.
ज्योतिषी काय म्हणतात?
बोल्ड स्कायने वृत्त दिले, त्यानुसार, ज्योतिषी पंडित दीपक दुबे यांच्या मते, ७ जून ते २८ जुलै २०२५ पर्यंत अंगारक योग सक्रिय आहे, ज्यामुळे अपघात, स्फोट, जाळपोळ आणि विमान अपघात होण्याची शक्यता वाढते. मंगळ आणि शनी यांच्यात निर्माण झालेला संघर्ष योग अपघातांना जन्म देऊ शकतो. अशा परिस्थितीत, बाबा वांगाच्या भाकित आणि ज्योतिषशास्त्र दोघांचेही भाकिते जुळत आहेत, ज्यामुळे लोकांची चिंता वाढू शकते.
जुलैमध्ये खरंच अपघात आणखी वाढतील का?
बाबा वांगा यांची भाकितं आणि ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार, जुलै २०२५ बद्दल सावधगिरी बाळगणे महत्वाचे आहे. या काळात तांत्रिक बिघाडांमुळे अतिवृष्टी किंवा पूर, आग किंवा औद्योगिक अपघात, हवाई किंवा रेल्वे अपघात यासारख्या आपत्ती येण्याची शक्यता आहे, असे म्हणणे आहे.
कोण आहे बाबा वांग
बाबा वांगा एक महिला होती . तिचे जन्माचे नाव वांगेलिया पांडेवा गुश्तेरोवा होते. ती एक बल्गेरियन गूढवादी, ज्योतिषी आणि वनौषधी तज्ज्ञ होती. तिला "आजी वांगा" म्हणूनही ओळखले जाते.












Click it and Unblock the Notifications